Friday, December 3, 2021

मोहटा देवस्थानमध्ये निर्बंध कायम ठेऊन नवरात्रोत्सव

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:राज्य सरकारच्या आदेशानुसार मोहटा देवस्थानमध्ये अनेक निर्बंध कायम ठेऊन नवरात्रोत्सव होणार असून नो मास्क,नो दर्शन या नियमांचे काटेकोर पालन करून मिरवणूक,महाप्रसाद वाटप,मंदिर परिसरात घटी बसणे यासह सार्वजनिक उत्सवांना प्रतिबंध करण्यात आला आहे.

करोना साथ रोगाच्या पार्श्वभूमीवर मंदिर उघडणार असल्याने भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढू शकते असे गृहीत धरून संरक्षण व पार्किंग व्यवस्था करण्यात येणार आहे. यावेळी प्रांताधिकारी केकाण म्हणाले, देवी दर्शनासाठी पायी चालत येणार्‍या भाविकांची संख्या पाहता पाथर्डी शहरातील वाहतुकीस

 अडथळा ठरणारी सर्व अतिक्रमणे, टपर्‍या, नवरात्रोत्सवासाठी पालिका व पोलिसांच्या संयुक्त कारवाईद्वारे हटविण्यात येऊन भाविकांसाठी रस्ता पूर्णपणे खुला करणार आहे.आगामी नवरात्रोत्सवपासून मोहटादेवी मंदिर देवस्थान खुले करण्यासाठी समितीच्या सभागृहात प्रशासकीय बैठकीचे आयोजन करण्यात आले.

अध्यक्षस्थानी प्रांताधिकारी देवदत्त केकाण तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंडे, तहसीलदार शाम वाडकर,पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण, सरपंच एरिना पालवे, विश्वस्त यांच्यासह पंचायत समिती, नगरपालिका, आरोग्य विभाग, वन विभाग, सार्वजनिक बांधकाम, परिवहन, ग्रामपंचायत, आपत्ती व्यवस्थापन,

वीज वितरण, पाणीपुरवठा आदी विभागाचे प्रतिनिधी उपस्थित होते.यात्रा व अन्य उत्सवा संदर्भात शासनाकडून अद्याप पर्यंत कोणत्याही मार्गदर्शक सूचना जारी झाल्या नसल्याने मंदिर उघडण्याबाबत बैठकीतून विचारविनिमय करण्यात आला.नवरात्र उत्सवासाठी जिल्हाधिकार्‍यांकडून आलेल्या

 आदेशानंतर अंतिम आराखडा तयार होईल. असे केकाण म्हणाले. बैठकीचे प्रास्ताविक मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश भणगे यांनी केले तर आभार विश्वस्त अशोक दहिफळे यांनी मानले.

ताज्या बातम्या

मोठी बातमी:जे नको व्हायला पाहिजे तेच झाले:ओमिक्रॉनचा भारतात शिरकाव

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिअंटमुळे सध्या जगभरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी आज पत्रकार परिषद...

पोलिसांकडून महिलेकडे शरीरसुखाची मागणी

माय महाराष्ट्र न्यूज:महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामध्ये आता आणखी एक भर पडली आहे. खाकी वर्दीला कलंकित करणारी घटना जळगाव जामोद तालुक्यात...

पुन्हा एखादा अजित पवार होणार नाही याची काळजी घ्या :या नेत्यांचे मोठं विधान

माय महाराष्ट्र न्यूज:मुसलमानांनी सावध राहायला पाहिजे. इथल्या आंबेडकरी चळवळीने सावध राहील पाहिजे. मग अखिलेश यादव असतील, ममता बॅनर्जी असतील. काँग्रेसचे आणि  भाजपाच साटंलोट असल्याचं...

नगर ब्रेकिंग : स्विफ्ट कार व मोटरसायकलचा मोठा अपघात तीन तरुण गंभीर जखमी

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपुर-नेवासा रस्त्यावर असणाऱ्या अजित पवार पॉलिटेक्निक कॉलेज, वडाळा महादेव च्या समोर नेवासाकडून श्रीरामपूरकडे येणाऱ्या स्विफ्ट डिझायर एमएच.१८ ऐजे ८३६९ ने...

महाराष्ट्र शासनानं पुन्हा या नियमावलीत बदल

माय महाराष्ट्र न्यूज:ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या सुचनेनुसार राज्य शाससानं काल विमान प्रवासासंदर्भात नियमावली जाहीर केली होती. त्यानुसार, इतर राज्यांतून महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या विमान...

त्या’ वक्तव्यावरुन बाळासाहेब थोरात संतापले राष्ट्रवादीच्या या मंत्र्यांला म्हणाले तेवढी पात्रताच नाही

माय महाराष्ट्र न्यूज:पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्यात केलेल्या टीकेनंतर राज्यात काँग्रेस नेत्यांनी नाराजीचा सूर लावला आहे. देशातील दमनशाहीच्या विरोधात रस्त्यावर उतरून...
error: Content is protected !!