Wednesday, December 8, 2021

नगर जिल्ह्यातील या 198 शाळा करोनामुळे सुरू होणे अशक्य

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यातील अन्य जिल्ह्यात करोनाचा संसर्ग कमी होत असतांना नगर जिल्ह्यात गेल्या महिनाभरापासून 500 ते 900 च्या दरम्यान दररोज करोनाचे रुग्ण सापडत आहे. गेल्या काही दिवसांपासून काही गावांत मोठ्या संख्याने करोनाचे रुग्ण सापडत असल्याने त्या ठिकाणी सात ते चौदा दिवसांचा

 बंद पाळण्यात येत असून त्या गावांना प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. दरम्यान जिल्ह्यात पाचवी ते बारावीपर्यंतच्या 2 हजार 122 शाळा असून गुरूवारी जिल्ह्यात प्रतिबंधित क्षेत्रात असणारी गावे आणि शाळांची आकडेवारी शिक्षण विभागाने संकलित केली.

दरम्यान सोमवारपासून (दि.4) जिल्ह्यात ग्रामीण भागात पाचवी ते बारावी आणि शहरात आठवी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू होत आहेत. यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक आणि माध्यमिक विभागाची लगबग सुरू असताना 10 तालुक्यातील 69 गावात करोना संसर्गामुळे प्रतिबंधित क्षेत्र घोषित

केलेले आहे. या गावात जिल्हा परिषदेच्या 109 तर अन्य व्यवस्थापनाच्या 89 शाळा आहेत. अशा या 198 शाळा करोना संसर्ग कमी झाल्याशिवाय सुरू होवू शकणार नाहीत, अशी माहिती जिल्हा परिषद प्रशासनाकडून देण्यात आली.यात 14 पैकी 10 तालुक्यात 69 गावे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलेले आहेत.

जिल्हा परिषदेच्या 109 तर अन्य व्यवस्थापनाच्या 89 शाळा आहेत. अशा या 198 शाळा करोना संसर्ग कमी झाल्याशिवाय सुरू होवू शकणार नाहीत. करोनामुळे सर्वाधिक प्रतिबंधित क्षेत्रात असणारी गावे ही संगमनेर तालुक्यात 24 असून पारनेर तालुक्यात 12 आणि श्रीगोंदा तालुक्यात 11 आहेत. तर अकोले, राहुरी, पाथर्डी आणि जामखेड तालुक्यातील एकही गाव प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केलेले नाही.

बाधित गावे आणि कंसात सुरू न होणार्‍या शाळा:संगमनेर तालुका 24 गावे (71 शाळा). कोपरगाव 1 गावे (1), राहाता 7 गावे (24 शाळा), श्रीरामपूर 2 गावे (16 शाळा), नेवासा 2 गावे (22 शाळा), शेवगाव 4 गावे (22 शाळा), कर्जत 2 गावे (2 शाळा), पारनेर 12 गावे (20 शाळा), श्रीगोंदा 11 गावे (18 शाळा), नगर 4 गावे 2 शाळा).

ताज्या बातम्या

‘त्या’ वादग्रस्त विधानाप्रकरणी इंदुरीकर महाराजांना तूर्तास दिलासा

माय महाराष्ट्र न्यूज: अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी महिलांनाबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाविरोधात दाखल केलेल्या खटल्यात आज होणारी सुनावणी न्यायालयाने पुढे ढकलली आहे. तर...

त्या अभिनेत्रीला बलात्काराची धमकी;या खासदाराला द्यावा लागला राजीनामा

माय महाराष्ट्र न्यूज: अभिनेत्री माहिया माही हिला फोनवरून बलात्काराची धमकी दिल्यानंतर जमालपूरचे खासदार व देशाचे माहिती आणि प्रसारण मंत्री मुराद हसन यांनी आपल्या पदाचा राजीनामा...

 सर्दी, घसा खवखवणे अशी लक्षणे असणाऱ्या 3 पैकी 1 व्यक्तीला प्रत्यक्षात कोविड असू शकतो

माय महाराष्ट्र न्यूज:गेले दोन वर्षे संपूर्ण जग कोरोना विषाणूशी (Coronavirus) लढा देत आहे. सध्या जगभरात लसीकरणाद्वारे यावर मात केली जात आहे. गेल्या अनेक महिन्यांमध्ये...

आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आले हे महत्त्वाचे निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यातील न्यायसहायक विज्ञान संस्था मधून फॉरेन्सिक सायन्स पदवी व पदव्युत्तर पदवी विद्यार्थ्यांना न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाच्या अधिनस्त राज्यातील विविध प्रयोगशाळांमध्ये प्रतिवर्षी 150...

एकदिवसीय ऊस गाळपात ‘ज्ञानेश्वर’चा नवा उच्चांक

नेवासा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याने सध्या सुरू असलेल्या सन 2021-22 च्या हंगामात दि.07 डिसेंबर रोजी प्रतिदिन  7000...

नगर जिल्ह्यात या घाटात मध्यरात्री चारचाकी वाहनाला आग वाहन पूर्णतः जळून खाक;उलट-सुलट चर्चा सुरू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील करंजी घाट येथे मंगळवारी मध्यरात्री एका चारचाकी वाहनाला आग लागून या घटनेत हे चार चाकी वाहन पूर्णतः...
error: Content is protected !!