Friday, December 3, 2021

मोठी बातमी: सरकारी शाळांमध्ये मोफत मिळणार ही सुविधा, केंद्र सरकारची घोषणा

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:केंद्र सरकारच्या वतीनं ‘पीएम पोषण योजने’ची घोषणा करण्यात आली. या योजनेअंतर्गत सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांना दुपारचं जेवण मोफत दिलं जाणार आहे. सध्या ‘मिड-डे मिल’ योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना दुपारचं भोजन दिलं जातं. ही योजना बंद होऊन त्या जागी ही नवी योजना सुरू होणार आहे.

देशातील सर्व सरकारी शाळांमध्ये पुढील पाच वर्षांसाठी दुपारचं जेवण विद्यार्थ्यांना मोफत देण्याची घोषणा मोदी सरकारनं केली आहे. केंद्रीय मंत्री पियुष गोयल आणि अनुराग ठाकूर यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. शिक्षण आणि रेल्वे खात्यासंबंधात काही महत्त्वाचे निर्णय केंद्रीय मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आले. त्यानंतर ही माहिती देण्यात आली.

या योजनेअंतर्गत देशातील 11 लाख 20 हजार शाळांमधील विद्यार्थ्यांना मोफत दुपारचं जेवण मिळणार आहे. पुढील पाच वर्षांसाठी ही योजना सुरू राहणार आहे. यासाठी सरकारने 1.31 लाख कोटी रुपये खर्च करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. ही योजना राज्य सरकारांच्या सहकार्यानं चालवली जाणार आहे. यात अधिक तरतूद केंद्र सरकारची असणार आहे.

नॅशनल एक्सपोर्ट इन्शुरन्स अकाऊंट नावाच्या योजनेअंतर्गत 1650 कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे. देशातील 97 टक्के उद्योग लघू आणि मध्यम स्वरुपाचे आहेत. त्यांना या योजनेचा फायदा होणार असल्याचं मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे.

ताज्या बातम्या

मोठी बातमी:जे नको व्हायला पाहिजे तेच झाले:ओमिक्रॉनचा भारतात शिरकाव

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिअंटमुळे सध्या जगभरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी आज पत्रकार परिषद...

पोलिसांकडून महिलेकडे शरीरसुखाची मागणी

माय महाराष्ट्र न्यूज:महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामध्ये आता आणखी एक भर पडली आहे. खाकी वर्दीला कलंकित करणारी घटना जळगाव जामोद तालुक्यात...

पुन्हा एखादा अजित पवार होणार नाही याची काळजी घ्या :या नेत्यांचे मोठं विधान

माय महाराष्ट्र न्यूज:मुसलमानांनी सावध राहायला पाहिजे. इथल्या आंबेडकरी चळवळीने सावध राहील पाहिजे. मग अखिलेश यादव असतील, ममता बॅनर्जी असतील. काँग्रेसचे आणि  भाजपाच साटंलोट असल्याचं...

नगर ब्रेकिंग : स्विफ्ट कार व मोटरसायकलचा मोठा अपघात तीन तरुण गंभीर जखमी

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपुर-नेवासा रस्त्यावर असणाऱ्या अजित पवार पॉलिटेक्निक कॉलेज, वडाळा महादेव च्या समोर नेवासाकडून श्रीरामपूरकडे येणाऱ्या स्विफ्ट डिझायर एमएच.१८ ऐजे ८३६९ ने...

महाराष्ट्र शासनानं पुन्हा या नियमावलीत बदल

माय महाराष्ट्र न्यूज:ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या सुचनेनुसार राज्य शाससानं काल विमान प्रवासासंदर्भात नियमावली जाहीर केली होती. त्यानुसार, इतर राज्यांतून महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या विमान...

त्या’ वक्तव्यावरुन बाळासाहेब थोरात संतापले राष्ट्रवादीच्या या मंत्र्यांला म्हणाले तेवढी पात्रताच नाही

माय महाराष्ट्र न्यूज:पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्यात केलेल्या टीकेनंतर राज्यात काँग्रेस नेत्यांनी नाराजीचा सूर लावला आहे. देशातील दमनशाहीच्या विरोधात रस्त्यावर उतरून...
error: Content is protected !!