Friday, December 3, 2021

धक्कादायक ब्रेकिंग:या अभिनेत्रीने केली आत्महत्या

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:अभिनेत्री सौजन्याने आत्महत्या केली आहे. गळफास घेऊन तिने आयुष्याचा शेवट केला आहे.सौजन्याने अनेक कन्नड टीव्ही सीरिअलसह काही साऊथ फिल्ममध्येही काम केलं आहे. बंगळुरूतल्या कुंबलगोडूत ती राहत होती. तिच्या बंगळुरूतील राहत्या घरात तिचा मृतदेह सापडला आहे.

लटकलेल्या अवस्थेत तिचा मृतदेह होता. तिच्या खोलीत सुसाइड नोटही सापडली आहे, ज्यात तिने तिला मानसिक आजार असल्याचंही नमूद केलं आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीुसार तिने साडीने गळफास घेतला. तिच्या खोलीचा दरवाजा आतून बंद होता. तिच्या खोलीत सापडलेल्या सुसाईड नोटमध्ये तिने

आपल्या आत्महत्येसाठी कुणीही जबाबदार नाही हे नमूद केलं आहे. आपल्या आत्महत्येला आपणच जबाबदार आहोत, असं तिनं सांगितलं.या सुसाईट नोटमध्ये तिने तिचं मानसिक आरोग्य चांगलं नसल्याचंही सांगितलं. ती डिप्रेशनशी लढत होती. त्यातून तिने धक्कादायक पाऊल उचललं. पण यासाठी तिने आपल्या कुटुंबाची विशेषतः आईवडीलांची माफी मागितली आहे.

तर वाईट वेळेत साथ देणाऱ्यांचे आभार मानले आहेत. दरम्यान याप्रकरणी आता पोलीस तपास सुरू झाला आहे.सौजन्याच्या आत्महत्येमुळे कन्नड फिल्म इंडस्ट्रीला मोठा धक्का बसला आहे. काही दिवसांपूर्वीच जयश्री रमैय्यानेही आत्महत्या केली होती.

तिनेसुद्धा मानसिक आजारातूनच आयुष्य संपवलं होतं. तसंच ‘बिग बॉस कन्नड’ फेम अभिनेत्री चैत्र कुटूरनेही आत्महत्येचा प्रयत्न केला होता.

ताज्या बातम्या

मोठी बातमी:जे नको व्हायला पाहिजे तेच झाले:ओमिक्रॉनचा भारतात शिरकाव

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिअंटमुळे सध्या जगभरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी आज पत्रकार परिषद...

पोलिसांकडून महिलेकडे शरीरसुखाची मागणी

माय महाराष्ट्र न्यूज:महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामध्ये आता आणखी एक भर पडली आहे. खाकी वर्दीला कलंकित करणारी घटना जळगाव जामोद तालुक्यात...

पुन्हा एखादा अजित पवार होणार नाही याची काळजी घ्या :या नेत्यांचे मोठं विधान

माय महाराष्ट्र न्यूज:मुसलमानांनी सावध राहायला पाहिजे. इथल्या आंबेडकरी चळवळीने सावध राहील पाहिजे. मग अखिलेश यादव असतील, ममता बॅनर्जी असतील. काँग्रेसचे आणि  भाजपाच साटंलोट असल्याचं...

नगर ब्रेकिंग : स्विफ्ट कार व मोटरसायकलचा मोठा अपघात तीन तरुण गंभीर जखमी

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपुर-नेवासा रस्त्यावर असणाऱ्या अजित पवार पॉलिटेक्निक कॉलेज, वडाळा महादेव च्या समोर नेवासाकडून श्रीरामपूरकडे येणाऱ्या स्विफ्ट डिझायर एमएच.१८ ऐजे ८३६९ ने...

महाराष्ट्र शासनानं पुन्हा या नियमावलीत बदल

माय महाराष्ट्र न्यूज:ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या सुचनेनुसार राज्य शाससानं काल विमान प्रवासासंदर्भात नियमावली जाहीर केली होती. त्यानुसार, इतर राज्यांतून महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या विमान...

त्या’ वक्तव्यावरुन बाळासाहेब थोरात संतापले राष्ट्रवादीच्या या मंत्र्यांला म्हणाले तेवढी पात्रताच नाही

माय महाराष्ट्र न्यूज:पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्यात केलेल्या टीकेनंतर राज्यात काँग्रेस नेत्यांनी नाराजीचा सूर लावला आहे. देशातील दमनशाहीच्या विरोधात रस्त्यावर उतरून...
error: Content is protected !!