Friday, December 3, 2021

दोन डोस घेतल्यानंतर ही मेडिकल कॉलेजच्या 22 विद्यार्थ्यांना कोरोना

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: केईएम रुग्णालय आणि सेठ जी एस मेडिकल कॉलेजच्या 22 विद्यार्थ्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. या सर्व विद्यार्थ्यांनी कोविड प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतले होते तरी त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे म्हणून मास्क घालणं गरजेचं आहे. मागील दोन तीन दिवसांतच सर्वांना कोरोनाची लागण झाली आहे.

क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केल्यामुळे कोरोनाचा प्रसार झाल्याची शक्यता आहे.कोरोना अद्याप पूर्णपणे गेलेला नाहीये. कोरोनाचा संसर्ग झालेल्या विद्यार्थ्यांपैकी काही विद्यार्थ्यांना सेव्हन हिल्स रुग्णालयात उपचारासाठी दाखल कऱण्यात आले आहे. पुढील महिन्यात शाळा सुरू होत आहेत.

8 वी ते 12 पर्यंतचे वर्ग सुरू होतील. पालकांची संमती घेऊन विद्यार्थ्यांना शाळेत घेतलं जाईल. पालकांना विनंती आहे शाळा सुरू होत आहेत, तुमची परवानगी असेल तर प्रवेश मिळेल. या संदर्भात शाळा समिती कडे पालकांनी सम्पर्क करावा असंही महापौरांनी म्हटलं आहे.

दरम्यान 4 ऑक्टोबरपासून शाळा सुरू करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. पण, ‘विद्यार्थ्यांना शाळेत हजर राहण्याची सक्ती नाही. पालकांच्या संमतीशिवाय विद्यार्थ्यांनी शाळेत येऊ नये, कोरोनाची संपूर्ण खबरदारी घेऊनच विद्यार्थ्यांना शाळेत पाठवावे, असं शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केलं आहे.

शाळेत येताना घ्यावयाची काळजी
:मुलांना शाळेत पायी येण्यासाठी शिक्षकांनी प्रोत्साहित करावे.ज्या शाळांमध्ये स्कूल बस, खाजगी वाहनाद्वारे विद्यार्थी येतात अशा वाहनांमध्ये एका सिटवर एकच विद्यार्थी बसून प्रवास करेल याची दक्षता घेण्यात यावी.विद्यार्थी बसमध्ये चढताना व उतरताना विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी वाहन चालक / वाहक यांनी विद्यार्थ्यांना सॅनिटायझरचा वापर करण्यास प्रोत्साहित करावे.

शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी सूचना:जेवण आणि इतर बाबी केल्यानंतर साबण किंवा सॅनिटायझरने हात धुण्याबाबत विद्यार्थ्यांना सतत सूचना द्याव्यात.

विद्यार्थ्यांनी गृहपाठ ऑनलाईन पद्धतीने सादर करण्याबाबत निर्देश द्यावेत. जेणेकरुन विद्यार्थ्यांमध्ये पुस्तकांची अदलाबदल होणार नाही.वेळ असल्यास गृहपाठ शक्यतो वर्गामध्येच करुन घ्यावा.

ताज्या बातम्या

मोठी बातमी:जे नको व्हायला पाहिजे तेच झाले:ओमिक्रॉनचा भारतात शिरकाव

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिअंटमुळे सध्या जगभरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी आज पत्रकार परिषद...

पोलिसांकडून महिलेकडे शरीरसुखाची मागणी

माय महाराष्ट्र न्यूज:महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामध्ये आता आणखी एक भर पडली आहे. खाकी वर्दीला कलंकित करणारी घटना जळगाव जामोद तालुक्यात...

पुन्हा एखादा अजित पवार होणार नाही याची काळजी घ्या :या नेत्यांचे मोठं विधान

माय महाराष्ट्र न्यूज:मुसलमानांनी सावध राहायला पाहिजे. इथल्या आंबेडकरी चळवळीने सावध राहील पाहिजे. मग अखिलेश यादव असतील, ममता बॅनर्जी असतील. काँग्रेसचे आणि  भाजपाच साटंलोट असल्याचं...

नगर ब्रेकिंग : स्विफ्ट कार व मोटरसायकलचा मोठा अपघात तीन तरुण गंभीर जखमी

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपुर-नेवासा रस्त्यावर असणाऱ्या अजित पवार पॉलिटेक्निक कॉलेज, वडाळा महादेव च्या समोर नेवासाकडून श्रीरामपूरकडे येणाऱ्या स्विफ्ट डिझायर एमएच.१८ ऐजे ८३६९ ने...

महाराष्ट्र शासनानं पुन्हा या नियमावलीत बदल

माय महाराष्ट्र न्यूज:ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या सुचनेनुसार राज्य शाससानं काल विमान प्रवासासंदर्भात नियमावली जाहीर केली होती. त्यानुसार, इतर राज्यांतून महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या विमान...

त्या’ वक्तव्यावरुन बाळासाहेब थोरात संतापले राष्ट्रवादीच्या या मंत्र्यांला म्हणाले तेवढी पात्रताच नाही

माय महाराष्ट्र न्यूज:पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्यात केलेल्या टीकेनंतर राज्यात काँग्रेस नेत्यांनी नाराजीचा सूर लावला आहे. देशातील दमनशाहीच्या विरोधात रस्त्यावर उतरून...
error: Content is protected !!