Saturday, November 27, 2021

नगर जिल्ह्यात शरद पवार-नितीन गडकरी शनिवारी एका व्यासपीठावर;हे आहे कारण

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: नगरमध्ये होणाऱ्या एका कार्यक्रमात गडकरी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार एका व्यासपीठावर येत आहेत. राष्ट्रीय रस्ते विकास प्राधिकरण आणि स्थानिक भाजप शाखेच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाला पवार यांना बोलविण्याची सूचना स्वत: गडकरी यांनीच केल्याचे सांगण्यात आले.

अहमदनगर जिल्ह्यातील विविध चार महामार्गांचे भूमिपूजन आणि चार महामार्गांचे लोकार्पण २ ऑक्टोबरला करण्यात येणार आहे. नगर शहराजवळ केडगाव परिसरात शनिवारी सकाळी १० वाजता हा कार्यक्रम होणार आहे. यासाठी पवार आणि गडकरी एकत्र येत आहेत.

नगर शहर भाजपचे जिल्हाध्यक्ष भय्या गंधे यांनी यासंबंधीची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, सुमारे चार हजार कोटी रुपये खर्चांची महामार्गांची कामे मंजूर झालेली आहेत. त्यांचे भूमिपूजन या दिवशी होणार आहे. यामध्ये नगर-करमाळा हा महामार्गा चार पदरी होणार आहे. त्यासाठी सुमारे दोन हजार कोटी रुपयांचा खर्च होणार आहे.

सावळीविहिर ते नगर बायपास रुंदीकरण, नगर-भिंगार रस्ता रुंदीकरण यासह राष्ट्रीय राखीव निधीतून दुरूस्तीच्या कामाचे भूमिपूजन यावेळी करण्यात येणार आहे. याशिवाय नगर-दौंड, नगर- कडा- जामखेड, कोपरगाव वैजापूर अशा काम पूर्ण झालेल्या रस्त्यांचे औपचारिक उद्घाटनही यावेळी करण्यात येणार आहे.

यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, खासदार सदाशिव लोखंडे यांच्यासह आमदार आणि अन्य लोकप्रतिनिधीही उपस्थित राहणार आहेत, असेही गंधे यांनी सांगितले.पवार व गडकरी यांच्या एकत्र येण्याबद्दल गंधे म्हणाले, ‘याला राजकीय किंवा पक्षीय संदर्भ नाही. गडकरी यांच्या सूचनेनुसारच

पवार यांना प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित करण्यात आले आहे. विकासकामे करताना राजकारण आणि पक्षीय मतभेद दूर ठेवावेत. सर्वांना सोबत घेऊन काम करावे, ही गडकरी यांची पद्धत आहे. त्यानुसार हा कार्यक्रम होत आहे.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यात एकच खळबळ:काटवनात आढळला तरुणाचा मृतदेह, घातपात की आत्महत्या

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथील तळेगाव प्रादेशिक पाणी योजनेच्या साठवण तलावानजीक रस्त्याच्याकडेच्या काटवनात तळेगाव दिघे (वामनवाडी) येथील तरुणाचा मृतदेह आढळून आला. शुक्रवारी...

बापरे : पती-पत्नी मिळून चालवायचे देह विक्रीचा व्यवसाय

माय महाराष्ट्र न्यूज: पोलिसांनी मानवी तस्करीचा भांडाफोड केला आहे. हे तस्कर बांग्लादेशातून तरुणी आणून भारतात देह व्यापाराच्या व्यवसायाता ढकलत होते. पोलिसांनी टोळीच्या प्रमुखासह 8...

मोठी बातमी:महाराष्ट्रात सरकार पाडण्याच्या हालचाली?आज अमित शहा, देवेंद्र फडणवीस व शरद पवार दिल्लीत भेट ?

माय महाराष्ट्र न्यूज:केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी महाराष्ट्रात मार्चमध्ये भाजपचे सरकार येणार असा दावा केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. त्यातच महाराष्ट्रातील अनेक नेते...

धक्कादायक :महिला पोलीस कर्मचाऱ्याचे नावे सोशल मीडियावर बनावट अकाउंट, अश्लील Video केला शेअर

माय महाराष्ट्र न्यूज: पुणे शहर पोलीस विभागातील एका महिला कर्मचार्‍याच्या नावाने फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडियावर बनावट अकाउंट तयार करून त्यावर अश्लील व्हिडिओ...

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांचा मृत्यूदर चिंताजनक

माय महाराष्ट्र न्यूज: राज्यामध्ये कोरोनाची तिसरी लाट येणार की नाही याबाबत मतमतांतरे आहेत. तिसरी लाट जरी आली तरी अतिशय सौम्य प्रमाणात असल्याचा दावा राज्याचे...

नगर जिल्हा रुग्णालय :१४ जणांचा बळी घेणारी आग कशी लागली? अहवाल तयार

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्हा रुग्णालयाच्या कोविड अतिदक्षता विभागात ६ नोव्हेंबरला लागलेल्या आगीचा अहवाल राज्य सरकारने नेमलेल्या चौकशी समितीने तयार केला आहे. सुमारे ६५...
error: Content is protected !!