Friday, December 3, 2021

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बळकट करण्यासाठी कामाला लागा-ना.जयंतराव पाटील

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा

राष्ट्रवादी काँग्रेस हा सर्व जातीधर्मातील,समाजाला प्रतिनिधित्व देणारा पक्ष आहे.शरद पवार साहेबांसारखे उत्तुंग आणि पितृतुल्य नेतृत्व आपल्या पक्षाकडे आहे.त्यामुळे तालुका-गाव पातळीवर बूथ कमिट्या करून संगठण मजबूत करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बळकट करण्यासाठी कामाला लागा असे आदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष व राज्याचे जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांनी दिले.

नेवासा तालुक्यातील भेंडा येथे राष्ट्रवादी परिवार संवाद पर्व अंतर्गत कार्यकर्त्यांशी संवाद साधतांना ना.पाटील बोलत होते. व्यासपीठावर माजी आमदार नरेंद्र घुले पाटील,माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील, महिला प्रदेशाध्यक्षा रूपालिताई चाकणकर,जिल्हा अध्यक्ष राजेंद्र फाळके,माजी आमदार पांडुरंग अभंग,अड.देसाई देशमुख,डॉ.क्षितिज घुले पाटील,प्रताप काका ढाकणे,संदीप वरपे,संजय कोळगे,प्रा.सीताराम काकडे, राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख,राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे,नेवासा तालूका निरीक्षक अंबादास गारूडकर,अमोल अभंग आदी उपस्थित होते.

ना.पाटील पुढे म्हणाले,मागील निवडणुकीत विधानसभेच्या 114 जागा लढविल्या,त्यापैकी 54 जागा मिळाल्या.पराभूत 60 जागांचे काय ? या 60 जागांवर सुधारणा करण्यासाठी सर्व मतदार संघाचा दौरा करण्यात येत आहे.पवार साहेबांसारखे उत्तुंग नेतृत्व पक्षाकडे असतांना ही पक्ष का वाढत नाही असा प्रश्न प्रत्येक कार्यकर्त्याने आपल्या मनाला विचारून पक्षाचा विस्तार कसा वाढविता येईल यासाठी प्रयत्न करावेत.भले कोणी कोणाशी ही आघाडी करू,आपण त्याला मदत करू परंतु आपले सैन्य आणि आपली यंत्रणा तयार ठेवा,गाफील राहू नका.

राज्यात सरकार येऊन दीड पावणे दोन वर्षे झाले,बराच कालावधी कोरोनाचे संकटात गेला,सरकारच्या तिजोरीत पैसे येणे बंद झाले तरी ही सरकारने शेतकऱ्यांचे दोन लाखा पर्यंतची कर्ज माफी केली.आता निसर्गाची अवकृपा होत आहे.अतिवृष्टीचा सर्वात मोठा फटका शेतकऱ्यांना बसतो.त्याचे एक पीक वाया गेले तर त्याचे सर्व बजेट बिघडते.अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून सरकार लवकरात लवकर योग्य ती मदत करेल असे ही ना.पाटील यांनी सांगितले.

यावेळी माजी आमदार नरेंद्र घुले पाटील,माजी आमदार पांडुरंग अभंग, तालुका अध्यक्ष काशीनाथ नवले आदींची भाषणे झाली.यावेळी तुकाराम मिसाळ,अशोक चौधरी, गफूरभाई बागवान,महिला तालुका अध्यक्षा संगीता गव्हाणे,युवती अध्यक्षा दीपा गायकवाड,भीमराज शेंडे,डॉ.अशोकराव ढगे,अशोकराव मिसाळ आदींसह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
गणेश गव्हाणे यांनी आभार मानले.

ताज्या बातम्या

मोठी बातमी:जे नको व्हायला पाहिजे तेच झाले:ओमिक्रॉनचा भारतात शिरकाव

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिअंटमुळे सध्या जगभरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी आज पत्रकार परिषद...

पोलिसांकडून महिलेकडे शरीरसुखाची मागणी

माय महाराष्ट्र न्यूज:महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामध्ये आता आणखी एक भर पडली आहे. खाकी वर्दीला कलंकित करणारी घटना जळगाव जामोद तालुक्यात...

पुन्हा एखादा अजित पवार होणार नाही याची काळजी घ्या :या नेत्यांचे मोठं विधान

माय महाराष्ट्र न्यूज:मुसलमानांनी सावध राहायला पाहिजे. इथल्या आंबेडकरी चळवळीने सावध राहील पाहिजे. मग अखिलेश यादव असतील, ममता बॅनर्जी असतील. काँग्रेसचे आणि  भाजपाच साटंलोट असल्याचं...

नगर ब्रेकिंग : स्विफ्ट कार व मोटरसायकलचा मोठा अपघात तीन तरुण गंभीर जखमी

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपुर-नेवासा रस्त्यावर असणाऱ्या अजित पवार पॉलिटेक्निक कॉलेज, वडाळा महादेव च्या समोर नेवासाकडून श्रीरामपूरकडे येणाऱ्या स्विफ्ट डिझायर एमएच.१८ ऐजे ८३६९ ने...

महाराष्ट्र शासनानं पुन्हा या नियमावलीत बदल

माय महाराष्ट्र न्यूज:ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या सुचनेनुसार राज्य शाससानं काल विमान प्रवासासंदर्भात नियमावली जाहीर केली होती. त्यानुसार, इतर राज्यांतून महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या विमान...

त्या’ वक्तव्यावरुन बाळासाहेब थोरात संतापले राष्ट्रवादीच्या या मंत्र्यांला म्हणाले तेवढी पात्रताच नाही

माय महाराष्ट्र न्यूज:पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्यात केलेल्या टीकेनंतर राज्यात काँग्रेस नेत्यांनी नाराजीचा सूर लावला आहे. देशातील दमनशाहीच्या विरोधात रस्त्यावर उतरून...
error: Content is protected !!