Tuesday, November 30, 2021

शेवगाव – पाथर्डीत होणार राष्ट्रवादीचा आमदार

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:शेवगाव-पाथर्डी विधानसभेत राष्ट्रवादीचा पराभव थोड्या मताने झाला. यामुळे आगामी विजयासाठी मायनस झालेली मते प्लस करावी लागतील. ही मते प्लस करण्यासाठी गणित सुधारले पाहिजे, असा सल्ला जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी घुले-ढाकणे व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना दिला.

राष्ट्रवादीच्या परिवार संवाद यात्रेनिमित्त जलसंपदा मंत्री जयंत पाटील पाथर्डी तालुका दौर्‍यावर आले होते. यावेळी संस्कारभवन येथे झालेल्या कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.यावेळी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, माजी आ. नरेंद्र घुले, माजी आ. चंद्रशेखर घुले, प्रदेश सरचिटणीस अ‍ॅड. प्रताप ढाकणे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके,

महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, रक्षणा सलगर, युवकचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, प्रदेश कार्याध्यक्ष सुरज चव्हाण, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, युवकचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय कोळगे, शेवगाव पंचायत समितीचे सभापती क्षितीज घुले, मंजुषा गुंड, पाथर्डी तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे, शेवगाव तालुकाध्यक्ष कल्याण नेमाणे आदीसह पक्षाचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

मार्गदर्शन करतांना ना. जयंत पाटील म्हणाले, शेवगाव-पाथर्डी मतदारसंघातील राष्ट्रवादीचा विजय हा राजकीय गणितावर अवलंबून आहे. यामुळे अगोदर प्लस-मायनसचे गणित समजून घेतले पाहिजे. जी मते मायनस झाली आहेत ती प्लस करण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजे. यासाठी आपले सैन्य तयार पाहिजे. यासाठी बुथ कमिट्या तयार करून पक्षसंघटन मजबूत करावे लागेल, असा सल्ला पाटील यांनी दिला.

ते म्हणाले, काही वर्षापुर्वी श्रीक्षेत्र भगवानगडाला ब वर्ग दर्जा दिला होता. त्याप्रमाणे भगवानगड व परिसरातील गावांच्या नळपाणीपुरवठा योजनेबाबत लवकरच मुंबईत बैठक घेतली जाईल. माझ्यासारख्याकडून भगवानबाबांची सेवा होणे हे माझे भाग्य आहे. गडावर जावून संत भगवानबाबांचे दर्शन घेण्याची इच्छा होती.

मात्र कोरोनामुळे मंदिरे बंद असल्यामुळे ते शक्य झाले नाही. मात्र यापुढे नक्की फक्त भगवानबाबांच्या दर्शनासाठी पुन्हा येईन, असा शब्द ना. पाटील यांनी दिला.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यातील धक्कादायक घटना:पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात एक अतिशय धक्कादायक बातमी समोर येत आहे.पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीने गळफास लावून घेत आत्महत्या केली. गोपीचंद रोहिदास भोसले (वय 30...

नगर जिल्ह्यातील अतिशय दुर्देवी घटना: दोघा सख्ख्या भावंडांचा बुडून मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील निळवंडे जलाशयावर आंघोळीसाठी गेलेल्या राजूर येथील दोन भावंडांचा रविवारी (२८ नोव्हेंबर) सायंकाळी पाण्याच्या भोवर्‍यात बुडून दुर्देवी मृत्यू झाल्याने राजूर...

भाजपच्या आमदार मोनिका राजळे यांना पोलिसांनी केली अटक

माय महाराष्ट्र न्यूज:कृषीपंपाच्या थकित वीज बिलाच्या वसुलीसाठी महावितरण कंपनीने शेतीपंपाचा वीजपुरवठा खंडीत केला जात आहे. या राज्य शासनाच्या जुलमी कारवाईच्या निषेधार्थ रास्तारोको आंदोलन करणार्‍या...

नगर जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या या आमदारांंच्या अडचणीत वाढ होणार ?

माय महाराष्ट्र न्यूज:नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात मतदारांची दिशाभूल करणारी माहिती दिल्याचा आरोप करीत येथील निर्भय नवजीवन फाउंडेशनचे संदीप अशोक...

महाराष्ट्रात पहिलीपासून शाळा सुरू करण्यासाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचना जारी

माय महाराष्ट्र न्यूज: येत्या 1 डिसेंबरपासून राज्यात पहिलीपासून शाळा सुरू करण्यास शालेय शिक्षण विभागाने मान्यता दिली असून यासंदर्भातील मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत....

राऊतांच्या मुलींच्या लग्नात सुप्रिया सुळे व संजय राऊतांचा डान्स, विखे-पाटील म्हणतात….

माय महाराष्ट्र न्यूज:संजय राऊत यांची कन्या पूर्वशी राऊत उद्या (सोमवार 29 नोव्हेंबर रोजी) विवाहबंधनात अडकणार आहे. ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे चिरंजीव मल्हार यांच्याशी...
error: Content is protected !!