Friday, December 3, 2021

नगर जिल्ह्यातील घटना: महिलेची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:स्वतःच्या जमिनीवर ताबा दाखवून व जमीन नाही तर १ कोटी रुपये द्या असे म्हणत नेहमीच आरोपीच त्रास देत असत तसेच जमीन व पैशासाठी घरातील माणसांना जीवे मारून टाकू, रॉकेल ओतून पेटवून देऊ अशा जाचाला कंटाळून

एका विवाहित महिलेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना संगमनेर शहरालगत घुलेवाडी येथे मंगळवारी रात्री घडली. याप्रकरणी शहर पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला असून एकास अटक केली आहे.याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, घुलेवाडी येथे मयत महिला सुनीता रामनाथ राउत

या आपल्या कुटुंबासह राहत होत्या. दरम्यान आरोपी अविनाश रंगनाथ आरोटे रा. अकोले व बापूसाहेब माधव निभे रा. प्रवरानगर लोणी यांच्यासोबत जमिनीवरून वाद होता. या वादातून नेहमीच आमच्या आईची जमीन आम्हाला परत द्या नाहीतर एक कोटी रुपये द्या असे म्हणत सुनीता यांना त्रास देत होते.

तुमचे घरदार पेटवून देऊ, कुणालाही सोडणार नाही अशा धमक्याही नेहमीच देत असे. अखेर या त्रासाला कंटाळून सुनिता हिने मंगळवारी घुलेवाडी येथील भरलेल्या विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. याप्रकरणी मयताच्या पतीने फिर्याद दिल्याने दोन आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

मोठी बातमी:जे नको व्हायला पाहिजे तेच झाले:ओमिक्रॉनचा भारतात शिरकाव

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिअंटमुळे सध्या जगभरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी आज पत्रकार परिषद...

पोलिसांकडून महिलेकडे शरीरसुखाची मागणी

माय महाराष्ट्र न्यूज:महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामध्ये आता आणखी एक भर पडली आहे. खाकी वर्दीला कलंकित करणारी घटना जळगाव जामोद तालुक्यात...

पुन्हा एखादा अजित पवार होणार नाही याची काळजी घ्या :या नेत्यांचे मोठं विधान

माय महाराष्ट्र न्यूज:मुसलमानांनी सावध राहायला पाहिजे. इथल्या आंबेडकरी चळवळीने सावध राहील पाहिजे. मग अखिलेश यादव असतील, ममता बॅनर्जी असतील. काँग्रेसचे आणि  भाजपाच साटंलोट असल्याचं...

नगर ब्रेकिंग : स्विफ्ट कार व मोटरसायकलचा मोठा अपघात तीन तरुण गंभीर जखमी

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपुर-नेवासा रस्त्यावर असणाऱ्या अजित पवार पॉलिटेक्निक कॉलेज, वडाळा महादेव च्या समोर नेवासाकडून श्रीरामपूरकडे येणाऱ्या स्विफ्ट डिझायर एमएच.१८ ऐजे ८३६९ ने...

महाराष्ट्र शासनानं पुन्हा या नियमावलीत बदल

माय महाराष्ट्र न्यूज:ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या सुचनेनुसार राज्य शाससानं काल विमान प्रवासासंदर्भात नियमावली जाहीर केली होती. त्यानुसार, इतर राज्यांतून महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या विमान...

त्या’ वक्तव्यावरुन बाळासाहेब थोरात संतापले राष्ट्रवादीच्या या मंत्र्यांला म्हणाले तेवढी पात्रताच नाही

माय महाराष्ट्र न्यूज:पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्यात केलेल्या टीकेनंतर राज्यात काँग्रेस नेत्यांनी नाराजीचा सूर लावला आहे. देशातील दमनशाहीच्या विरोधात रस्त्यावर उतरून...
error: Content is protected !!