Friday, October 22, 2021

नगरमध्ये धनंजय मुंडे म्हणाले फडणवीस माझे मित्र, मी त्यांना म्हणालो, काहीही करा पण…

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे तसेच राष्ट्रवादीचे दिग्गज नेते आज अहमदनगरच्या दौऱ्यावर होते. यावेळी धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत आमदार निलेश लंके यांच्या मतदारसंघातील विविध विकासकामांचं उद्घाटन झालं.

यावेळी बोलताना धनंजय मुंडे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर खरमरीत शब्दात टीका केली.शरद पवार यांनी माझ्यात काय पाहिलं ते मला माहिती नाही. मी निवडणुकीमध्ये पडलो तरी मला विरोधी पक्षनेतेपद दिलं. माझ्या घरातील लोकांना माझ्यामध्ये

जे दिसलं नाही ते शरद पवार यांना दिसलं. लोक म्हणतात मराठा आरक्षण राष्ट्रवादीमुळे मिळालं नाही. पण शरद पवार यांनी 18 पगड जातीतील लोकांना एकत्र घेऊन काम केलं. मराठा, ओबीसी आरक्षण आता आलं. साक्षी पुरावे भाजपच्या काळात झाले. निकाल आमच्या काळात लागला. तरी दोष आम्हाला दिला जातो.

देवेंद्र फडणवीस माझे मित्र आहेत. त्यांना मी म्हणालो होतो की काहीही करा पण शरद पवार यांचा नाद करु नका,” असे धनंजय मुंडे म्हणाले.तसेच कोरोना संसर्ग झाल्यानंतरच्या दुखद आठवणीसुद्धा मुंडे यांनी यावेळी सांगितल्या. “लंके यांच्यात अद्भुत शक्ती आहे. कोरोनाकाळात तुम्ही माणुसकी दाखवली.

कोरोनाची पहिली आणि दुसरी लाट आली. यामध्ये मला कोरोना संसर्ग झाला. मला कोरोनाची लागण झाल्याचे रात्री बारा वाजता समजले. कोविडच्या संकटात मी माणुसकी मेलेली पहिली आहे. कोरोना होण्याआधी मी फिरत होतो, तेव्हा 50 लोक माझ्यासोबत असायची. मात्र कोरोना झाला तेव्हा

मी एकटाच रुग्णवाहिकेमध्ये बसलो होतो. माझ्यासोबत कोणीच नव्हते, अशी वेदना धनंजय मुंडे यांनी बोलून दाखवली.

ताज्या बातम्या

माजी आमदार मुरकुटेंनी राष्ट्रवादी काँग्रेसला बळ देण्यासाठी थेट अजित पवारांकडून आग्रह

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राजकारण नेहमी राज्याच्या राजकारणात नेहमी वरचढ ठरले आहे. जिल्ह्यातील अनेक नेते हे राज्याचे राजकारण चालवतात.यामध्ये महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, जलसंधारण...

शिवाजी कर्डिले म्हणाले खा विखेंच्या म्हणण्यानुसार मी जर आमदार झालो, तर ?…

माय महाराष्ट्र न्यूज:नगर तालुक्यातील एका कार्यक्रमात माजी मंत्री शिवाजी कर्डिले बोलत होते. यावेळी खा. डॉ.सूजय विखे , आ. बबनराव पाचपुते यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित...

करोना महामारी सहा महिन्यांत संपणार:,नगर जिल्ह्यातील भगत यांची भविष्यवाणी

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मिरी येथील ग्रामदैवत राजा विरभद्र देवस्थानचा तीन दिवसीय यात्रा उत्सवाची सांगता गुरुवारी भगत यांच्या होईकाने शांततेत पार...

नगर जिल्ह्यात कांद्याच्या भावात मोठी घसरण

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या भावात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली होती त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होतं पण पुन्हा कांद्याच्या भावात घसरण...

आजपासून नाट्यगृहे, चित्रपटगृहे सुरु ; हे आहे नियम

माय महाराष्ट्र न्यूज:आजपासून नाट्यगृहे, चित्रपटगृहे सुरु होणारेत. तसंच आजपासून अम्युझमेंट पार्कही खुली केली जाणार आहेत.सुरुवातील राज्य सरकारनं शाळा, मंदिरं सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर...

नगर ब्रेकिंग:दोन मुले असलेल्या बापाने लग्नाचे आमिष दाखवून 21 वर्षीय अविवाहित तरूणीला पळवून नेले

    माय महाराष्ट्र न्यूज:दोन मुले असलेल्या बापाने लग्नाचे आमिष दाखवून 21 वर्षीय अविवाहित तरूणीला फूस लावून पळवून नेल्याची घटना दि. 19 ऑक्टोबर रोजी घडली.अहमदनगर जिल्ह्यातील...
error: Content is protected !!