माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.कोरोनाची लाट ओसरली असली तरी धोका मात्र अजूनही कायम आहे.
आता कोरोनापाठोपाठ H3N2 व्हायरसने डोक वर काढलं आहे. देशात नव्याने आढळलेल्या H3N2 व्हायरससह कोरोनाची लागण झालेल्या अहमदनगरमधील एका रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती.
After Corona, H3N2 virus has raised its head. A patient has died in Ahmednagar who was infected with the newly discovered H3N2 virus in the country
समोर आली आहे. या रुग्णाचे नमुने तपासणीसाठी पुढे पाठवण्यात आले आहे.दैनिक दिव्य मराठीने दिलेल्या वृत्तानुसार, हा रुग्ण मेडिकल कॉलेजचा विद्यार्थी होता. त्याच्यावर एका
खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या रुग्णाला कोरोनाची लागण झाली होती. त्याच्या संपर्कात आलेल्या 19 जणांचे नमुने तपासणीसााठी पाठवण्यात आले आहे. हा तरुण
बाहेर फिरायला गेला होता. त्यानंतर त्यांची तपासणी केली असता H3N2 बाधित असल्याचे निष्पन्न झाले होते.देशभरात ‘एच ३ एन २’ या विषाणूचे रुग्ण आढळले आहेत. राज्यातील अनेक शहरांतही रुग्ण आढळले असून,
नगरमध्येही संशयित रुग्ण आढळून आला आहे. एका मेडिकल कॉलेजचा तो विद्यार्थी असून, बाहेर फिरून आल्यानंतर त्याला फ्लूची लक्षणे दिसल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
इन्फ्लुएन्झा ए, ‘एच ३ एन २’सह तो कोरोनाबाधित असल्याचा अहवाल रुग्णालयाने दिला आहे.