Wednesday, December 8, 2021

आता केवळ 700 रुपयांत मिळणार नवा LPG सिलिंडर

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:इंडियन ऑईलनं ग्राहकांसाठी खूशखबर दिली आहे. ग्राहकांना आता नव्या LPG सिलिंडरचा लाभ मिळणार आहे. ग्राहकांना सुविधेच्या दृष्टीकोनातून ‘कॉम्पोजिट सिलिंडर’ लॉन्च करण्यात आले आहे. ‘कॉम्पोजिट सिलिंडर’मुळे घरगुती LPG सिलिंडरचं वजन 7 किलोग्रॅमने कमी होणार आहे.

विशेष म्हणजे कॉम्पोजिट सिलिंडर दिसायला देखील आकर्षक आहे. इतकंच नाही तर सिलिंडरमध्ये किती गॅस शिल्लक आहे, हे देखील ग्राहक पाहू शकणार आहेत. देशाचे पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते नुकतंच कॉम्पोजिट सिलिंडरचं लोकार्पण करण्यात आलं.

खासदार हेमा मालिनी यांच्या हस्ते कॉम्पोजिट सिलिंडर मथुरेत 25 सप्टेंबरला लॉन्च करण्यात आले. कॉम्पोजिट सिलिंडरची किंमत 700 रुपये असेल. मात्र, ग्राहकांना 4 किलोग्रॅम गॅस कमी मिळेल. कारण कॉम्पोजिट सिलिंडरमध्ये केवळ 10 किलोग्रॅम गॅस मिळेल. जुन्या घरगुती सिलिंडरचं वजन 17 किलो होतं आणि गॅस भरल्यानंतर ते 31 किलो होत होतं.

मिळालेली माहिती अशी की, कॉम्पोजिट सिलिंडर 10 किलो आणि 5 किलोमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. 10 किलो गॅस सिलिंडरसाठी जवळपास 700 रुपये तर 5 किलो सिलिंडरसाठी 363 रुपये मोजावे लागतील. त्याचबरोबर कॉम्पोजिट सिलिंडर मिळवण्यासाठी गॅस एजन्सीकडे सिक्युरिटी डिपॉझिट जमा करावी लागणार आहे.

10 किलोच्या सिलिंडरसाठी 3350 तर 5 किलोच्या सिलिंडरसाठी 2150 रुपये सिक्युरिटी डिपॉझिट जमा करावी लागेल. विषेश म्हणजे ग्राहकांना आपले जुने सिलिंडर देऊन कॉम्पोजिट सिलिंडर बदलता येणार आहे.

ताज्या बातम्या

‘त्या’ वादग्रस्त विधानाप्रकरणी इंदुरीकर महाराजांना तूर्तास दिलासा

माय महाराष्ट्र न्यूज: अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी महिलांनाबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाविरोधात दाखल केलेल्या खटल्यात आज होणारी सुनावणी न्यायालयाने पुढे ढकलली आहे. तर...

त्या अभिनेत्रीला बलात्काराची धमकी;या खासदाराला द्यावा लागला राजीनामा

माय महाराष्ट्र न्यूज: अभिनेत्री माहिया माही हिला फोनवरून बलात्काराची धमकी दिल्यानंतर जमालपूरचे खासदार व देशाचे माहिती आणि प्रसारण मंत्री मुराद हसन यांनी आपल्या पदाचा राजीनामा...

 सर्दी, घसा खवखवणे अशी लक्षणे असणाऱ्या 3 पैकी 1 व्यक्तीला प्रत्यक्षात कोविड असू शकतो

माय महाराष्ट्र न्यूज:गेले दोन वर्षे संपूर्ण जग कोरोना विषाणूशी (Coronavirus) लढा देत आहे. सध्या जगभरात लसीकरणाद्वारे यावर मात केली जात आहे. गेल्या अनेक महिन्यांमध्ये...

आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आले हे महत्त्वाचे निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यातील न्यायसहायक विज्ञान संस्था मधून फॉरेन्सिक सायन्स पदवी व पदव्युत्तर पदवी विद्यार्थ्यांना न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाच्या अधिनस्त राज्यातील विविध प्रयोगशाळांमध्ये प्रतिवर्षी 150...

एकदिवसीय ऊस गाळपात ‘ज्ञानेश्वर’चा नवा उच्चांक

नेवासा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याने सध्या सुरू असलेल्या सन 2021-22 च्या हंगामात दि.07 डिसेंबर रोजी प्रतिदिन  7000...

नगर जिल्ह्यात या घाटात मध्यरात्री चारचाकी वाहनाला आग वाहन पूर्णतः जळून खाक;उलट-सुलट चर्चा सुरू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील करंजी घाट येथे मंगळवारी मध्यरात्री एका चारचाकी वाहनाला आग लागून या घटनेत हे चार चाकी वाहन पूर्णतः...
error: Content is protected !!