Tuesday, November 30, 2021

रोहित पवारांचा केंद्र सरकारवर निशाणा; म्हणाले…

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:गेल्या काही दिवसांपासून मराठावाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र या भागात पावसाने हाहाकार माजविला आहे. या भागातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मदतीची ग्वाही दिली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही राज्य सरकार मदतीसाठी प्रयत्नशील असल्याचे म्हटले आहे.

‘काही राज्यांना केंद्राने न मागता स्वतःहून हजारो कोटींचे पॅकेज दिले होते. केंद्र सरकार हे संपूर्ण देशाचे आहे. त्यामुळे कोणत्याही राज्यासोबत दुजाभाव न करता मदत दिली पाहिजे,’ असेही अजित पवार म्हणाले आहेत.

दरम्यान राज्यात अनेक ठिकाणी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याकडे लक्ष वेधत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केंद्र सरकारक़डे मदतीची मागणी केली आहे. राज्य सरकारने पूर्वी मदत केली होती, आताही करणार आहे.

मात्र, केंद्र सरकारनेही किमान आता तरी बघ्याची भूमिका न घेता अन्नदात्याला मदत करण्यासाठी आपली जबाबदारी उचलावी, असे आवाहन पवार यांनी केले आहे.यासोबतच आमदार रोहित पवार यांनीही ट्विट करून केंद्राकडे मदतीची मागणी केली आहे. रोहित पवार यांनी म्हटले आहे, ‘आधी कोकण, पश्चिम महाराष्ट्र

 नंतर मराठवाडा व विदर्भ. आता आज पुन्हा मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र. अतिवृष्टीने शेतकऱ्याला पूर्णत: घायाळ केले आहे. सोयाबीन, कापूस, ऊस या पिकांचे अतोनात झालेले नुकसान हे न भरून निघणारे आहे. अगदी हातातोंडाशी आलेला घास या संकटाने हिरावला आहे. आर्थिक अडचण

 असतानाही राज्य सरकारने दोन महिन्यापूर्वी आपत्तीग्रस्तांना भरीव मदत दिली तशीच मदत आज मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्राला देईल, असा विश्वास आहे असे पवार म्हणाले.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यातील धक्कादायक घटना:पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात एक अतिशय धक्कादायक बातमी समोर येत आहे.पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीने गळफास लावून घेत आत्महत्या केली. गोपीचंद रोहिदास भोसले (वय 30...

नगर जिल्ह्यातील अतिशय दुर्देवी घटना: दोघा सख्ख्या भावंडांचा बुडून मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील निळवंडे जलाशयावर आंघोळीसाठी गेलेल्या राजूर येथील दोन भावंडांचा रविवारी (२८ नोव्हेंबर) सायंकाळी पाण्याच्या भोवर्‍यात बुडून दुर्देवी मृत्यू झाल्याने राजूर...

भाजपच्या आमदार मोनिका राजळे यांना पोलिसांनी केली अटक

माय महाराष्ट्र न्यूज:कृषीपंपाच्या थकित वीज बिलाच्या वसुलीसाठी महावितरण कंपनीने शेतीपंपाचा वीजपुरवठा खंडीत केला जात आहे. या राज्य शासनाच्या जुलमी कारवाईच्या निषेधार्थ रास्तारोको आंदोलन करणार्‍या...

नगर जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या या आमदारांंच्या अडचणीत वाढ होणार ?

माय महाराष्ट्र न्यूज:नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात मतदारांची दिशाभूल करणारी माहिती दिल्याचा आरोप करीत येथील निर्भय नवजीवन फाउंडेशनचे संदीप अशोक...

महाराष्ट्रात पहिलीपासून शाळा सुरू करण्यासाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचना जारी

माय महाराष्ट्र न्यूज: येत्या 1 डिसेंबरपासून राज्यात पहिलीपासून शाळा सुरू करण्यास शालेय शिक्षण विभागाने मान्यता दिली असून यासंदर्भातील मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत....

राऊतांच्या मुलींच्या लग्नात सुप्रिया सुळे व संजय राऊतांचा डान्स, विखे-पाटील म्हणतात….

माय महाराष्ट्र न्यूज:संजय राऊत यांची कन्या पूर्वशी राऊत उद्या (सोमवार 29 नोव्हेंबर रोजी) विवाहबंधनात अडकणार आहे. ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे चिरंजीव मल्हार यांच्याशी...
error: Content is protected !!