Friday, December 3, 2021

नगर ब्रेकींग: बेपत्ता युवा उद्योजकाचा मृतदेह आढळला;हत्या की आत्महत्या?

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:मुळ कडूस ता.पारनेर येथील रहिवाशी असलेले चोपडा परिवार व्यावसायानिमित शिरुर (घोडनदी) जि. पुणे येथे स्थायिक झालेला आहे. या परिवारातील युवा उद्योजक आदित्य चोपडा गेल्या दोन दिवसापासुन बेपत्ता असल्याची फिर्याद कुटुंबियांनी सुपा पोलिस स्टेशनला केली होती.

शिरुर येथील युवा व्यावसायिक आदित्य चोपडा गेल्या दोन-तीन दिवसापासुन बेपत्ता होते. बुधवारी दुपारी त्याच्या मृतदेह नारायणगव्हाण येथील महामार्गालगतच्या विहिरीत आढळून आला आहे.

सुपा पोलिसांनी कलम ३६३ प्रमाणे गुन्हा नोंदवून तपास चालू केला होता. बुधवार दि .२९ सप्टेंबर २०२१ रोजी काही तरुण बबन धोंडीबा नवले यांच्या विहरीजवळ गेले असता तेथे एक मृतदेह आढळून आल्याचे त्याच्या लक्ष्यात आले. त्यांनी तात्काळ ही माहिती जवळील नागरिकांना व सुपा पोलिसांना सांगितले.

पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत स्थानिकांच्या मदतीने मृतदेहाची ओळख पटवली असता मृतदेह चोपडा याचा असल्याचे स्पष्ट झाले.याबाबत तात्काळ नातेवाईकांना कळवण्यात आले. मृत व्यक्तीच्या नातेवाईक तेथे आल्यावर त्यांनी आक्रोश करत अहमदनगर पुणे महामार्गावर नवले मळा येथे रास्ता रोको अंदोलन केले.

मृताचे नातेवाईक व जमा झालेल्या नातेवाईकामुळे महामार्ग बंद होऊन वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.सुपा पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह पुढील तपासणीसाठी सरकारी रुग्णालयात रवाना केला. उशीरा पर्यत गुन्हा नोंदवन्याचे काम चालु होते , तर पीएम रिपोर्ट वरुन पुढील तपासाची दिशा ठरवली जाईल असेही पोलिसांनी सांगितले.

ताज्या बातम्या

मोठी बातमी:जे नको व्हायला पाहिजे तेच झाले:ओमिक्रॉनचा भारतात शिरकाव

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिअंटमुळे सध्या जगभरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी आज पत्रकार परिषद...

पोलिसांकडून महिलेकडे शरीरसुखाची मागणी

माय महाराष्ट्र न्यूज:महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामध्ये आता आणखी एक भर पडली आहे. खाकी वर्दीला कलंकित करणारी घटना जळगाव जामोद तालुक्यात...

पुन्हा एखादा अजित पवार होणार नाही याची काळजी घ्या :या नेत्यांचे मोठं विधान

माय महाराष्ट्र न्यूज:मुसलमानांनी सावध राहायला पाहिजे. इथल्या आंबेडकरी चळवळीने सावध राहील पाहिजे. मग अखिलेश यादव असतील, ममता बॅनर्जी असतील. काँग्रेसचे आणि  भाजपाच साटंलोट असल्याचं...

नगर ब्रेकिंग : स्विफ्ट कार व मोटरसायकलचा मोठा अपघात तीन तरुण गंभीर जखमी

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपुर-नेवासा रस्त्यावर असणाऱ्या अजित पवार पॉलिटेक्निक कॉलेज, वडाळा महादेव च्या समोर नेवासाकडून श्रीरामपूरकडे येणाऱ्या स्विफ्ट डिझायर एमएच.१८ ऐजे ८३६९ ने...

महाराष्ट्र शासनानं पुन्हा या नियमावलीत बदल

माय महाराष्ट्र न्यूज:ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या सुचनेनुसार राज्य शाससानं काल विमान प्रवासासंदर्भात नियमावली जाहीर केली होती. त्यानुसार, इतर राज्यांतून महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या विमान...

त्या’ वक्तव्यावरुन बाळासाहेब थोरात संतापले राष्ट्रवादीच्या या मंत्र्यांला म्हणाले तेवढी पात्रताच नाही

माय महाराष्ट्र न्यूज:पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्यात केलेल्या टीकेनंतर राज्यात काँग्रेस नेत्यांनी नाराजीचा सूर लावला आहे. देशातील दमनशाहीच्या विरोधात रस्त्यावर उतरून...
error: Content is protected !!