Tuesday, November 30, 2021

राजकीय चर्चेला उधाण: राधाकृष्ण विखेंनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट; महिन्यात दुसरी भेट

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सदिच्छा भेट घेतली. दोन महिन्यांत त्यांची ही दुसरी भेट असल्याने, राजकीय निरीक्षकांच्या भुवया उंचावल्या आहेत. तथापि, मागील आठवड्यात त्यांनी येथील एका जाहीर कार्यक्रमात या नियोजित भेटीचे सूतोवाच केले होते.

शिर्डी नगरपंचायत निवडणुकीच्या विजय संकल्प मेळाव्यात बोलताना त्यांनी, आपण मोदी यांची भेट मागितली आहे. त्यांच्या अमेरिका भेटीनंतर आपणास ते भेटीसाठी वेळ देतील. या भेटीत आपण त्यांच्याकडे साईबाबांच्या शिर्डीत आयटी पार्क उभारण्याची मागणी करणार असल्याचे जाहीर केले होते.

साईबाबांच्या शिर्डीजवळ शेती महामंडळाची जमीन उपलब्ध आहे. विमानतळ, समृद्धी महामार्ग व रेल्वेमार्गामुळे शिर्डी देशातील जवळपास सर्व महानगरांसोबत जोडली गेली आहे. त्यामुळे येथे देशातील एक मोठे आयटी पार्क उभारण्यासाठी आपण पाठपुरावा करणार आहोत. पंतप्रधानांच्या या नियोजित भेटीत आपण हा विषय प्रामुख्याने मांडणार आहोत.

काल प्रवरानगर येथे पदमश्री विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सभा सुरू असतानाच विखे पाटील यांना पंतप्रधान कार्यालयातून दुपारी बाराच्या सुमारास फोन आला. आज दुपारी बाराच्या सुमारास भेटीची वेळ देण्यात आल्याचे कळविण्यात आले होते. हा निरोप मिळताच विखे पाटील कालच दिल्लीला रवाना झाले होते.

त्यानुसार आज दुपारी साडेबाराच्या सुमारास त्यांची ही नियोजित भेट पार पडली. भेटीबाबत उत्सुकता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी गेल्या महिनाभरात आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांची ही दुसरी भेट आहे. या भेटीबाबत त्यांनी कुठलीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही.

त्यामुळे सुमारे चाळीस मिनिटांच्या या भेटीबाबत काहीशी उत्सुकता निर्माण झाली आहे.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यातील धक्कादायक घटना:पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात एक अतिशय धक्कादायक बातमी समोर येत आहे.पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीने गळफास लावून घेत आत्महत्या केली. गोपीचंद रोहिदास भोसले (वय 30...

नगर जिल्ह्यातील अतिशय दुर्देवी घटना: दोघा सख्ख्या भावंडांचा बुडून मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील निळवंडे जलाशयावर आंघोळीसाठी गेलेल्या राजूर येथील दोन भावंडांचा रविवारी (२८ नोव्हेंबर) सायंकाळी पाण्याच्या भोवर्‍यात बुडून दुर्देवी मृत्यू झाल्याने राजूर...

भाजपच्या आमदार मोनिका राजळे यांना पोलिसांनी केली अटक

माय महाराष्ट्र न्यूज:कृषीपंपाच्या थकित वीज बिलाच्या वसुलीसाठी महावितरण कंपनीने शेतीपंपाचा वीजपुरवठा खंडीत केला जात आहे. या राज्य शासनाच्या जुलमी कारवाईच्या निषेधार्थ रास्तारोको आंदोलन करणार्‍या...

नगर जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या या आमदारांंच्या अडचणीत वाढ होणार ?

माय महाराष्ट्र न्यूज:नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात मतदारांची दिशाभूल करणारी माहिती दिल्याचा आरोप करीत येथील निर्भय नवजीवन फाउंडेशनचे संदीप अशोक...

महाराष्ट्रात पहिलीपासून शाळा सुरू करण्यासाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचना जारी

माय महाराष्ट्र न्यूज: येत्या 1 डिसेंबरपासून राज्यात पहिलीपासून शाळा सुरू करण्यास शालेय शिक्षण विभागाने मान्यता दिली असून यासंदर्भातील मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत....

राऊतांच्या मुलींच्या लग्नात सुप्रिया सुळे व संजय राऊतांचा डान्स, विखे-पाटील म्हणतात….

माय महाराष्ट्र न्यूज:संजय राऊत यांची कन्या पूर्वशी राऊत उद्या (सोमवार 29 नोव्हेंबर रोजी) विवाहबंधनात अडकणार आहे. ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे चिरंजीव मल्हार यांच्याशी...
error: Content is protected !!