Friday, March 24, 2023

श्रीरामपूर येथील बैठकीत साखर कामगारांच्या प्रलंबित प्रश्नावर चर्चा

WhatsApp Image 2023-02-28 at 6.34.18 PM
Shadow

श्रीरामपूर/प्रतिनिधी

श्रीरामपूर येथे महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय साखर कामगार फेडरेशनचे अध्यक्ष अविनाश आदिक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या फेडरेशनच्या पदाधिकारी बैठकीत राज्यातील साखर कामगारांच्या प्रमुख असलेल्या विविध प्रश्नावर चर्चा झाली.

श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथील श्री.आदिक यांच्या निवासस्थानी झालेल्या या बैठकीला साखर कामगार फ़ेडरेशनचे सरचिटणीस नितीन पवार,खजिनदार डी.एम. निमसे, संपर्कप्रमुख सुखदेव फुलारी,नेवासा तालुका साखर कामगार संघटनेचे अध्यक्ष अशोकराव मिसाळ, अशोकराव पवार, संजय राऊत, आप्पासाहेब शिंदे आदी उपस्थित होते.
त्रिपक्षीय कराराची अंमलबजावणी, वेतनवाढ फरक,थकित वेतन,कायम व हंगामी कामगारांची ग्रॅच्युयटी, सेवानिवृत्त कामगारांचा पेन्शनचा प्रश्न,साखरेच्या किमान विक्री दरात वाढ या आणि इतर प्रश्नांवर चर्चा झाली.या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य व केंद्रीय सहकार-कामगार मंत्री तसेच माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांचेकडे शिष्टमंडळ नेऊन साखर कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांकडे
लक्ष वेधण्याचा निर्णय या वेळी घेण्यात आला.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!