Friday, December 3, 2021

नगर ब्रेकींग:लग्नाचे अमिष दाखवून विधवा महिलेवर चार वर्षे वेळोवेळी बलात्कार

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर शहरात इंदिरागल्ली परिसरातील एक पुरुष व एक विधवा महिलेची मैत्री झाली. आणि त्याचे रूपांतर नकळत प्रेमात झाले. नंतर, यांनी एकमेकांशी लग्न करण्याचे ठरविले मात्र, या पुरुषाने पीडित विधवा महिलेवर चार वर्षे वेळोवेळी अत्याचार करून तिला अचानक लग्नास नकार दिला.

ही घटना 10 मे 2021 रोजी पुर्वी घडली. मात्र, आपल्यावर अत्याचार आणि अन्याय झाला असुन आपली फसवणुक झाल्याचे लक्षात येताच पिडीत महिलेने संगमनेर शहर पोलीस ठाण्यात 26 सप्टेंबर रोजी फिर्याद दाखल करून गुन्हा नोंदवला आहे. याप्रकरणी वेणुनाथ वामन ठोंबरे (रा. इंदिरागल्ली, ता. संगमनेर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, पिडीत महिला व आरोपी वेणुनाथ ठोंबरे हे एकाच परिसरात राहीला असल्याने त्यांची ओळख झाली. त्यामुळे, ये-जा होत असताना त्यांची ओळख मैत्रीत रूपांतर झाली. पण, पिडीत महिलेचा पती 24 मे 2015 रोजी मयत झाले होते. त्यांना दोन आपत्य होती. ते बाहेर गावी राहत असल्याने पिडीत महिला एकटी राहत होती.

आरोपी वेणुनाथ ठोंबरे याने याच एकट्यापणाचा फायदा घेत मैत्री वाढवली. त्यांची जेव्हा-जेव्हा भेट होत होती तेव्हा आरोपी वेणुनाथ ठोंबरे हा वारंवार म्हणत असत की, माझ्या पत्नीला पॅरालेसीस झाला असुन ती काहीच काम करू शकत नाही व हालचाल देखील करू शकत नाही. त्यामुळे, तिची सेवा

करण्यासाठी व आमची देखभाल करण्यासाठी पत्नीच्या संमतीने तुझ्याशी लग्न करणार आहे. तसेच तू देखील विधवा आहे त्यामुळे तुला भविष्यासाठी एक चांगला जोडीदार आवश्यक आहे. आपण माझ्या घरातील लोकांच्या संमतीने लग्न करू अशी भावनिक साद पीडित महिलेला घातली.

दरम्यान, पीडित महिलेला लग्नाचा शब्द दिला म्हणल्यानंतर या दोघांचा एकमेकांवर विश्वास वाढला. पिडीत महिला घरात एकटीच राहत असल्याने आरोपी वेणुनाथ याने पीडित महिलेच्या घरात वेळोवेळी अत्याचार केला. आपण लवकरच लग्न करू असे सांगुन त्यांच्यात 2017 ते 10 मे 2021 पर्यंत वारंवार

शरीरसंबंध होत राहिले. त्यानंतर तिने लग्नाची मागणी केली असता त्याने लग्नास टाळाटाळ करण्यास सुरवात केली.या दरम्यान देखील तिच्याशी वारंवार संबंध ठेऊन तिची वारंवार दिशाभुल करून फसविण्याचा कट रचत राहिला. पीडित महिलेच्या हे लक्षात येताच तिने आरोपी वेणुनाथ याची चौकशी केली

असता समजले की, वेणुनाथच्या पत्नीस पॅरालेसीस किंवा इतर कोणताही आजार झालेला नाही. त्यामुळे,आरोपी वेणुनाथला जाब विचारायला गेले. तु मला का फसविले असे म्हणताच आरोपी वेणुनाथने पीडित महिलेला शिवीगाळ करून दमदाटी व मारहाण केली. तु जर आपले संबंध कोणाला सांगितले तर तुला जीवे ठार मारण्यास देखील मागे पुढे पाहणार नाही

अशी धमकी देखील दिली. त्यानंतर, हा प्रकार पिडीत महिलेने पोलीस ठाण्यात कथन केला. त्यानंतर तिच्या फिर्यादीनुसार संगमनेर शहर पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेतला. त्यानंतर पुढे काही अनुचित प्रकार घडु नये म्हणुन पोलिसांनी तात्काळ खबरदारी घेत वेणुनाथ ठोंबरे यास अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कोकाटे करत आहे.

ताज्या बातम्या

मोठी बातमी:जे नको व्हायला पाहिजे तेच झाले:ओमिक्रॉनचा भारतात शिरकाव

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिअंटमुळे सध्या जगभरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी आज पत्रकार परिषद...

पोलिसांकडून महिलेकडे शरीरसुखाची मागणी

माय महाराष्ट्र न्यूज:महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामध्ये आता आणखी एक भर पडली आहे. खाकी वर्दीला कलंकित करणारी घटना जळगाव जामोद तालुक्यात...

पुन्हा एखादा अजित पवार होणार नाही याची काळजी घ्या :या नेत्यांचे मोठं विधान

माय महाराष्ट्र न्यूज:मुसलमानांनी सावध राहायला पाहिजे. इथल्या आंबेडकरी चळवळीने सावध राहील पाहिजे. मग अखिलेश यादव असतील, ममता बॅनर्जी असतील. काँग्रेसचे आणि  भाजपाच साटंलोट असल्याचं...

नगर ब्रेकिंग : स्विफ्ट कार व मोटरसायकलचा मोठा अपघात तीन तरुण गंभीर जखमी

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपुर-नेवासा रस्त्यावर असणाऱ्या अजित पवार पॉलिटेक्निक कॉलेज, वडाळा महादेव च्या समोर नेवासाकडून श्रीरामपूरकडे येणाऱ्या स्विफ्ट डिझायर एमएच.१८ ऐजे ८३६९ ने...

महाराष्ट्र शासनानं पुन्हा या नियमावलीत बदल

माय महाराष्ट्र न्यूज:ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या सुचनेनुसार राज्य शाससानं काल विमान प्रवासासंदर्भात नियमावली जाहीर केली होती. त्यानुसार, इतर राज्यांतून महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या विमान...

त्या’ वक्तव्यावरुन बाळासाहेब थोरात संतापले राष्ट्रवादीच्या या मंत्र्यांला म्हणाले तेवढी पात्रताच नाही

माय महाराष्ट्र न्यूज:पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्यात केलेल्या टीकेनंतर राज्यात काँग्रेस नेत्यांनी नाराजीचा सूर लावला आहे. देशातील दमनशाहीच्या विरोधात रस्त्यावर उतरून...
error: Content is protected !!