Friday, December 3, 2021

आजपासून नवे नियम, तुमच्या परवानगी शिवाय पैसे कापले जाणार नाही

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:1 ऑक्टोंबर पासून ऑटो डेबिटच्या नियमात बदल करण्यात आला आहे. त्यानुसार तुमच्या परवानगी शिवाय तुमच्या खात्यातून पैसे ऑटो डेबिट केले जाणार नाही आहेत. खरंतर आरबीआयने ग्राहकांना ऑटो डेबिट संदर्भात माहिती देण्यास सुरुवात केली आहे.

नवा नियम लागू झाल्यानंतर कोणत्याही डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्मवर हप्ता किंवा बिलाचे पैसे भरण्यासंदर्भातील प्रत्येत ट्रांजेक्शनसाठी ग्राहकाची परवानगी घेतली जाणार आहे. तर कोरोना व्हायरसच्या कारणामुळे आरबीआयने ऑटो डेबिटच्या नियमाची मुदत 30 सप्टेंबर पर्यंत वाढवली होती. तर ऑटो डेबिटची मुदत 1 एप्रिल पासून सुरु करण्याबद्दल सांगण्यात आले होते.

प्राप्त झालेल्या माहितीनुसार, नव्या नियमाअंतर्गत मोबाइल फोनचे बिल, लाइट बिल, पाण्याचे बिल किंवा कोणत्याही प्रकारचे पेमेंट करता येऊ शकते. तर 5 हजार रुपयांच्या खालील बिल रद्द होतील किंवा ऑटो डेबिटच्या परवानगी नंतर खात्यातून पैसे कापले जातील.

जर बिल 5 हजार रुपयांहून अधिक असेल आणि 30 सप्टेंबर नंतर नियमाचे पालन करता ऑनलाइन ट्रान्सफर करावे लागणार आहे. तसेच इंश्युरन्स प्रीमियम सुद्धा 5 हजारांपेक्षा अधिक असेल तर ऑटो डेबिट होणार नाही. अशा स्थितीत क्रेडिट कार्डच्या माध्यमातून CVV आणि OTP च्या माध्यमातून ट्रांजेक्शन पूर्ण करता येईल.

दरम्यान, बँकांनी आपल्या ग्राहकांना नव्या नियमाची माहिती देण्यास सुरुवात केली आहे. बँकांनी ग्राहकांना ऑटो डेबिटच्या नियमाबद्दल सुचित केले आहे. त्यांनी असे म्हटले की, नव्या नियमानुसार कार्डवर दिल्या जाणाऱ्या सध्याच्या गाइडलाइन्सचे पालन केले जाणार नाही आहे. सर्विसमध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा येऊ नये

 म्हणून थेट मर्चेंटला कार्डच्या माध्यमातून पैसे देता येणार आहेत. तसेच नव्या नियमानुसार, बँक खात्यातून पेमेंट होण्याच्या 5 दिवस आधी ग्राहकांना नोटिफिकेशन पाठवले जाणार आहेत. ग्राहकांच्या परवानगीनंतरच ट्रांजेक्शन पूर्ण होणार आहे. या व्यतिरिक्त 5 हजारांहून अधिक ट्रांजेक्शनसाठी बँकांनी ग्राहकांना ओटीपी पाठवावा.

ताज्या बातम्या

मोठी बातमी:जे नको व्हायला पाहिजे तेच झाले:ओमिक्रॉनचा भारतात शिरकाव

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिअंटमुळे सध्या जगभरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी आज पत्रकार परिषद...

पोलिसांकडून महिलेकडे शरीरसुखाची मागणी

माय महाराष्ट्र न्यूज:महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामध्ये आता आणखी एक भर पडली आहे. खाकी वर्दीला कलंकित करणारी घटना जळगाव जामोद तालुक्यात...

पुन्हा एखादा अजित पवार होणार नाही याची काळजी घ्या :या नेत्यांचे मोठं विधान

माय महाराष्ट्र न्यूज:मुसलमानांनी सावध राहायला पाहिजे. इथल्या आंबेडकरी चळवळीने सावध राहील पाहिजे. मग अखिलेश यादव असतील, ममता बॅनर्जी असतील. काँग्रेसचे आणि  भाजपाच साटंलोट असल्याचं...

नगर ब्रेकिंग : स्विफ्ट कार व मोटरसायकलचा मोठा अपघात तीन तरुण गंभीर जखमी

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपुर-नेवासा रस्त्यावर असणाऱ्या अजित पवार पॉलिटेक्निक कॉलेज, वडाळा महादेव च्या समोर नेवासाकडून श्रीरामपूरकडे येणाऱ्या स्विफ्ट डिझायर एमएच.१८ ऐजे ८३६९ ने...

महाराष्ट्र शासनानं पुन्हा या नियमावलीत बदल

माय महाराष्ट्र न्यूज:ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या सुचनेनुसार राज्य शाससानं काल विमान प्रवासासंदर्भात नियमावली जाहीर केली होती. त्यानुसार, इतर राज्यांतून महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या विमान...

त्या’ वक्तव्यावरुन बाळासाहेब थोरात संतापले राष्ट्रवादीच्या या मंत्र्यांला म्हणाले तेवढी पात्रताच नाही

माय महाराष्ट्र न्यूज:पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्यात केलेल्या टीकेनंतर राज्यात काँग्रेस नेत्यांनी नाराजीचा सूर लावला आहे. देशातील दमनशाहीच्या विरोधात रस्त्यावर उतरून...
error: Content is protected !!