भेंडा(नेवासा)
प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय भेंडा उपसेवा केंद्र रौप्य महोसत्व सोहळा पुणे येथील मीरा सोसायटीच्या संचालिका राजयोगिनी नलिनी दीदीजी यांचे प्रमुख उपस्थितित संपन्न झाला.
आपल्या कार्याला परमात्म्याचा आशीर्वाद महत्त्वाचा असतो.हिम्मत ठेवून कार्य करीत राहिले तर कार्य सिद्धी जाते.ज्याचे चित्त सरळ असते त्याचे कार्यही सरळ होते असे प्रतिपादन राजयोगिनी नलिनी दीदीजी यांनी केले.
नेवासा तालुक्यातील भेंडा येथील श्रीकृष्ण मंगल कार्यालयात आयोजित या कार्यक्रमास नेवासा सेवा केंद्र संचालिका ब्रह्माकुमारी सरला दीदीजी,तहसीलदार सुनीता काळे, काशिनाथ अण्णा नवले, अशोकराव मिसाळ,पत्रकार सुखदेव फुलारी,राकेश भाई, मुंगसे गुरुजी,वंदना दीदी,सुनिता बहेनजी,
आदि यावेळी उपस्थित होते.
*राजयोगिनी नलिनी दीदी* यावेळी म्हणाल्या की, वर्तमान जीवन यात्रेत लवस्टोरी (प्रेमकथा) आणि सक्सेसस्टोरी (यशोगाथा) अशा दोन कथा जीवनाच्या आयुष्यात एकत्र केलेल्या आहेत. इतिहासाचे आपण प्रत्यक्ष साक्षीदार नाही आहोत त्यामुळे काही गोष्टीवर विश्वास ठेवावा लागतो.तशाच विश्वास परमात्म्यावर ठेवावा लागतो. उशिरा का होईना आज्ञा होत असते. मोहिनिराज मंदिरात चित्र प्रदर्शनाने नेवासा पुण्यभूमित प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरी विश्वविद्यालयचे काम सुरू केले.नेवासा ही ज्ञान,कर्म, तपश्चा आणि भक्तीची भूमी आहे. येथे सेवा नक्की होणार हळूहळू का होईना सेवा नक्की होणार हे मला माहीत होते.एका खोलीत सुरु केलेले कार्य बघून एका व्यक्तिने नेवासा फाट्या वर स्वतःची जागा विद्यालयाला दान दिली.आज सरलादीदी यांचे मार्गदर्शनाखाली ईश्वरीय कार्य सुरु आहे. नावच सरल आहे म्हणून त्यांचे काम ही सरळ आहे.
यावेळी तहसीलदार सौ. सुनिता काळे यांनी राजयोगाचा अभ्यास केल्याने जीवनामध्ये कसा बदल झाला ते सांगितले.
येवला सेवा केंद्राच्या नीता दीदी अर्चना दीदी,पुणे येथील राकेश भाई, ज्योती दीदी,सुनिता बहेनजी यांनी त्यांच्या मनोगतामध्ये त्यांना ईश्वरीय जीवनाचा कसा फायदा झाला ते सांगितले. ईश्वराची मदत शिवबाबांची मदत कशी मिळाली ते त्यांनी अनुभवाच्या द्वारे सांगितले.
सरपंच प्रा.उषा मिसाळ यांनी सांगितले की, मी सुद्धा रोज शिवानी दीदींचे पॉझिटिव्ह थॉट ऐकते व वाचते. सरलादीदी,काशीनाथ अण्णा नवले,पत्रकार सुखदेव फुलारी, सुनीता बहेनजी यांनीही मनोगत व्यक्त केले.
भेंडा सेवा केंद्र संचालिका वंदना दीदी यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.क्षीरसागर बहेनजी यांनी सूत्रसंचालन केले.