Friday, December 3, 2021

भाजपाचे नेते शिवाजी कर्डीले यांना मोठा धक्का ! १० संचालक राष्ट्रवादीत

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:नगर तालुका दुध संघाच्या १० संचालकांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत गुरूवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. प्राजक्त तनपुरे, आमदार नीेलश लंके, रोहिदास पाटील यावेळी उपस्थित होते. माजी मंत्री तथा नगर तालुक्याचे भाजपा नेते शिवाजी कर्डीले यांना हा धक्का माणला जात आहे.

प्रवेश केलेल्या संचालकांमध्ये मोहन संतुजी तवले, भाउसाहेब गंगाराम काळे, गोरक्षनाथ रामभाऊ काळे, बजरंग किसन पाडळकर, रामदास शंकर शेळके, पुष्पा शरद कौठुळे, वैशाली आदीनाथ मते, राजाराम चंद्रभान धामणे, उध्दव रावसाहेब आमृते, स्वप्नील बाळासाहेब बुलाखे यांचा समावेश आहे.

यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, माजी जिल्हाध्यक्ष घनश्याम शेलार, प्रताप ढाकणे, गोविंद मोकाते, प्रा. सिताराम काकडे, बाळासाहेब जगताप, किसनराव लोटके, बाबासाहेब भिटे, रोहिदास कर्डीले, केशव बेरड, शरद पवार, प्रकाश पोटे, निखिल शेलार आदी उपस्थित होते.

विधानसभा निवडणूकीत मा. आ. शिवाजी कर्डीले यांना धक्कादायक पराभवाला समोरे जावे लागले होते. याच निवडणूकीत पारनेर नगर मतदार संघात राष्ट्रवादीचे उमेदवार नीलेश लंके यांना नगर तालुक्यातून भरभरून मतदान झाले होते.

कर्डीले यांना राहूरी, नगर मतदारसंघात नगर तालुक्यातून आघाडी मिळाली असली तरी त्या मतांमध्येही फाटाफूट झाल्याचे सांगितले जात आहे. आता आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती, बाजार समिती निवडणुकांच्या पार्श्‍वभुमिवर दुध संघाच्या संचालकांनी कर्डीले यांना रामराम ठोकल्याने त्यांच्यापुढील अडचणीनींमध्ये भर पडली आहे.

गुरूवारी सकाळी मंत्री पाटील यांच्या उपस्थितीत संचालकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला त्यावेळी आ. नीलेश लंके हे उपस्थित होते. यावेळी बोलताना ते म्हणाले, संचालकांच्या या निर्णयामुळे नगर तालुक्याच्या राजकाणात चांगलीच उलथापालथ झाली आहे. अनेक वर्षांपासून चर्चेत असलेल्या नगर तालुका दुध संघाने दुग्ध व्यवसायाला दिशा दिली.

संचालकांच्या या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला बळकटी मिळाली आहे. भविष्यातील बाजार समिती, जि. प. पंचायत समिती निवडणूकांमध्ये आम्ही आमची ताकद दाखवून देऊ अशी ग्वाही या संचालकांनी प्रदेशाध्यक्षांना दिली आहे. या सर्व संचालकांचे आपण पक्षात स्वागत करीत असल्याचे आ. लंके म्हणाले.

ताज्या बातम्या

मोठी बातमी:जे नको व्हायला पाहिजे तेच झाले:ओमिक्रॉनचा भारतात शिरकाव

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिअंटमुळे सध्या जगभरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी आज पत्रकार परिषद...

पोलिसांकडून महिलेकडे शरीरसुखाची मागणी

माय महाराष्ट्र न्यूज:महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामध्ये आता आणखी एक भर पडली आहे. खाकी वर्दीला कलंकित करणारी घटना जळगाव जामोद तालुक्यात...

पुन्हा एखादा अजित पवार होणार नाही याची काळजी घ्या :या नेत्यांचे मोठं विधान

माय महाराष्ट्र न्यूज:मुसलमानांनी सावध राहायला पाहिजे. इथल्या आंबेडकरी चळवळीने सावध राहील पाहिजे. मग अखिलेश यादव असतील, ममता बॅनर्जी असतील. काँग्रेसचे आणि  भाजपाच साटंलोट असल्याचं...

नगर ब्रेकिंग : स्विफ्ट कार व मोटरसायकलचा मोठा अपघात तीन तरुण गंभीर जखमी

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपुर-नेवासा रस्त्यावर असणाऱ्या अजित पवार पॉलिटेक्निक कॉलेज, वडाळा महादेव च्या समोर नेवासाकडून श्रीरामपूरकडे येणाऱ्या स्विफ्ट डिझायर एमएच.१८ ऐजे ८३६९ ने...

महाराष्ट्र शासनानं पुन्हा या नियमावलीत बदल

माय महाराष्ट्र न्यूज:ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या सुचनेनुसार राज्य शाससानं काल विमान प्रवासासंदर्भात नियमावली जाहीर केली होती. त्यानुसार, इतर राज्यांतून महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या विमान...

त्या’ वक्तव्यावरुन बाळासाहेब थोरात संतापले राष्ट्रवादीच्या या मंत्र्यांला म्हणाले तेवढी पात्रताच नाही

माय महाराष्ट्र न्यूज:पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्यात केलेल्या टीकेनंतर राज्यात काँग्रेस नेत्यांनी नाराजीचा सूर लावला आहे. देशातील दमनशाहीच्या विरोधात रस्त्यावर उतरून...
error: Content is protected !!