Friday, December 3, 2021

सुजय विखे म्हणाले तर तो कारखाना सोडून पळुन गेला असता पण आ. राधाकृष्ण विखे पाटीलांनी…

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील श्रीगणेश सहकारी साखर कारखान्याच्या 60 व्या ऑनलाईन पध्दतीने झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत खा. डॉ.सुजय विखे बोलत होते. अध्यक्षस्थानी कारखान्याचे अध्यक्ष मुकूंदराव सदाफळ हे होते.

उपाध्यक्ष प्रतापराव जगताप, तसेच संचालक मंडळातील सदस्य, कार्यकारी संचालक अभिजीत भागडे अदि उपस्थित होते. ऑनलाईन पध्दतीने अण्णासाहेब म्हस्के हे ही उपस्थित होते. विषय पत्रिकेवरील सर्व विषय या सभेत मंजुर करण्यात आले.

याप्रसंगी बोलतांना खा. डॉ. सुजय विखे पा. म्हणाले, प्रवरा, राहुरी व गणेश हे तीनही कारखाने संकटात होते, अडचणीत होते. महाराष्ट्रात दूसरे कुणीही असते, किती ही मोठा नेता असता, तर तो कारखाना सोडून पळुन गेला असता. आ. राधाकृष्ण विखे पाटील यांचेच कौशल्य आहे, एवढ्या संकटात जावुनही

 आपण गाळप हंगाम यशस्वी केला. त्यांना कारखाना परिसरातील सभासद शेतकर्‍यांची साथ ही लाभली. हा कौटूंबिक जिव्हाळा कै. पद्मभुषण बाळासाहेब विखे पाटील यांच्या पासुन प्रवरा आणि गणेश परिसरात स्थापित करु शकलो.

ही आ. राधाकृष्ण विखे पाटील यांची मोठी उपलब्धी आहे. गणेश कारखाना आपण खाजगी म्हणून न घेता तो सभासदांच्या मालकीचाच राहावा म्हणून सहकारी तत्वावर चालविण्यास घेतला. सहकारी आणि खाजगी कारखान्यांची तुलनाही यावेळी खा. डॉ. विखे पा. यांनी मांडली. सुरुवातीला आपण गणेश मोठ्या ताकदीने चालविला.

पैसे गुंतविले, सभासदांचा विश्वास संपादन केला. प्रवरेला करार वाढवून देवु नये म्हणुन तक्रार झाली. लोक कोर्टात गेले. आता ही बाब न्याय प्रविष्ठ आहे.आपल्या तालुक्याच्या भोवताली राजकिय त्रिकोन असल्याचा उल्लेख करत खासदार डॉ. विखे म्हणाले,

एका बाजुने सल्ला, दुसर्‍या बाजुने पैसा, आणि तिसर्‍या बाजुने याचिका असा धंदा सुरु असल्याचे ते म्हणाले. या संचालक मंडळाने 6 वर्ष चांगले काम केले. सहकार्य केले. गणेशचे सभासद पुढेही कारखाना आपल्या ताब्यात ठेवतील, असा विश्वसासही खा. डॉ. विखे पाटील यांनी व्यक्त केला.

ताज्या बातम्या

मोठी बातमी:जे नको व्हायला पाहिजे तेच झाले:ओमिक्रॉनचा भारतात शिरकाव

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिअंटमुळे सध्या जगभरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी आज पत्रकार परिषद...

पोलिसांकडून महिलेकडे शरीरसुखाची मागणी

माय महाराष्ट्र न्यूज:महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामध्ये आता आणखी एक भर पडली आहे. खाकी वर्दीला कलंकित करणारी घटना जळगाव जामोद तालुक्यात...

पुन्हा एखादा अजित पवार होणार नाही याची काळजी घ्या :या नेत्यांचे मोठं विधान

माय महाराष्ट्र न्यूज:मुसलमानांनी सावध राहायला पाहिजे. इथल्या आंबेडकरी चळवळीने सावध राहील पाहिजे. मग अखिलेश यादव असतील, ममता बॅनर्जी असतील. काँग्रेसचे आणि  भाजपाच साटंलोट असल्याचं...

नगर ब्रेकिंग : स्विफ्ट कार व मोटरसायकलचा मोठा अपघात तीन तरुण गंभीर जखमी

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपुर-नेवासा रस्त्यावर असणाऱ्या अजित पवार पॉलिटेक्निक कॉलेज, वडाळा महादेव च्या समोर नेवासाकडून श्रीरामपूरकडे येणाऱ्या स्विफ्ट डिझायर एमएच.१८ ऐजे ८३६९ ने...

महाराष्ट्र शासनानं पुन्हा या नियमावलीत बदल

माय महाराष्ट्र न्यूज:ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या सुचनेनुसार राज्य शाससानं काल विमान प्रवासासंदर्भात नियमावली जाहीर केली होती. त्यानुसार, इतर राज्यांतून महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या विमान...

त्या’ वक्तव्यावरुन बाळासाहेब थोरात संतापले राष्ट्रवादीच्या या मंत्र्यांला म्हणाले तेवढी पात्रताच नाही

माय महाराष्ट्र न्यूज:पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्यात केलेल्या टीकेनंतर राज्यात काँग्रेस नेत्यांनी नाराजीचा सूर लावला आहे. देशातील दमनशाहीच्या विरोधात रस्त्यावर उतरून...
error: Content is protected !!