Saturday, November 27, 2021

खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांचे चांगलेच टेन्शन वाढले

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यात विधान परिषद, जिल्हा परिषद, पंचायत समित्या, स्थानिक स्वराज्य संस्था आदींच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यकर्त्यांचे संघटन मजबूत करण्यासाठी

 राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेसाठी दोन दिवस अहमदनगर जिल्ह्यात आले आहेत. या यात्रे निमित्त जयंत पाटील यांनी आज अहमदनगर शहर, पारनेर व श्रीगोंदे येथे पक्ष बांधणी कामाचा आढावा बैठका घेतल्या.

अहमदनगर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस भवन येथे शहर व तालुक्यातील कार्यकर्त्यांची आढावा बैठक झाली.या प्रसंगी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, आमदार संग्राम जगताप, माजी आमदार नरेंद्र घुले पाटील ,आमदार अरूण जगताप, आमदार डॉ. किरण लहामटे, शहर जिल्हाध्यक्ष माणिक विधाते, अविनाश घुले, संपत बारस्कर आदी उपस्थित होते.

विधानसभा निवडणुकीत आपण 54 नाही तर 90-100 जागा जिंकू शकतो, मात्र यासाठी आपल्याला संघटना बांधणीवर भर द्यावा लागेल. आपण सत्तेत आहे म्हणून पक्षाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. राष्ट्रवादीच्या 16 ही सेलने पूर्ण क्षमतेने काम करणे आवश्यक आहे. जनसामान्यांत जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेणे

त्या सोडविणे याला प्राधान्या द्या, अशा सूचनाही जयंत पाटील यांनी दिल्या.पाटील पुढे म्हणाले, अहमदनगर जिल्हा हा ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर प्रेम करणारा जिल्हा आहे. या जिल्ह्याने नेहमीच शरद पवार यांना साथ दिली आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत देखील 12 पैकी 6 जागा राष्ट्रवादीने पटकावल्या. मात्र आपल्याला ही संख्या द्विगुणीत करायची आहे.

मागील लोकसभा निवडणुकीत आपल्याला अपयश आले, मात्र आगामी निवडणुकीत आपला व आपल्या उमेदवाराचा जनसंपर्क वाढवा. याच जनसंपर्काचा उपयोग करून जिल्ह्यात राष्ट्रवादीची ताकद आपल्याला वाढवायची आहे. पुढील वेळी लोकसभेतही पक्षाला उत्तम यश मिळावे यादृष्टीने काम करा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

त्यामुळे अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघाला राष्ट्रवादीने लक्ष केले असल्याने खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांचे टेन्शन वाढले आहे.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यात एकच खळबळ:काटवनात आढळला तरुणाचा मृतदेह, घातपात की आत्महत्या

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथील तळेगाव प्रादेशिक पाणी योजनेच्या साठवण तलावानजीक रस्त्याच्याकडेच्या काटवनात तळेगाव दिघे (वामनवाडी) येथील तरुणाचा मृतदेह आढळून आला. शुक्रवारी...

बापरे : पती-पत्नी मिळून चालवायचे देह विक्रीचा व्यवसाय

माय महाराष्ट्र न्यूज: पोलिसांनी मानवी तस्करीचा भांडाफोड केला आहे. हे तस्कर बांग्लादेशातून तरुणी आणून भारतात देह व्यापाराच्या व्यवसायाता ढकलत होते. पोलिसांनी टोळीच्या प्रमुखासह 8...

मोठी बातमी:महाराष्ट्रात सरकार पाडण्याच्या हालचाली?आज अमित शहा, देवेंद्र फडणवीस व शरद पवार दिल्लीत भेट ?

माय महाराष्ट्र न्यूज:केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी महाराष्ट्रात मार्चमध्ये भाजपचे सरकार येणार असा दावा केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. त्यातच महाराष्ट्रातील अनेक नेते...

धक्कादायक :महिला पोलीस कर्मचाऱ्याचे नावे सोशल मीडियावर बनावट अकाउंट, अश्लील Video केला शेअर

माय महाराष्ट्र न्यूज: पुणे शहर पोलीस विभागातील एका महिला कर्मचार्‍याच्या नावाने फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडियावर बनावट अकाउंट तयार करून त्यावर अश्लील व्हिडिओ...

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांचा मृत्यूदर चिंताजनक

माय महाराष्ट्र न्यूज: राज्यामध्ये कोरोनाची तिसरी लाट येणार की नाही याबाबत मतमतांतरे आहेत. तिसरी लाट जरी आली तरी अतिशय सौम्य प्रमाणात असल्याचा दावा राज्याचे...

नगर जिल्हा रुग्णालय :१४ जणांचा बळी घेणारी आग कशी लागली? अहवाल तयार

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्हा रुग्णालयाच्या कोविड अतिदक्षता विभागात ६ नोव्हेंबरला लागलेल्या आगीचा अहवाल राज्य सरकारने नेमलेल्या चौकशी समितीने तयार केला आहे. सुमारे ६५...
error: Content is protected !!