Friday, December 3, 2021

सणासुदीत SBI ची ग्राहकांसाठी जबरदस्त ऑफर

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: एसबीआय कार्डने सणासुदीच्या काळात ग्राहकांसाठी ‘दमदार दस’ कॅशबॅक ऑफर जाहीर केली आहे. ही ऑफर 3 ऑक्टोबर 2021 पासून 3 दिवसांसाठी असेल. एसबीआय कार्डने सांगितले की, तीन दिवसांच्या मेगाशॉपिंग फेस्टिव्ह ऑफर अंतर्गत, रिटेल कार्डधारकांना कोणत्याही घरगुती ई-कॉमर्स वेबसाइटवर ऑनलाइन खरेदी करण्याची संधी मिळेल.

ऑफर अंतर्गत ग्राहक त्यांच्या खरेदीवर 10 टक्के कॅशबॅक घेऊ शकतात.एसबीआय कार्डचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी राममोहन राव अमारा म्हणाले, ‘आम्हाला डेटा विश्लेषणामध्ये आढळलं की, कार्डधारक अधिक ऑनलाइन खरेदी करत आहेत. विशेषत: सणासुदीच्या काळात

 हा ट्रेंड सर्व प्लॅटफॉर्म आणि उत्पादन श्रेणींमध्ये दिसून आला आहे. या ऑफरअंतर्गत कार्डधारक कोणत्याही वेळी सुरक्षित आणि सोयीस्कर पद्धतीनं पेमेंट करू शकतील.’ ते म्हणाले की, SBI कार्डनं या ऑफरद्वारे कार्डधारकांना सोयीस्कर, सुलभ आणि सुरक्षित पेमेंट

सोल्यूशन्स प्रदान करण्यासाठी आम्ही वचनबद्ध असल्याची बाबही आम्हाला ग्राहकांपर्यंत पोहोचवायची आहे.फेस्टिव्ह ऑफर 2021 अधिक आकर्षक करण्यासाठी, SBI कार्डनं अभिनेता जावेद जाफरीसोबत डिजिटल जाहिरात मोहीम सुरू केली आहे. हा कॅशबॅक मोबाईल फोन आणि अॅक्सेसरीज,

टीव्ही आणि मोठी उपकरणं, लॅपटॉप आणि टॅब्लेट, होम फर्निशिंग, किचन उपकरणं, फॅशन आणि लाइफस्टाइल, स्पोर्ट आणि फिटनेस यासारख्या उत्पादनांच्या खरेदीवर उपलब्ध असेल. मात्र, ही ऑफर विमा, प्रवास, पाकीट, दागिने, शिक्षण आणि युटिलिटी मर्चंटस् यासारख्या काही श्रेणींमधील ऑनलाइन खर्चावर लागू होणार नाही.

ताज्या बातम्या

मोठी बातमी:जे नको व्हायला पाहिजे तेच झाले:ओमिक्रॉनचा भारतात शिरकाव

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिअंटमुळे सध्या जगभरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी आज पत्रकार परिषद...

पोलिसांकडून महिलेकडे शरीरसुखाची मागणी

माय महाराष्ट्र न्यूज:महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामध्ये आता आणखी एक भर पडली आहे. खाकी वर्दीला कलंकित करणारी घटना जळगाव जामोद तालुक्यात...

पुन्हा एखादा अजित पवार होणार नाही याची काळजी घ्या :या नेत्यांचे मोठं विधान

माय महाराष्ट्र न्यूज:मुसलमानांनी सावध राहायला पाहिजे. इथल्या आंबेडकरी चळवळीने सावध राहील पाहिजे. मग अखिलेश यादव असतील, ममता बॅनर्जी असतील. काँग्रेसचे आणि  भाजपाच साटंलोट असल्याचं...

नगर ब्रेकिंग : स्विफ्ट कार व मोटरसायकलचा मोठा अपघात तीन तरुण गंभीर जखमी

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपुर-नेवासा रस्त्यावर असणाऱ्या अजित पवार पॉलिटेक्निक कॉलेज, वडाळा महादेव च्या समोर नेवासाकडून श्रीरामपूरकडे येणाऱ्या स्विफ्ट डिझायर एमएच.१८ ऐजे ८३६९ ने...

महाराष्ट्र शासनानं पुन्हा या नियमावलीत बदल

माय महाराष्ट्र न्यूज:ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या सुचनेनुसार राज्य शाससानं काल विमान प्रवासासंदर्भात नियमावली जाहीर केली होती. त्यानुसार, इतर राज्यांतून महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या विमान...

त्या’ वक्तव्यावरुन बाळासाहेब थोरात संतापले राष्ट्रवादीच्या या मंत्र्यांला म्हणाले तेवढी पात्रताच नाही

माय महाराष्ट्र न्यूज:पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्यात केलेल्या टीकेनंतर राज्यात काँग्रेस नेत्यांनी नाराजीचा सूर लावला आहे. देशातील दमनशाहीच्या विरोधात रस्त्यावर उतरून...
error: Content is protected !!