Friday, December 3, 2021

जाणून घ्या निरोगी लैंगिक आयुष्याबद्दलच्या काही गोष्टी

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:हस्तमैथुन केल्याने शुक्राणूंची संख्या कमी होते? याचा परिणाम प्रजनन क्षमतेवर होतो का? असे विविध प्रश्न हस्तमैथुन करताना आपल्या मनात उद्भवतात. पुरुषांच्या वीर्यातून जे निघते त्याला स्पर्म, लिक्विड किंवा प्रोस्टाग्लॅंडिन असे म्हटले जाते.

अंडकोषात वीर्याचे निरंतर उत्पादन होते. पौगंडावस्थेनंतर पुरुषाचे शरीर वीर्य निर्मिती करत राहते. यापासून सुटका मिळवण्यासाठी पुरुष मंडळी हस्तमैथुन करतात. हस्तमैथुन करणे ही पूर्णपणे मजेशीर बाब असून त्यामुळे कोणत्याही प्रकारे शुक्राणूंची संख्या कमी होत नाही.

त्याचसोबत त्यांची पुर्निमिती करण्यासाठी काही परिणाम होत नाही. नियमितपणे हस्तमैथुन करणे हे प्रत्येकावर अवलंबून असते. हस्तमैथुनचा तुमच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होत असेल तर समस्या उद्भवू शकते. तसेच तुम्हाला तणावातून बाहेर पडायचे असेल तेव्हा सुद्धा तिच परिस्थिती उद्भवते. स्वत:ला सेक्शुअली आनंद मिळण्याचा एकच मार्ग म्हणजे हस्तमैथुन करणे.

हस्तमैथुन करताना ‘या’ काही गोष्टी लक्षात ठेवा

-हस्तमैथुन करताना कोणत्याही धारधार वस्तूचा (वाढलेली नखे) यांचा वापर करु नये

-तुम्हाला दुखेल किंवा तुम्हाला त्यामुळे अस्वस्थ वाटेल असेल अशा कोणत्याही पद्धतीचा वापर करण्यापासून दूर रहा

-हस्तमैथून करताना प्रायव्हेट पार्ट मध्ये जळजळ सुद्धा होऊ शकते. त्यामुळे प्रोटेक्शनचा वापर करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरु शकते.

-एखाद्याच्या मर्जी व्यतिरिक्त त्याच्या समोर हस्तमैथुन करणे हा गुन्हा आहे. तसेच 18 वर्षाखालील मुलाच्या समोर जरी हस्तमैथुन केले तर त्याला लैंगिक अत्याचार किंवा गुन्हा मानले जाते.

कधीकधी रात्री झोपल्याने पुरुषांच्या जननेंद्रियात ताण येऊ शकतो आणि त्या नंतर किंवा त्याशिवाय वीर्य बाहेर येऊ शकते. या प्रक्रियेला Nightfall असे संबोधले जाते. हे अत्यंत नैसर्गिक असून सर्वसाधारण प्रक्रिया आहे. त्याचसोबत पुरुषांच्या शरिरातील विकासाचा हा एक भागच समजला जातो.

ताज्या बातम्या

मोठी बातमी:जे नको व्हायला पाहिजे तेच झाले:ओमिक्रॉनचा भारतात शिरकाव

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिअंटमुळे सध्या जगभरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी आज पत्रकार परिषद...

पोलिसांकडून महिलेकडे शरीरसुखाची मागणी

माय महाराष्ट्र न्यूज:महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामध्ये आता आणखी एक भर पडली आहे. खाकी वर्दीला कलंकित करणारी घटना जळगाव जामोद तालुक्यात...

पुन्हा एखादा अजित पवार होणार नाही याची काळजी घ्या :या नेत्यांचे मोठं विधान

माय महाराष्ट्र न्यूज:मुसलमानांनी सावध राहायला पाहिजे. इथल्या आंबेडकरी चळवळीने सावध राहील पाहिजे. मग अखिलेश यादव असतील, ममता बॅनर्जी असतील. काँग्रेसचे आणि  भाजपाच साटंलोट असल्याचं...

नगर ब्रेकिंग : स्विफ्ट कार व मोटरसायकलचा मोठा अपघात तीन तरुण गंभीर जखमी

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपुर-नेवासा रस्त्यावर असणाऱ्या अजित पवार पॉलिटेक्निक कॉलेज, वडाळा महादेव च्या समोर नेवासाकडून श्रीरामपूरकडे येणाऱ्या स्विफ्ट डिझायर एमएच.१८ ऐजे ८३६९ ने...

महाराष्ट्र शासनानं पुन्हा या नियमावलीत बदल

माय महाराष्ट्र न्यूज:ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या सुचनेनुसार राज्य शाससानं काल विमान प्रवासासंदर्भात नियमावली जाहीर केली होती. त्यानुसार, इतर राज्यांतून महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या विमान...

त्या’ वक्तव्यावरुन बाळासाहेब थोरात संतापले राष्ट्रवादीच्या या मंत्र्यांला म्हणाले तेवढी पात्रताच नाही

माय महाराष्ट्र न्यूज:पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्यात केलेल्या टीकेनंतर राज्यात काँग्रेस नेत्यांनी नाराजीचा सूर लावला आहे. देशातील दमनशाहीच्या विरोधात रस्त्यावर उतरून...
error: Content is protected !!