Friday, December 3, 2021

आ.निलेश लंके नगर लोकसभेसाठीचे उमेदवार ? प्रदेशाध्यक्ष पाटील यांचे सूतोवाच

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात विधानसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आठ जागा लढवत आली आहे, त्यातील 2019 च्या निवडणुकीत सहा मतदारसंघात पक्षाने विजय मिळवत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. मात्र दुसरीकडे लोकसभा निवडणुकीत वाट्याला येत असलेल्या नगर दक्षिणची जागा जिंकण्यात पक्षाला सातत्याने अपयश आलेले आहे.

परिवार संवाद यात्रेच्या निमित्ताने पारनेर इथे आलेले प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना याबाबत छेडले असता त्यांनी पक्ष संघटना यावर पूर्ण विचार करून असून येणाऱ्या 2024च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार या ठिकाणाहून निश्चित निवडून येईल असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केलाय.

लोकसभेच्या आगामी निवडणुकी साठी पारनेरचे आमदार नितेश लंके यांच्या नावाची होणार्या चर्चे बाबत जयंत पाटील यांना छेडले असता त्यांनी यावर स्पष्ट न बोलता, होय, पक्ष आगामी लोकसभा निवडणुक जिंकण्याच्या दृष्टीने पूर्ण तयारीत असून आगामी निवडणूक पक्ष ही जागा नक्की जिंकेल असा विश्वास व्यक्त केला.

2019च्या निवडणूक नगरचे आ.संग्राम जगताप यांनी लढवली होती. पक्षाच्या अनेक मातब्बर नेत्यांनी लोकसभा निवडणुक लढवण्यास अनुउत्सुकता दाखवल्याने संग्राम जगताप यांना उमेदवारी देण्यात आली. त्यावेळी ऐनवेळी भाजपात गेलेले डॉ. सुजय विखे यांनी अटीतटीच्या लढतीत संग्राम जगताप यांचा पराभव केला होता.

या अगोदरही नगर दक्षिणेची जागा भाजपने सातत्याने जिंकली आहे. या पार्श्वभूमीवर विधानसभेत विजय मिळत असताना आणि लोकसभा मतदारसंघात चांगले पक्ष संघटन, नेते असताना राष्ट्रवादी लोकसभा निवडणुकीत पराभूत होत असल्याने पक्षाने 2024 साठी गांभीर्याने विचार आतापासूनच केलेला आहे.

या दृष्टीने सध्या केवळ मतदारसंघात अथवा जिल्ह्यात नव्हे तर राज्यात विविध उपक्रमांनी चर्चेत असलेले पारनेरचे आमदार नितेश लंके यांच्या उमेदवारीचा विचार पक्ष पातळीवर होत असल्याची चर्चा आहे. त्या दृष्टीने लंके यांना तयारीत राहण्याच्या सूचना दिल्याची सूत्रांची माहिती आहे. अर्थात लोकसभा निवडणुकीला

 अजून बराच अवधी असल्याने याबाबत ऐनवेळी पक्ष निर्णय घोषित करू शकतो. मात्र 2019 प्रमाणेच 2024 ला मातब्बरांऐवजी लोकप्रिय असलेल्या पक्षातील व्यक्तीला संधी मिळू शकते आणि हा उमेदवार युवा असू शकतो, त्यादृष्टीने आ.निलेश लंके यांना आगामी लोकसभा निवडणुकीची उमेदवारी गृहीत धरली जात आहे.

ताज्या बातम्या

मोठी बातमी:जे नको व्हायला पाहिजे तेच झाले:ओमिक्रॉनचा भारतात शिरकाव

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिअंटमुळे सध्या जगभरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी आज पत्रकार परिषद...

पोलिसांकडून महिलेकडे शरीरसुखाची मागणी

माय महाराष्ट्र न्यूज:महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामध्ये आता आणखी एक भर पडली आहे. खाकी वर्दीला कलंकित करणारी घटना जळगाव जामोद तालुक्यात...

पुन्हा एखादा अजित पवार होणार नाही याची काळजी घ्या :या नेत्यांचे मोठं विधान

माय महाराष्ट्र न्यूज:मुसलमानांनी सावध राहायला पाहिजे. इथल्या आंबेडकरी चळवळीने सावध राहील पाहिजे. मग अखिलेश यादव असतील, ममता बॅनर्जी असतील. काँग्रेसचे आणि  भाजपाच साटंलोट असल्याचं...

नगर ब्रेकिंग : स्विफ्ट कार व मोटरसायकलचा मोठा अपघात तीन तरुण गंभीर जखमी

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपुर-नेवासा रस्त्यावर असणाऱ्या अजित पवार पॉलिटेक्निक कॉलेज, वडाळा महादेव च्या समोर नेवासाकडून श्रीरामपूरकडे येणाऱ्या स्विफ्ट डिझायर एमएच.१८ ऐजे ८३६९ ने...

महाराष्ट्र शासनानं पुन्हा या नियमावलीत बदल

माय महाराष्ट्र न्यूज:ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या सुचनेनुसार राज्य शाससानं काल विमान प्रवासासंदर्भात नियमावली जाहीर केली होती. त्यानुसार, इतर राज्यांतून महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या विमान...

त्या’ वक्तव्यावरुन बाळासाहेब थोरात संतापले राष्ट्रवादीच्या या मंत्र्यांला म्हणाले तेवढी पात्रताच नाही

माय महाराष्ट्र न्यूज:पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्यात केलेल्या टीकेनंतर राज्यात काँग्रेस नेत्यांनी नाराजीचा सूर लावला आहे. देशातील दमनशाहीच्या विरोधात रस्त्यावर उतरून...
error: Content is protected !!