Friday, December 3, 2021

सीईटी परीक्षा देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांना महत्त्वाची बातमी

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात काही जिल्ह्यात  गेली दोन दिवस  अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणत पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. या अतिवृष्टीमुळे महत्वाची  सीईटी प्रवेश परीक्षा  जे विद्यार्थी देऊ शकले नाहीत अशा विद्यार्थ्यांना परिक्षेसाठी पुन्हा संधी देण्यात येईल.अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.

राज्यात दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात नद्यांना पूर आला आहे. मराठवाड्यात अनेक ठिकाणी नद्यांना पूर आला आहे. अनेक जिल्ह्यांत गावांचा संपर्क तुटला आहे. त्यामुळेच काही विद्यार्थ्यांना सीईटीची परीक्षा देता आल्या नाहीत.

हे विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहिले आहेत. त्यामुळे परीक्षा घेण्यात येणार आहेत, असे मंत्री उदय सामंत म्हणाले.
ज्या विद्यार्थ्यांची सीईटीच्या लिंकवर नोंदणी झाली आहे. त्या सर्वांच्या परीक्षा पुन्हा घेण्यात येतील. त्यामुळे विद्यार्थ्यांनी घाबरुन जाऊ नये. पावसामुळे ज्यांच्या परीक्षा होऊ शकल्या नाहीत

त्यांची तारीख आज किंवा उद्या जाहीर करणार आहोत, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली. दरम्यान,  नवीन महाविद्यालय तसेच अभ्यासक्रम सुरु करण्यासाठी निश्चित केलेले वेळापत्रक कोविडमुळे एक महिना पुढे ढकलण्याचा निर्णय काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या

अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम 2016मधील कलम 109मध्ये नवीन महाविद्यालय, परिसंस्था सुरु करणे तसेचनवीन अभ्यासक्रम, विषय, विद्याशाखा, अतिरिक्त तुकड्या किंवा सॅटेलाईट केंद्र सुरु करण्यासाठी परवानगी देण्याची पद्धत निश्चित केली आहे.

कोविडमुळे वर्ष 2021-22 मध्ये विहित वेळेत कार्यवाही होऊ न शकल्याने हे वेळापत्रक एक महिन्याने पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. या संदर्भात महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम 2016 मधील कलम 109 मध्ये सुधारणा करण्यासाठी अध्यादेश काढण्यात येईल, असे मंत्रिमंडळ बैठकीत ठरले.

ताज्या बातम्या

मोठी बातमी:जे नको व्हायला पाहिजे तेच झाले:ओमिक्रॉनचा भारतात शिरकाव

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिअंटमुळे सध्या जगभरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी आज पत्रकार परिषद...

पोलिसांकडून महिलेकडे शरीरसुखाची मागणी

माय महाराष्ट्र न्यूज:महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामध्ये आता आणखी एक भर पडली आहे. खाकी वर्दीला कलंकित करणारी घटना जळगाव जामोद तालुक्यात...

पुन्हा एखादा अजित पवार होणार नाही याची काळजी घ्या :या नेत्यांचे मोठं विधान

माय महाराष्ट्र न्यूज:मुसलमानांनी सावध राहायला पाहिजे. इथल्या आंबेडकरी चळवळीने सावध राहील पाहिजे. मग अखिलेश यादव असतील, ममता बॅनर्जी असतील. काँग्रेसचे आणि  भाजपाच साटंलोट असल्याचं...

नगर ब्रेकिंग : स्विफ्ट कार व मोटरसायकलचा मोठा अपघात तीन तरुण गंभीर जखमी

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपुर-नेवासा रस्त्यावर असणाऱ्या अजित पवार पॉलिटेक्निक कॉलेज, वडाळा महादेव च्या समोर नेवासाकडून श्रीरामपूरकडे येणाऱ्या स्विफ्ट डिझायर एमएच.१८ ऐजे ८३६९ ने...

महाराष्ट्र शासनानं पुन्हा या नियमावलीत बदल

माय महाराष्ट्र न्यूज:ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या सुचनेनुसार राज्य शाससानं काल विमान प्रवासासंदर्भात नियमावली जाहीर केली होती. त्यानुसार, इतर राज्यांतून महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या विमान...

त्या’ वक्तव्यावरुन बाळासाहेब थोरात संतापले राष्ट्रवादीच्या या मंत्र्यांला म्हणाले तेवढी पात्रताच नाही

माय महाराष्ट्र न्यूज:पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्यात केलेल्या टीकेनंतर राज्यात काँग्रेस नेत्यांनी नाराजीचा सूर लावला आहे. देशातील दमनशाहीच्या विरोधात रस्त्यावर उतरून...
error: Content is protected !!