Tuesday, November 30, 2021

आज पुन्हा एकदा पेट्रोल-डिझेल महागलं, पाहा किती झाली वाढ

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:सरकारी तेल कंपन्यांनी जवळपास 22 दिवसांनंतर मंगळवारी 28 सप्टेंबर रोजी पेट्रोल दरात वाढ केली होती. तर सलग चौथ्या दिवशी डिझेल किंमतीतही वाढ करण्यात आली होती. मंगळवारी पेट्रोल दरात 20 पैसे वाढ करण्यात आली आहे.

देशभरात मागील 4 दिवसांत डिझेल दरात 4 वेळा वाढ झाली आहे. या चार दिवसांत डिझेल 95 पैसे प्रति लीटरने महागलं. भारतीय तेल कंपन्यांनी 24 सप्टेंबर रोजी 20 पैसे, तर 26 सप्टेंबरला 25 पैसे वाढ केली होती. 27 सप्टेंबरला पुन्हा 25 पैशांची वाढ झाली. त्यानंतर 28 सप्टेंबरला पुन्हा 25 पैशांची वाढ करण्यात आली. त्यानंतर आज पुन्हा 30 सप्टेंबर रोजी डिझेल दरात 30 पैसे प्रति लीटरची वाढ झाली आहे.

>> दिल्लीत पेट्रोल 101.64 रुपये आणि डिझेल 89.87 रुपये प्रति लीटर

>> मुंबईमध्ये पेट्रोल 107.71 रुपये आणि डिझेल 97.52 रुपये प्रति लीटर

आंतरराष्ट्रीय स्तरावर तेल दरात सलग पाचव्या दिवशी वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किंमती तीन वर्षांत पहिल्यांदा 80 डॉलर प्रति बॅरल जवळपास पोहोचू शकतात. सध्या कच्च्या तेलाच्या किंमतीत दिलासा मिळण्याची शक्यता नाही. त्यामुळे देशात पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढू शकतात.

सरकारी तेल कंपन्यांनी आज एक दिवसानंतर पुन्हा एकदा पेट्रोल-डिझेल दरात वाढ केली आहे. देशातील जवळपास सर्व शहरांत आज पेट्रोल दरात जवळपास 25 पैसे प्रति लीटर, तर डिझेल दरात 30 पैसे प्रति लीटरची वाढ करण्यात आली आहे. इंडियन ऑईन

कॉर्पोरेशननुसार (IOCL), दिल्लीत पेट्रोल 101.64 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 89.87 रुपये प्रति लीटर आहे. मुंबईत पेट्रोल दर 107.47 रुपये प्रति लीटरवर पोहोचला आहे.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यातील धक्कादायक घटना:पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात एक अतिशय धक्कादायक बातमी समोर येत आहे.पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीने गळफास लावून घेत आत्महत्या केली. गोपीचंद रोहिदास भोसले (वय 30...

नगर जिल्ह्यातील अतिशय दुर्देवी घटना: दोघा सख्ख्या भावंडांचा बुडून मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील निळवंडे जलाशयावर आंघोळीसाठी गेलेल्या राजूर येथील दोन भावंडांचा रविवारी (२८ नोव्हेंबर) सायंकाळी पाण्याच्या भोवर्‍यात बुडून दुर्देवी मृत्यू झाल्याने राजूर...

भाजपच्या आमदार मोनिका राजळे यांना पोलिसांनी केली अटक

माय महाराष्ट्र न्यूज:कृषीपंपाच्या थकित वीज बिलाच्या वसुलीसाठी महावितरण कंपनीने शेतीपंपाचा वीजपुरवठा खंडीत केला जात आहे. या राज्य शासनाच्या जुलमी कारवाईच्या निषेधार्थ रास्तारोको आंदोलन करणार्‍या...

नगर जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या या आमदारांंच्या अडचणीत वाढ होणार ?

माय महाराष्ट्र न्यूज:नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात मतदारांची दिशाभूल करणारी माहिती दिल्याचा आरोप करीत येथील निर्भय नवजीवन फाउंडेशनचे संदीप अशोक...

महाराष्ट्रात पहिलीपासून शाळा सुरू करण्यासाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचना जारी

माय महाराष्ट्र न्यूज: येत्या 1 डिसेंबरपासून राज्यात पहिलीपासून शाळा सुरू करण्यास शालेय शिक्षण विभागाने मान्यता दिली असून यासंदर्भातील मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत....

राऊतांच्या मुलींच्या लग्नात सुप्रिया सुळे व संजय राऊतांचा डान्स, विखे-पाटील म्हणतात….

माय महाराष्ट्र न्यूज:संजय राऊत यांची कन्या पूर्वशी राऊत उद्या (सोमवार 29 नोव्हेंबर रोजी) विवाहबंधनात अडकणार आहे. ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे चिरंजीव मल्हार यांच्याशी...
error: Content is protected !!