Friday, December 3, 2021

आधार कार्ड संबंधित नियमांमध्ये मोठे बदल; जाणून घ्या…

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: प्रत्येक भारतीय नागरिकाकडे आधार कार्ड असणं सरकारनं अनिवार्य केलं आहे. भारतीय युनिक आयडेंटिफिकेशन ऑथोरिटी या आधारकार्ड जारी करणाऱ्या संस्थेच्या माध्यमातून प्रत्येक नागरिक आपलं आधारकार्ड बनवून घेऊ शकतो.

व्यक्तीचं नाव, पत्ता, जन्मतारीख यासह बायोमेट्रिक माहिती घेऊन आधारकार्ड तयार केलं जातं. प्रत्येक व्यक्तीला एक आधार क्रमांक दिला जातो. त्यामुळे फसवणूक होऊ शकत नाही. आधारकार्ड हा महत्त्वाचा सरकारी दस्तऐवज असून, वैध ओळखपत्र म्हणून सर्वत्र त्याचा वापर करता येतो. कोणत्याही सरकारी कामासाठी,

आर्थिक व्यवहारासाठी आधारकार्ड असणं अत्यंत आवश्यक आहे. जास्तीत जास्त नागरिकांना आधार कार्ड बनवून घेता यावं यासाठी अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. याचाच एक भाग म्हणून नुकतंच यासाठीचं पडताळणी शुल्क अत्यंत कमी करण्यात आलं आहे. ‘अमरउजाला’ने याबाबतचं वृत्त दिलं आहे.

आता भारतीय युनिक आयडेंटिफिकेशन ऑथोरिटीनं ग्राहकांच्या आधार पडताळणीसाठीची रक्कम 20 रुपयांवरून फक्त 3 रुपये केली आहे. NPCI-IAMAI द्वारे आयोजित जागतिक फिनटेक फेस्टमध्ये भारतीय युनिक आयडेंटिफिकेशन ऑथोरिटीचे सीईओ सौरभ गर्ग यांनी ही घोषणा केली.

यामुळे जास्तीत जास्त नागरिक याचा लाभ घेऊ शकतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आधार कार्ड बनवताना प्रत्येक व्यक्तीची बायोमेट्रिक माहिती म्हणजे डोळ्याचं स्कॅन आणि बोटांचे ठसे घेतले जातात. ही बायोमेट्रिक माहिती अत्यंत सुरक्षित ठेवली जाते, असंही गर्ग यांनी सांगितलं.

आधार प्रणालीच्या माध्यमातून ग्राहकांची ओळख पडताळणी केली जाते. आतापर्यंत 99 कोटी ई-केवायसीसाठी (E Kyc) आधार प्रणालीचा वापर करण्यात आला असल्याचंही गर्ग यांनी या वेळी सांगितलं. आर्थिक क्षेत्रात आधारला मोठी संधी आहे.

यासह ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून भारतीय युनिक आयडेंटिफिकेशन ऑथोरिटीनं ही प्रक्रिया आणखी सुसह्य करण्याचा प्रयत्न केला आहे.

ताज्या बातम्या

मोठी बातमी:जे नको व्हायला पाहिजे तेच झाले:ओमिक्रॉनचा भारतात शिरकाव

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिअंटमुळे सध्या जगभरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी आज पत्रकार परिषद...

पोलिसांकडून महिलेकडे शरीरसुखाची मागणी

माय महाराष्ट्र न्यूज:महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामध्ये आता आणखी एक भर पडली आहे. खाकी वर्दीला कलंकित करणारी घटना जळगाव जामोद तालुक्यात...

पुन्हा एखादा अजित पवार होणार नाही याची काळजी घ्या :या नेत्यांचे मोठं विधान

माय महाराष्ट्र न्यूज:मुसलमानांनी सावध राहायला पाहिजे. इथल्या आंबेडकरी चळवळीने सावध राहील पाहिजे. मग अखिलेश यादव असतील, ममता बॅनर्जी असतील. काँग्रेसचे आणि  भाजपाच साटंलोट असल्याचं...

नगर ब्रेकिंग : स्विफ्ट कार व मोटरसायकलचा मोठा अपघात तीन तरुण गंभीर जखमी

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपुर-नेवासा रस्त्यावर असणाऱ्या अजित पवार पॉलिटेक्निक कॉलेज, वडाळा महादेव च्या समोर नेवासाकडून श्रीरामपूरकडे येणाऱ्या स्विफ्ट डिझायर एमएच.१८ ऐजे ८३६९ ने...

महाराष्ट्र शासनानं पुन्हा या नियमावलीत बदल

माय महाराष्ट्र न्यूज:ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या सुचनेनुसार राज्य शाससानं काल विमान प्रवासासंदर्भात नियमावली जाहीर केली होती. त्यानुसार, इतर राज्यांतून महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या विमान...

त्या’ वक्तव्यावरुन बाळासाहेब थोरात संतापले राष्ट्रवादीच्या या मंत्र्यांला म्हणाले तेवढी पात्रताच नाही

माय महाराष्ट्र न्यूज:पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्यात केलेल्या टीकेनंतर राज्यात काँग्रेस नेत्यांनी नाराजीचा सूर लावला आहे. देशातील दमनशाहीच्या विरोधात रस्त्यावर उतरून...
error: Content is protected !!