Saturday, November 27, 2021

मन्वंतर सामाजिक प्रतिष्ठानकडून विनायक नरवडे यांचा गौरव

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा

यु.पी.एस.सी. परीक्षा 2020 चा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. या परीक्षेत अहमदनगर येथील विनायक कारभारी नरवडे यांनी उत्तम यश संपादन करून आयएएस पदावर आपली वर्णी लावली आहे. त्यानिमित्ताने मन्वंतर सामाजिक प्रतिष्ठान देडगावच्या वतीने श्री नरवाडे यांचा सत्कार करण्यात आला.

मन्वंतर सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रोफेसर डॉ.विजय कदम यांनी स्मृतिचिन्ह, शॉल व पुष्पगुच्छ देऊन श्री नरवाडे व त्यांचेt कुटुंबीय यांचा सन्मान केला.
श्री नरवडे हे मेकॅनिकल इंजिनिअर असून अमेरिकेतील कोलंबिया येथे उच्चपदस्थ नोकरीवर होते तसेच ते संशोधक म्हणूनही कार्यरत होते, असे असतानाही प्रशासकीय सेवेमध्ये घेण्याच्या तीव्र इच्छेने त्यांनी ही नोकरी सोडून अभ्यास सुरू केला. यु.पी.एस.सी. परीक्षा 2020 मध्ये त्यांना देशातील 37वा व महाराष्ट्रातील दुसरा येण्याचा मान मिळाला आहे. विनायक नरवडे हे कुकाना येथील सुप्रसिद्ध डॉक्टर कारभारी नरवडे यांचे चिरंजीव आहेत.
यावेळी बोलताना विनायक नरवडे म्हणाले की तीव्र इच्छाशक्ती आणि कठोर परिश्रम करण्याची तयारी असेल तर यश सहज मिळवता येते.

याप्रसंगी प्रेमराज सारडा महाविद्यालयातील इतिहास विभाग प्रमुख डॉ. सुरेखा गांगुर्डे, दादा पाटील राजळे महाविद्यालयातील इतिहास विभाग प्रमुख प्रा. राजू घोलप, प्रा. अशोक देसाई, प्रोफेसर डॉ. बिडलान, ए यु स्मॉल फायनान्स बँकेचे श्री कुलदीप पवार, तक्षशिला जुनिअर कॉलेज व इंग्लिश मीडियम स्कूल देडगाव च्या संचालिका सौ शुभांगी कदम आदी मान्यवर उपस्थित होते.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यात एकच खळबळ:काटवनात आढळला तरुणाचा मृतदेह, घातपात की आत्महत्या

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथील तळेगाव प्रादेशिक पाणी योजनेच्या साठवण तलावानजीक रस्त्याच्याकडेच्या काटवनात तळेगाव दिघे (वामनवाडी) येथील तरुणाचा मृतदेह आढळून आला. शुक्रवारी...

बापरे : पती-पत्नी मिळून चालवायचे देह विक्रीचा व्यवसाय

माय महाराष्ट्र न्यूज: पोलिसांनी मानवी तस्करीचा भांडाफोड केला आहे. हे तस्कर बांग्लादेशातून तरुणी आणून भारतात देह व्यापाराच्या व्यवसायाता ढकलत होते. पोलिसांनी टोळीच्या प्रमुखासह 8...

मोठी बातमी:महाराष्ट्रात सरकार पाडण्याच्या हालचाली?आज अमित शहा, देवेंद्र फडणवीस व शरद पवार दिल्लीत भेट ?

माय महाराष्ट्र न्यूज:केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी महाराष्ट्रात मार्चमध्ये भाजपचे सरकार येणार असा दावा केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. त्यातच महाराष्ट्रातील अनेक नेते...

धक्कादायक :महिला पोलीस कर्मचाऱ्याचे नावे सोशल मीडियावर बनावट अकाउंट, अश्लील Video केला शेअर

माय महाराष्ट्र न्यूज: पुणे शहर पोलीस विभागातील एका महिला कर्मचार्‍याच्या नावाने फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडियावर बनावट अकाउंट तयार करून त्यावर अश्लील व्हिडिओ...

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांचा मृत्यूदर चिंताजनक

माय महाराष्ट्र न्यूज: राज्यामध्ये कोरोनाची तिसरी लाट येणार की नाही याबाबत मतमतांतरे आहेत. तिसरी लाट जरी आली तरी अतिशय सौम्य प्रमाणात असल्याचा दावा राज्याचे...

नगर जिल्हा रुग्णालय :१४ जणांचा बळी घेणारी आग कशी लागली? अहवाल तयार

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्हा रुग्णालयाच्या कोविड अतिदक्षता विभागात ६ नोव्हेंबरला लागलेल्या आगीचा अहवाल राज्य सरकारने नेमलेल्या चौकशी समितीने तयार केला आहे. सुमारे ६५...
error: Content is protected !!