Tuesday, November 30, 2021

महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांचे ‘ते’ फ्लेक्स विखेंना खटकले; विचारला ‘हा’ सवाल

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:सहकारी साखर कारखानदारीचे संरक्षण करण्यासाठी केंद्र सरकारच्या सहकार मंत्रालयाचा निश्चितच फायदा होईल. कारण सहकार चळवळीचे आणि हक्काच्या पाण्याचे संरक्षण करण्यासाठी आमचा संघर्ष सुरू आहे. मात्र ज्यांच्यावर जबाबदारी आहे ते जिल्ह्यातील तीनही मंत्री समन्यायी पाणीवाटप कायद्यावर गप्प बसले आहेत.

निळवंडे धरणाचे कालवे निधी अभावी रखडले आहेत. या कालव्यांच्या कामासाठी अडीच ते तीन हजार कोटी रुपयांची गरज असताना महाविकास आघाडी सरकारने निधीची कोणतीही तरतूद केलेली नाही. अशा परिस्थितीत स्वत:च्या सहीचे फ्लेक्सबोर्ड लावणारे नेते दुष्काळी भागाला नेमके कोणत्या

वर्षी पाणी देणार? असा सवाल डॉ. विखे पाटील कारखान्याचे चेअरमन आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला.पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या अधिमंडळाची 72 वी वार्षिक सर्वसाधारण सभा आ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.

आज जिल्ह्यातील पाण्यावर समन्यायी पाणी वाटप कायद्याचे भूत बसले आहे. वास्तविक हा कायदा रद्द करण्याची जबाबदारी जिल्ह्यातील तीनही मंत्र्याची आहे. परंतु याबाबत ते बोलायलाही तयार नाहीत. याकडे लक्ष वेधून आ. विखे पाटील म्हणाले

की, निळवंडे कालव्यांच्या बाबतीत हीच परिस्थिती निर्माण झाली आहे. कालव्यांची कामे पूर्ण करण्यासाठी अडीच ते तीन हजार कोटी रुपयांची गरज असताना महाविकास आघाडी सरकारकडून याची कोणतीही तरतूद नाही.

तरीही आम्हीच निळवंड्याचे तारणहार म्हणून काही जण स्वत:च्या सहीचे फ्लेक्सबोर्ड लावून पुढच्या वर्षी देणार, असे सांगतात यांचे नेमके पुढचे वर्ष कोणते, असा टोलाही त्यांनी लगावला. या सरकारमुळेच मराठा आणि ओबीसी समाजाचे आरक्षण गेले, त्याचे प्रायचित्त घ्यायला हवे होते. परंतु याबाबत कोणीही बोलायला तयार नाही.

प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेप्रमाणे रयत शिक्षण संस्थेनेही फी माफी करावी, असे थेट आव्हान आ. विखे पाटील यांनी आपल्या भाषणात दिले.उपलब्ध पाण्यावर उसाचे उत्पादन वाढविण्यासाठी भविष्यात काम करावे लागणार असून सभासदांचे हित जोपासले जाईल असेच निर्णय होतील. विरोधकांनी

 सुचना जरुर कराव्यात परंतु ते ज्यांची उदाहरण देतात त्यांचा मागील इतिहासही त्यांनी पाहावा, असा सल्ला त्यांनी विरोधकांना दिला.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यातील धक्कादायक घटना:पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात एक अतिशय धक्कादायक बातमी समोर येत आहे.पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीने गळफास लावून घेत आत्महत्या केली. गोपीचंद रोहिदास भोसले (वय 30...

नगर जिल्ह्यातील अतिशय दुर्देवी घटना: दोघा सख्ख्या भावंडांचा बुडून मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील निळवंडे जलाशयावर आंघोळीसाठी गेलेल्या राजूर येथील दोन भावंडांचा रविवारी (२८ नोव्हेंबर) सायंकाळी पाण्याच्या भोवर्‍यात बुडून दुर्देवी मृत्यू झाल्याने राजूर...

भाजपच्या आमदार मोनिका राजळे यांना पोलिसांनी केली अटक

माय महाराष्ट्र न्यूज:कृषीपंपाच्या थकित वीज बिलाच्या वसुलीसाठी महावितरण कंपनीने शेतीपंपाचा वीजपुरवठा खंडीत केला जात आहे. या राज्य शासनाच्या जुलमी कारवाईच्या निषेधार्थ रास्तारोको आंदोलन करणार्‍या...

नगर जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या या आमदारांंच्या अडचणीत वाढ होणार ?

माय महाराष्ट्र न्यूज:नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात मतदारांची दिशाभूल करणारी माहिती दिल्याचा आरोप करीत येथील निर्भय नवजीवन फाउंडेशनचे संदीप अशोक...

महाराष्ट्रात पहिलीपासून शाळा सुरू करण्यासाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचना जारी

माय महाराष्ट्र न्यूज: येत्या 1 डिसेंबरपासून राज्यात पहिलीपासून शाळा सुरू करण्यास शालेय शिक्षण विभागाने मान्यता दिली असून यासंदर्भातील मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत....

राऊतांच्या मुलींच्या लग्नात सुप्रिया सुळे व संजय राऊतांचा डान्स, विखे-पाटील म्हणतात….

माय महाराष्ट्र न्यूज:संजय राऊत यांची कन्या पूर्वशी राऊत उद्या (सोमवार 29 नोव्हेंबर रोजी) विवाहबंधनात अडकणार आहे. ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे चिरंजीव मल्हार यांच्याशी...
error: Content is protected !!