Tuesday, November 30, 2021

शिर्डी साईबाबा मंदिर व प्रशासन भक्तांच्या स्वागतासाठी सज्ज रहावे

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज : येत्या 7 ऑक्टोंबर पासून श्री.साईबाबा मंदिर सुरू होणार आहे. कोरोना संसर्गाचा अटकाव करण्यासाठी राहाता व शिर्डी मधील महसूल, पोलिस, आरोग्य, बांधकाम, नगरपालिका, रेल्वे, एस.टी, विमानतळ व इतर सर्व शासकीय विभागांनी एकमेकांशी समन्वय ठेवून कामकाज करावे आणि कोरोना

 नियमावलीची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी. अशा सूचना श्री साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती भाग्यश्री बाणायत यांनी आज येथे केल्या.
धार्मिकस्थळे सुरू करावयाच्या पार्श्वभूमीवर करावयाच्या उपाययोजना संदर्भात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची

 उपविभागीय बैठक साईबाबा संस्थानच्या सभागृहात आज संपन्न झाली. श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती भाग्यश्री बानायत यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. त्यावेळी श्रीमती बानायत बोलत होत्या.

श्रीमती बानायत म्हणाल्या,” प्रशासनाने भक्तांच्या स्वागतासाठी सज्ज झाले पाहिजे. प्रत्येकाने 6 फुटांचे अंतर पाळणे, मुखपट्टीचा वापर करणे बंधनकारक व सॅनिटायझरने वारंवार हात धुणे, या कोरोना नियमावलीतील मुख्य तीन नियमांचे पालन भाविक व नागरिकांकडून झाले पाहिजे. यासाठी प्रशासनाने सतर्क राहिले पाहिजे.

अशावेळी जे नियमावलीचे पालन करणार नाहीत अशांवर दंडात्मक कार्यवाही करावी.”नगरपालिका व बांधकाम विभागाने शहर व परिसरात जेथे रस्ते खराब असतील तेथे रस्ते दुरूस्ती व डागडुजीचे काम हाती घ्यावे. भक्तांसाठी पुरेशी वाहनतळाची व्यवस्था आहे का याचा आढावा पोलीस विभागाने घ्यावा.

कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा अधिक सावधानता दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या वाढली होती त्यामुळे दक्षता बाळगावी. यासाठी प्रत्येक शासकीय विभागाने समन्वय ठेवावा. शहर व परिसरात ध्वनीक्षेपकांच्या माध्यमातून कोवीड नियमांचे पालन करण्याबाबत जाणीव-जागृती करावी.” अशा सूचनाही बानायत यांनी यावेळी केल्या.

यावेळी उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे यांनी राहाता व शिर्डी मधील कोरोना रूग्णसंख्या व त्या अनुषंगाने प्रशासनाने घ्यावयाची काळजी याबाबत माहिती दिली. श्री.शिंदे म्हणाले, “राहाता तालुक्यात आतापर्यंत 24 हजार 169 रूग्ण आढळून आले आहेत. यातील 18 हजार 700 रूग्ण केवळ दुसऱ्या लाटेतील आहेत.

359 सक्रीय रूग्ण आहेत. आतापर्यंत 462 कोरोनामुळे मृत्यु झाले आहेत. यात 400 मृत्यु हे दुसऱ्या लाटेत झाले आहेत. शिर्डी शहरात आतापर्यत 1 लाख 29 हजार लोकांनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला आहे. तर 56 हजार लोकांनी दुसरा डोस घेतला आहे.

राहाता तालुक्याचा पॉझिटिव्हीटी रेट 5.03 इतका आहे. तेव्हा प्रशासनाने सतर्कता बाळगली पाहिजे. कोठेही कोवीड नियमात हलगर्जीपणा होणार नाही याची प्रामुख्याने काळजी घ्यावी.शिर्डी मध्ये दक्षिण भारतातून जास्त भाविक येत असतात. अशा भाविकांची रेल्वे, विमानतळ व एस.टी बसस्थानकाच्या

ठिकाणीच कोवीड तपासणी करावी. अहवाल निगेटिव्ह आल्यावर भाविकाला पुढे प्रवास करू द्यावा. अशा सूचनाही शिंदे यांनी यावेळी दिल्या. शासनाने दिनांक 24 सप्टेंबर 2021 जारी केलेल्या शासन निर्णयातील निर्देशाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे यांनी यावेळी वाचन केले. तसेच प्रत्येक विभागाने त्याप्रमाणे काटेकोरपणे

अंमलबजावणी करावी. असेही यावेळी ठाकरे यांनी सांगितले. यावेळी पोलीस, नगरपालिका, रेल्वे, विमानतळ, एस.टी महामंडळ प्रशासनातील अधिकाऱ्यांनी ही त्यांच्या सूचना बैठकीत मांडल्या.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यातील धक्कादायक घटना:पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात एक अतिशय धक्कादायक बातमी समोर येत आहे.पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीने गळफास लावून घेत आत्महत्या केली. गोपीचंद रोहिदास भोसले (वय 30...

नगर जिल्ह्यातील अतिशय दुर्देवी घटना: दोघा सख्ख्या भावंडांचा बुडून मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील निळवंडे जलाशयावर आंघोळीसाठी गेलेल्या राजूर येथील दोन भावंडांचा रविवारी (२८ नोव्हेंबर) सायंकाळी पाण्याच्या भोवर्‍यात बुडून दुर्देवी मृत्यू झाल्याने राजूर...

भाजपच्या आमदार मोनिका राजळे यांना पोलिसांनी केली अटक

माय महाराष्ट्र न्यूज:कृषीपंपाच्या थकित वीज बिलाच्या वसुलीसाठी महावितरण कंपनीने शेतीपंपाचा वीजपुरवठा खंडीत केला जात आहे. या राज्य शासनाच्या जुलमी कारवाईच्या निषेधार्थ रास्तारोको आंदोलन करणार्‍या...

नगर जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या या आमदारांंच्या अडचणीत वाढ होणार ?

माय महाराष्ट्र न्यूज:नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात मतदारांची दिशाभूल करणारी माहिती दिल्याचा आरोप करीत येथील निर्भय नवजीवन फाउंडेशनचे संदीप अशोक...

महाराष्ट्रात पहिलीपासून शाळा सुरू करण्यासाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचना जारी

माय महाराष्ट्र न्यूज: येत्या 1 डिसेंबरपासून राज्यात पहिलीपासून शाळा सुरू करण्यास शालेय शिक्षण विभागाने मान्यता दिली असून यासंदर्भातील मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत....

राऊतांच्या मुलींच्या लग्नात सुप्रिया सुळे व संजय राऊतांचा डान्स, विखे-पाटील म्हणतात….

माय महाराष्ट्र न्यूज:संजय राऊत यांची कन्या पूर्वशी राऊत उद्या (सोमवार 29 नोव्हेंबर रोजी) विवाहबंधनात अडकणार आहे. ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे चिरंजीव मल्हार यांच्याशी...
error: Content is protected !!