Friday, December 3, 2021

राज्यातील महाविद्यालये सुरु करण्याबाबत उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांची मोठी माहिती

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यातील कोरोना संक्रमितांची संख्या कमी होत आहे. विविध गोष्टी सुरु केल्या जात आहेत. त्यामुळे ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये, ठिकाणी कोरोनाचा प्रभाव कमी झाला आहे त्या ठिकाणी कॉलेज सुरु करण्यास काहीच हरकत नाही.

शैक्षणिक वर्ष 1 नोव्हेंबरपासून सुरु होईल, अशी माहिती महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी दिली आहे. लॉकडाऊन (Lockdown) झाल्यापासून राज्यातील महाविद्यालये ऑनलाईनच सुरु आहेत. ती ऑफलाईन कधी होतील

 याबाबत विचारलेलया प्रश्नाच्या उत्तरादाखल उदय सामंत बोलत होते. पुढे बोलताना उदय सामंत यांनी सांगितले, 1 नोव्हेंपासून शैक्षणिक वर्ष होईल. परंतु तेव्हाच दिवाळी असल्यानं कदाचित दिवाळीनंतर शैक्षणिक वर्ष सुरू होईल. तेव्हाच फिजिकल कॉलेज सुरू करण्याचा विचार करतोय, असे उदय सामंत यांनी सांगितले.

उदय सामंत यांनी सांगितले की, महाविद्यालय सुरु झाल्यानंतर आम्ही सर्वच विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये बोलवू शकत नाही. ज्यांना कॉलेजमध्ये यायची इच्छा असेल त्यांनीच यावे. कोणत्याही विद्यार्थ्यांवर सक्ती केली जाणार नाही. अजूनही कोरोनाबद्दल विद्यार्थी आणि पालकांमध्ये भीती आहे.

मात्र, कॉलेज सुरु करण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अंतिम निर्णय घेतील, असे सामंत म्हणाले. मुख्यमंत्र्यंची परवानगी घेतल्यानंतर महाविद्यालये सुरु होतील, असे सामंत यांनी सांगितले.दरम्यान, अजित पवार यांनीही राज्यातील विविध गोष्टी सुरु करण्याबात आज माहिती दिली. कोरोना व्हायरस महामारी काळात राज्यातील विविध बाबींवर निर्बंध घातले होते.

कोरोना व्हायरस संक्रमितांची संख्या जसजशी कमी होत आहे, तसतसे निर्बंध शिथील केले जात आहेत. आताबर्यंत बंद असलेल्या बाबी अंदाज घेऊन टप्प्या टप्प्याने सुरु केल्या जात आहेत. कोरोना संक्रमितांची संख्या अशीच कमी होत गेली तर हे सर्वच निर्बंध हळूहळू कमी केले जातील.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचाही तसाच मनोदय असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.

ताज्या बातम्या

मोठी बातमी:जे नको व्हायला पाहिजे तेच झाले:ओमिक्रॉनचा भारतात शिरकाव

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिअंटमुळे सध्या जगभरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी आज पत्रकार परिषद...

पोलिसांकडून महिलेकडे शरीरसुखाची मागणी

माय महाराष्ट्र न्यूज:महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामध्ये आता आणखी एक भर पडली आहे. खाकी वर्दीला कलंकित करणारी घटना जळगाव जामोद तालुक्यात...

पुन्हा एखादा अजित पवार होणार नाही याची काळजी घ्या :या नेत्यांचे मोठं विधान

माय महाराष्ट्र न्यूज:मुसलमानांनी सावध राहायला पाहिजे. इथल्या आंबेडकरी चळवळीने सावध राहील पाहिजे. मग अखिलेश यादव असतील, ममता बॅनर्जी असतील. काँग्रेसचे आणि  भाजपाच साटंलोट असल्याचं...

नगर ब्रेकिंग : स्विफ्ट कार व मोटरसायकलचा मोठा अपघात तीन तरुण गंभीर जखमी

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपुर-नेवासा रस्त्यावर असणाऱ्या अजित पवार पॉलिटेक्निक कॉलेज, वडाळा महादेव च्या समोर नेवासाकडून श्रीरामपूरकडे येणाऱ्या स्विफ्ट डिझायर एमएच.१८ ऐजे ८३६९ ने...

महाराष्ट्र शासनानं पुन्हा या नियमावलीत बदल

माय महाराष्ट्र न्यूज:ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या सुचनेनुसार राज्य शाससानं काल विमान प्रवासासंदर्भात नियमावली जाहीर केली होती. त्यानुसार, इतर राज्यांतून महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या विमान...

त्या’ वक्तव्यावरुन बाळासाहेब थोरात संतापले राष्ट्रवादीच्या या मंत्र्यांला म्हणाले तेवढी पात्रताच नाही

माय महाराष्ट्र न्यूज:पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्यात केलेल्या टीकेनंतर राज्यात काँग्रेस नेत्यांनी नाराजीचा सूर लावला आहे. देशातील दमनशाहीच्या विरोधात रस्त्यावर उतरून...
error: Content is protected !!