भेंडा(नेवासा)
माणसाला वेगवेगळे आजार होतात, त्याच्यावरती रिसर्च सायंटिस्ट रिसर्च करत असतात आणि वेगवेगळे औषध उपलब्ध होत असतात. पण सर्वसामान्यांना या गोष्टीचं ज्ञान नसते.म्हणून आरोग्य साक्षरता ही अत्यंत महत्वाची आहे. एका विचाराने सेवभावी नेटवर्क उभे करून संत नागेबाबा परिवाराने आरोग्य साक्षरतेच्या माध्यमातुन रुग्णांच्या दीर्घायुष्यसाठी हाती घेतलेले रुग्णसेवेचे हे महान कार्य कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन माजी आमदार नरेंद्र घुले पाटील यांनी केले.
नेवासा तालुक्यातील भेंडा येथे संत नागेबाबा परिवार व सोशल फाउंडेशन अहमदनगर यांचे संयुक्त विदयमाने आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत असलेल्या मुंबई येथील विनोद साडविलकर, श्रद्धा अष्टविकर,धनंजय पवार यांचेसह ३५ रुग्णमित्रांचा सन्मान माजी आमदार नरेंद्र घुले पाटील यांचे हस्ते करण्यात आला.त्यावेळी ते बोलत होते.
माजी आमदार पांडुरंग अभंग, बाळासाहेब मुरकुटे,संत नागेबाबा परिवाराचे मार्गदर्शक कडुभाऊ काळे,काशीनाथ नवले, जिल्हा शल्यचिकिस्तक डॉ.वसंतराव जमदाडे,गणेश गव्हाणे,आरोग्यमित्र सुभाष गायकवाड, अशोकराव मिसाळ, दत्तात्रय काळे,अजित रसाळ,मोहनराव गायकवाड,डॉ. शिवाजी शिंदे,तुकाराम मिसाळ आदी यावेळी उपस्थित होते.
मुंबईच्या प्रसन्ना फाउंडेशनच्या अध्यक्ष श्रद्धा अष्टविकर यांनी आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्याची माहिती सांगितली. रमेश चव्हाण, चारुदत्त पावसकर, अमिता शर्मा, प्रज्वला इंगळे, विनोद साडवीलकर, नविनकुमार पांचाळ, दिनेश गोसावी, वसंत सुतार आदी रुग्णमित्रांची आरोग्य सेवचं महत्व सांगितले. तर रुग्णमित्र राजेंद्र ढगे यांनी वैधकीय घडामोडी व शासकीय योजनांची सविस्तर माहिती दिली.
संजय मनवेलीकर यांनी प्रस्ताविक केले. प्रा.सविता नवले यांनी सुत्रसंचालन केले. भरत दारुंटे यांनी आभार मानले.
*किडनी प्रत्यारोपणासाठी आता पाच लाख रुपये…*
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष प्रमुख तथा विशेष कार्य अधिकारी मंगेश चिवटे हे काही कारणास्तव कार्यक्रमास उपस्थित राहु शकले नाही,मात्र वीडियो कॉल व्दारे त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला.
ते म्हणाले,आज भेंडा येथे येण्याची खूप ईच्छा होती,मात्र जागतिक महिला दिनानिमित्त महाबलेश्वर मध्ये मोठे आरोग्य शिबिर सुरु आहे त्यामुळे येऊ शकलो नाही.
किडनी प्रत्यारोपणासाठी आता पाच लाख रुपये देणार आहोत. आगामी काळात आरोग्य व्यवस्थांमध्ये मूलभूत सुविधा करण्याचा राज्य सरकारचा मानस आहे. आरोग्य मित्रांच्या सूचनांचे स्वागत केले जाईल व सर्व मिळून रुग्ण सेवेचे काम करू.