Friday, March 24, 2023

पुरवठा निरीक्षकांवर कारवाईसाठी नेवासा काँग्रेसचे तहसिल समोर धरणे आंदोलन

WhatsApp Image 2023-02-28 at 6.34.18 PM
Shadow

नेवासा/प्रतीनिधी

रेशन अन्नधान्य वितरण व्यवस्थेमध्ये सुधारणा करण्यात यावी व पुरवठा निरीक्षकांवर कारवाई करावी या मागणीसाठी दि.१३ मार्च रोजी नेवासा काँग्रेसकडून तहसिल कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आले.

सविस्तर वृत्त असे की, नेवासा तालुक्यातील रेशन अन्नधान्य वितरण व्यवस्थेविषयी तालुक्यातील गोरगरीब जनतेच्या असंख्य तक्रारी असून ऐकून घेणारा कोणीही वाली राहिला नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. तालुक्यातून रेशन अन्नधान्य वितरणतील अन्नधान्य मोठ्या प्रमाणात काळ्या बाजारात विक्री होते अशाही तक्रारी असून याअगोदर अनेकदा तस्करीचा माल हस्तगत करूनही तस्करी करणाऱ्यावर कुठल्याही प्रकारची ठोस कारवाई झालेली दिसून येत नाही. नेवासा तालुका काँग्रेस पक्षाने सर्वसामान्य जनतेचे ह्या प्रश्नाची दखल घेऊन नेवासा तहसीलदार यांना याबाबत निवेदन देवुन रेशन अन्नधान्य वितरण व्यवस्था मधे सुधारणा करण्याची मागणी केली होती. परंतू प्रशासनाच्या बोटचेपी भूमिकामुळे या व्यवस्थेमध्ये कोणताही फरक पडला नाही. आज नेवासा काँग्रेसकडून आक्रमक भूमिका घेत नेवासा तहसिल कार्यालयावर आंदोलनाचा आक्रमक पवित्रा घेत धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी रेशन अन्नधान्य वाहतूक दरम्यान मोठ्या प्रमाणात होणारी तस्करी थांबविण्यासाठी तातडीने वाहनांना जीपीएस सिस्टिम बसवावी. रेशन अन्नधान्य वितरकाकडून रेशनचे पूर्णपणे वाटप करण्यात येत नाही. शिल्लक माल काळ्या बाजारात विक्रीचे प्रमाण फार मोठे आहे. यात पुरवठा निरीक्षक यांची भूमिका महत्वाची असूनयात कसूर करणाऱ्या पुरवठा निरीक्षक वर कारवाईची मागणी करण्यात आली याशिवाय नविन रेशन कार्ड धारकांना कूपन असूनही धान्य मिळत नाही अशांसाठी तातडीने तालुक्यातील ग्रामपंचायती कडून ठराव घेवून रेशनचा कोटा वाढ करुन घेवून त्वरित कार्ड धारकांना रेशन सूरू करण्याची मागणी करण्यात आली.याशिवाय काही दिवसापूर्वी भानसहिवरे या ठिकाणी रेड मारून रेशन अन्नधान्यचा मोठा साठा जप्त करण्यात आला होता यावेळी पुरवठा निरीक्षक कुठे होते.त्यांच्यावर कारवाई का करण्यात आली नाही. की ते यात सहभागी होते. ही विचारणा करुन पुरवठा निरीक्षक यांना यास जबाबदार धरून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी यावेळी लेखी निवेदन देवुन करण्यात आली. यावेळी नेवासा काँग्रेसचे अध्यक्ष संभाजी माळवदे यांनी नेवासा तालुक्यात रेशन व्यवस्थेमधे त्वरित सुधारणा न केल्यास व रेशन तस्करी न थांबल्यास काँग्रेस पक्षाकडून आक्रमक भूमिका घेण्यात येवून गोरगरीब जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल.वेळप्रसंगी वेळ पडल्यास मंत्रालयासमोर निदर्शने करण्यात येतील असे स्पष्ट केले.
आंदोलनंवेळी रेशन अन्नधान्य लाभार्थीसह नेवासा तालुका काँग्रेसचे शहरध्यक्ष रंजन जाधव, जिल्हा काँग्रेसचे संदीप मोटे, उपाध्यक्ष सतिष तऱ्हाळ, मुसा बागवान, संजय होडगर, शाम मोरे, मेजर गढेकर, मोहन भवाळ, संतोष बर्डे, अंजुम पटेल, ओमकार चौधरी, अनिल बर्डे महीला अध्यक्ष शोभा पातारे, राणी भोसले, ज्योती भोसले, संगीता चांदणे, आदी उपस्थित होते. यावेळी तहसील कार्यालयासमोर रेशन व्यवस्था सुधारणा झालीच पाहिजे, रेशन तस्करी थांबलीच पाहिजे अशा घोषणा देण्यात आल्या. व नेवासां तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.

 

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!