Wednesday, December 8, 2021

आजच पूर्ण करा ही 6 कामे अन्यथा होईल मोठं नुकसान

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:उद्यापासून ऑक्टोबर महिन्याला सुरुवात होत आहे. 1 ऑक्टोबरपासून बँकेसंबंधी तसंच काही आर्थिक नियमांमध्ये बदल होणार आहेत. त्यामुळे तुम्ही बँकेत जाऊन आपला मोबाईल नंबर अपडेट करण्यासह इतर महत्त्वाची कामं

तुम्ही केली आहेत का? या प्रश्नाचे उत्तर नाही असेल, तर आज 30 सप्टेंबरला तुम्हाला सर्वात प्रथम बँकेसंबंधी महत्त्वाची कामं करून घ्या.नाहीतर आगामी काळात तुम्हाला त्रास होण्याची शक्यताही नाकारता येत नाही.

1) पंजाब नॅशनल बँकेने 30 सप्टेंबरपर्यंत गृहकर्जावर प्रोसेसिंग फी आणि डॉक्युमेंटेशन चार्ज न आकारण्याचा निर्णय घेतलाय. बँक 6.80 टक्के व्याज दराने गृहकर्ज देत आहे. तुम्ही पीएनबीकडून गृहकर्ज घेण्याचा विचार करत असाल तर आज या ऑफरचा लाभ घेण्याची शेवटची संधी आहे.

2. पीएम शेतकरी सन्मान निधी योजनेसाठी आजच करा रजिस्टर
:अंतर्गत शेतकऱ्यांना 4000 रुपये मिळवण्याची आज शेवटची संधी आहे. जर तुम्हाला पीएम शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत पैसे मिळवायचे असतील तर 30 सप्टेंबरपूर्वी नोंदणी करणं आवश्यक आहे. तुम्ही आज रजिस्टर केलं तर तुम्हाला याआधी जारी करण्यात आलेला नववा हप्ता आणि पुढे येणारा दहावा हप्ता असे दोन्ही हप्त्याचे मिळून चार हजार मिळतील. लवकरच दहावा हप्ता जारी केला जाणार आहे.

3) आजच करा ई-नॉमिनेशन:
कर्मचारी भविष्य निधी संघटनेने आपल्या सदस्यांना ई-नॉमिनेशन प्रक्रिया पूर्ण करण्याचा सल्ला दिला आहे. यामुळे खातेदाराच्या कुटुंबाला सामाजिक सुरक्षा मिळते. ईपीएफ / ईपीएससाठी ई-नॉमिनेशन कसे भरता येईल, याची माहिती ईपीएफओ सातत्याने ट्विट करून देत आहे. ईपीएफओ सदस्यांना कर्मचारी ठेव लिंक्ड इन्शुरन्स स्कीम अंतर्गत विमा संरक्षणाची सुविधा देखील मिळते.

योजनेमध्ये नामनिर्देशित व्यक्तीला जास्तीत जास्त 7 लाख रुपयांचे विमा संरक्षण दिले जाते. जर एखादा सदस्याचा मुत्यू झाला, आणि त्याने नॉमिनेशन अर्ज भरला नसेल, तर अशावेळी वारसदारांना पैसे देण्यात अडचणी येतात. त्यामुळे नामनिर्देशित व्यक्तीची माहिती अपडेट करणे गरजेचे आहे. अन्यथा लाखोंचे नुकसान होऊ शकते.

4). ऑटो डेबिट पेमेंट प्रणालीत बदल
ऑटो डेबिट पेमेंट सिस्टम 1 ऑक्टोबरपासून लागू होणार आहे. ऑटो डेबिटचा अर्थ असा की, जर तुम्ही मोबाईल अॅप किंवा इंटरनेट बँकिंगमध्ये ऑटो डेबिट मोडमध्ये वीज, एलआयसी किंवा इतर कोणतीही बिलं सेव्ह केली असतील तर एका विशिष्ट तारखेला खात्यातून पैसे आपोआप कापले जातात.

दरम्यान या सुविधेचा लाभ घेण्यासाठी तुमचा अॅक्टिव्ह मोबाईल क्रमांक बँकेत अपडेट करणं आवश्यक आहे. जर तुमचा नंबर अपडेट झाला नसेल, तर आजच बँकेत जा. नवीन सिस्टीम अंतर्गत पेमेंट रक्कम ज्या दिवशी कापली जाणार आहे, त्या तारखेच्या 5 दिवस अगोदर बँकांना ग्राहकांच्या मोबाईलवर नोटिफिकेशन पाठवावं लागेल. नोटिकेशनला ग्राहकांची मान्यता

असणं आवश्यक आहे. 5000 पेक्षा जास्त रक्कमेचे पेमेंट असल्यास ओटीपी (OTP) अनिवार्य करण्यात आलाय. त्यामुळेच नवीन सुविधेचा लाभ घेण्यासाठी बँकेत तुमचा योग्य मोबाईल नंबर अपडेट करणं आवश्यक आहे.

5. बदलणार या तीन बँकांचे चेकबुक
:ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स आणि युनायटेड बँक ऑफ इंडिया आणि अलाहाबाद बँक यांचं जुनं चेकबुक 1 ऑक्टोबर 2021 पासून बंद होईल. त्यामुळे जर तुमच्याकडे या बँकांचं जुनं चेकबुक असेल तर 30 सप्टेंबरपर्यंत नवीन चेकबुकसाठी अर्ज करा, जेणेकरून तुम्हाला पुढील व्यवहारात कोणत्याही समस्येला सामोरे जावं लागणार नाही.

बँकेत जाऊन तुम्ही नवीन चेकबुक सहज मिळवू शकता. अलाहाबाद बँक ही इंडियन बँकेत तर ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स आणि युनायटेड बँक ऑफ इंडिया या दोन बँका पंजाब नॅशनल बँकेत विलीन झाल्या आहेत.

6). डीमॅट खात्याबाबतचा हा नियम:
शेअर बाजार नियामक सेबीने (SEBI) जारी केलेल्या नियमांनुसार नवीन ट्रेडिंग आणि डीमॅट खातं उघडण्यासंबंधी नियमांमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. यानुसार जर तुमच्याकडे डीमॅट खाते असेल, तर हे खाते 30 सप्टेंबरपर्यंत केवायसी (KYC) अपडेट करावे लागेल. केवायसी अपडेट केले नाही,

तर डीमॅट खाते निष्क्रिय केले जाईल. यामुळे तुम्हाला शेअर बाजारात व्यवहार करता येणार नाहीत. जरी एखाद्या व्यक्तीने एखाद्या कंपनीचे शेअर्स खरेदी केले, तरी हे शेअर्स खात्यात ट्रान्सफर करता येणार नाहीत. केवायसी पूर्ण आणि पडताळणी केल्यानंतरच त्याने विकत घेतलेले शेअर्स त्याच्या डी मॅट खात्यात जमा केले जातील.

ताज्या बातम्या

‘त्या’ वादग्रस्त विधानाप्रकरणी इंदुरीकर महाराजांना तूर्तास दिलासा

माय महाराष्ट्र न्यूज: अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी महिलांनाबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाविरोधात दाखल केलेल्या खटल्यात आज होणारी सुनावणी न्यायालयाने पुढे ढकलली आहे. तर...

त्या अभिनेत्रीला बलात्काराची धमकी;या खासदाराला द्यावा लागला राजीनामा

माय महाराष्ट्र न्यूज: अभिनेत्री माहिया माही हिला फोनवरून बलात्काराची धमकी दिल्यानंतर जमालपूरचे खासदार व देशाचे माहिती आणि प्रसारण मंत्री मुराद हसन यांनी आपल्या पदाचा राजीनामा...

 सर्दी, घसा खवखवणे अशी लक्षणे असणाऱ्या 3 पैकी 1 व्यक्तीला प्रत्यक्षात कोविड असू शकतो

माय महाराष्ट्र न्यूज:गेले दोन वर्षे संपूर्ण जग कोरोना विषाणूशी (Coronavirus) लढा देत आहे. सध्या जगभरात लसीकरणाद्वारे यावर मात केली जात आहे. गेल्या अनेक महिन्यांमध्ये...

आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आले हे महत्त्वाचे निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यातील न्यायसहायक विज्ञान संस्था मधून फॉरेन्सिक सायन्स पदवी व पदव्युत्तर पदवी विद्यार्थ्यांना न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाच्या अधिनस्त राज्यातील विविध प्रयोगशाळांमध्ये प्रतिवर्षी 150...

एकदिवसीय ऊस गाळपात ‘ज्ञानेश्वर’चा नवा उच्चांक

नेवासा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याने सध्या सुरू असलेल्या सन 2021-22 च्या हंगामात दि.07 डिसेंबर रोजी प्रतिदिन  7000...

नगर जिल्ह्यात या घाटात मध्यरात्री चारचाकी वाहनाला आग वाहन पूर्णतः जळून खाक;उलट-सुलट चर्चा सुरू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील करंजी घाट येथे मंगळवारी मध्यरात्री एका चारचाकी वाहनाला आग लागून या घटनेत हे चार चाकी वाहन पूर्णतः...
error: Content is protected !!