Wednesday, October 27, 2021

Whatsapp ने 20 लाखाहून अधिक भारतीयांचे केले व्हॉट्स अॅप बंद आता तुमचा तर नंबर नाही ना

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप आणि इन्स्टाग्रामने नवीन आयटी नियमांतर्गत कठोर कारवाई सुरू केली आहे. त्याअंतर्गत ऑगस्ट 2021 दरम्यान व्हॉट्सअ‍ॅपने 20 लाखहून अधिक भारतीय युजर्सला बॅन केले.

व्हॉट्सअपने 16 जून ते 31 जुलैदरम्यान 594 तक्रारी मिळाल्यानंतर 3,027,000 भारतीय युजर्सचे अकाउंट्स बंद केले होते. 95 टक्के प्रकरणांत स्पॅम मेसेजेसमुळे अकाउंट्स बॅन केल्याचे व्हॉट्सअ‍ॅपने सांगितले.

जागतिक स्तरावर WhatsApp ने एका महिन्यात जवळपास 80 लाख अकाउंट्स बॅन केले. दरम्यान आयटीच्या नव्या नियमांनुसार फेसबुकने कोट्यवधी युजर्सला आपल्या प्लॅटफॉर्मवरुन हटवलं होतं. इन्स्टाग्रामनेही 20 लाखहून अधिक युजर्स हटवले होते.

End-to-end encryption पॉलिसीमुळे युजर्सचे मेसेज पाहता येत नाहीत. अशात युजर्सची सुरक्षा लक्षात घेता अकाउंट्सकडून मिळणारे संकेत, एन्क्रिप्शनशिवाय काम करणारे फीचर्स आणि युजर्सकडून करण्यात आलेले रिपोर्ट्स या आधारावर निर्णय घेतला जातो. नव्या आयटी नियमांनुसार

सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सला दर महिन्याला कंप्लायन्स रिपोर्ट द्यावा लागतो.WhatsApp रिपोर्टनुसार, ऑगस्टदरम्यान अकाउंट्स सपोर्ट (105), बॅन अपील (222), इतर सपोर्ट (34), प्रोडक्ट सपोर्ट (42) आणि सेफ्टी (17) मध्ये 420 यूजर रिपोर्ट मिळाले. तर Facebook ने ऑगस्ट 2021

दरम्यान नियमांच्या उल्लंघनाच्या 10 कॅटेगरीमध्ये 3.17 कोटी सामग्रीविरोधात कारवाई केली. ऑगस्टमध्ये इन्स्टाग्रामने 9 वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये 22 लाख कंटेंट प्लॅटफॉर्मवरुन रिमूव्ह केला.कंप्लायन्स रिपोर्टनुसार, तीन कोटीहून अधिक कंटेंटमध्ये स्पॅम 2.9 कोटी, हिंसा 26 लाख,

अडल्ट न्यूडिटी आणि सेक्शुअल अ‍ॅक्टिविटी 20 लाख, हेट स्पीच 2,42,000 सह दुसऱ्या इतर मुद्द्यांशी संबंधित कंटेंट सामिल आहे, ज्यामुळे परिस्थिती खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा सर्व कंटेंटविरोधात कठोर कारवाई करत त्यांना प्लॅटफॉर्मवरुन हटवण्यात आले आहे.

ताज्या बातम्या

यंदाची थंडी जोरदार; हवामान खात्याचा इशारा

माय महाराष्ट्र न्यूज:देशात वातावरणात गारठा वाढला असून हिवाळ्याची चाहूल लागली आहे. हिवाळा अद्याप सुरू झाला नसला तरी यंदाची थंडी हाडं गोठवणारी असणार आहे अशी...

नगर ब्रेकींग :मोठा अपघात तरुण व्यावसायिक ठार; कारचा चक्काचूर

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर खुर्द शिवारात झालेल्या भीषण अपघातात कृष्णा सुभाष करपे हा तरुण व्यावसायिक ठार झाला या घटनांनी संपूर्ण शहरातून हळहळ...

नगर जिल्ह्यातील घटना:16 वर्षांच्या मुलांची वडिलांना होणाऱ्या त्रासामुळे आत्महत्या ?

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर वाडेकर गल्ली येथील श्रेयस गणेश वाडेकर या तरुणाने मानसिक संतापातून मंगळवारी सकाळी घरातच पंख्याला  गळफास घेऊन आत्महत्या केल्याची...

बापरे:नगरमध्ये उच्चभ्रू वस्तीत सुरू होता हा धक्कादायक प्रकार;तीन महिलांची सुटका

माय महाराष्ट्र न्यूज:नगर शहरात उच्चभ्रू वस्तीत पश्निम बंगालमधील महिलांना आणून वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे पोलिसांच्या छाप्यात उघड झाले. डीवायएसपी संदीप मिटके यांच्या पथकाने नगर...

नगर जिल्ह्यातील प्रकार: एकतर्फी प्रेमातून तरुणीवर हल्ला अखेर…

माय महाराष्ट्र न्यूज:एकतर्फी प्रेमातून तरुणीवर सत्तूरने हल्ला केल्याबद्दल असिफ कबीर पठाण (रा. हरेगाव, ता. श्रीरामपूर) याला सात वर्ष सक्‍तमजुरी आणि 35 हजार रुपये दंडाची...

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत मिळणार; महसूल व वन विभागाचा शासन निर्णय जारी

माय महाराष्ट्र न्यूज :  ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यात राज्यातील विविध जिल्ह्यात अतिवृष्टी तसेच पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत देण्यात येणार...
error: Content is protected !!