Wednesday, October 27, 2021

नगर जिल्ह्यात नितीन गडकरी येऊन गेले पण या एका पोस्टची जिल्ह्यात चर्चा

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या 4 हजार 74 कोटी रुपयांच्या रस्त्यांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा काल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाला. या कार्यक्रमात नितीन गडकरी यांनी स्वर्गीय माजी खासदार दिलीप गांधी यांच्या स्मृतीस उजाळा दिला.

नितीन गडकरी यांनी सांगितले की, अहमदनगर शहराच्या उड्डाणपूल कामासाठी दिलीप गांधी 8 ते 10 वेळा मला दिल्लीत भेटले. या कामाचे भूमिपूजन माझ्या हस्ते व्हावे ही त्यांची इच्छा होती. मात्र ती माझ्याकडून पूर्ण होऊ शकली नाही, असे गडकरींनी सांगितले.

या कार्यक्रमानंतर नितीन गडकरी यांनी दिलीप गांधी यांच्या निवासस्थानी जावून गांधी परिवाराची भेट घेतली. स्व.गांधी यांच्या फोटोस अभिवादन केले. दिलीप गांधी यांच्या पत्नी सरोज गांधी, देवेंद्र गांधी, सुवेंद्र गांधी व स्वानंद नवसारीकार यांच्याशी त्यांनी संवाद साधला.

अमर रेहे अमर रहे दिलीप गांधी अमर रहे… अशा घोषण यावेळी उपस्थितांनी दिल्या. या प्रसंगी माजी मंत्री राम शिंदे, शिवसेनेचे विक्रम राठोड आदींसह मोठ्यासंख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

दरम्यान आज एक पोस्ट समोर आली आहे ती अशी की २०१६-२०१७ मध्ये जेव्हा खासदार मा. केंद्रीय मंत्री स्व.दिलीपजी गांधी हे सांगायांचे की अमुक हजार कोटीचा रस्ता होणार तमुक कामे होणार तेव्हा ते सर्वांना खोटे वाटायचे. काही नतभ्रष्ट लोक गांधी साहेबांना भपारीबाज, खोटारडे म्हणायचे.

सकाळी उठलं की गांधी साहेबांच्या विरोधात प्रेस, सोशल मीडियात पोस्ट हा त्यांचा रोजचाच कार्यक्रम.आमचे गांधी साहेब खोटारडे नव्हते, भापारीबाज नव्हते हे आज तुमच्यामुळे सर्व नगरकर जनतेस कळाले. नवीन पुणे शहर वसवण्याची अफाट कल्पना

त्यांना ७ वर्षांपूर्वीच सुचली, मतदारसंघातील रस्ते काँक्रीटचे व्हावे म्हणजे पुढच्या ५०-६० वर्ष परत पाहायला नको ही दुरदृष्टी त्यांच्याकडे होती. डांबराचे रस्ते तर कधीच झाले असते आणि उखडलेही असते. तेच त्यांना नको होते.आज शहरातील उड्डाणपूल, शहरातील पाणीपुरवठा योजना,

शहरातील बाह्यवळण रस्ता जिल्ह्यातील अनेक रस्ते, रेल्वेची अंडरग्राऊंड पुल ,रेल्वेची 2700कोटींची नवीन रेल्वे मार्ग चे कामे होतांना दिसताय तसेच तरुणांच्या हाताला काम मिळावे म्हणून सुपा एमआयडीसीचा विस्तार केला व त्यामध्ये नवनवीन कंपनीच्या प्लंट उभे केले

त्यामुळे तरुणांना रोजगार उपलब्ध झाला त्यासाठी गांधी साहेबांनी १०-१५ वर्षे खूप परिश्रम घेतले. वेळोवेळी संबंधीत विभागाशी सतत पाठपुरावा केला. आमचे गांधी साहेब हे विकासाची दुरदृष्टि असणारे नेते होते. हे आज आपल्या मुळे नगरकरांना स्पष्ट झाले. गडकरी साहेब आपले खुप खुप आभार.

– सचिन दिलीपराव गायकवाड पाटील श्रीगोंदा

ताज्या बातम्या

यंदाची थंडी जोरदार; हवामान खात्याचा इशारा

माय महाराष्ट्र न्यूज:देशात वातावरणात गारठा वाढला असून हिवाळ्याची चाहूल लागली आहे. हिवाळा अद्याप सुरू झाला नसला तरी यंदाची थंडी हाडं गोठवणारी असणार आहे अशी...

नगर ब्रेकींग :मोठा अपघात तरुण व्यावसायिक ठार; कारचा चक्काचूर

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर खुर्द शिवारात झालेल्या भीषण अपघातात कृष्णा सुभाष करपे हा तरुण व्यावसायिक ठार झाला या घटनांनी संपूर्ण शहरातून हळहळ...

नगर जिल्ह्यातील घटना:16 वर्षांच्या मुलांची वडिलांना होणाऱ्या त्रासामुळे आत्महत्या ?

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर वाडेकर गल्ली येथील श्रेयस गणेश वाडेकर या तरुणाने मानसिक संतापातून मंगळवारी सकाळी घरातच पंख्याला  गळफास घेऊन आत्महत्या केल्याची...

बापरे:नगरमध्ये उच्चभ्रू वस्तीत सुरू होता हा धक्कादायक प्रकार;तीन महिलांची सुटका

माय महाराष्ट्र न्यूज:नगर शहरात उच्चभ्रू वस्तीत पश्निम बंगालमधील महिलांना आणून वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे पोलिसांच्या छाप्यात उघड झाले. डीवायएसपी संदीप मिटके यांच्या पथकाने नगर...

नगर जिल्ह्यातील प्रकार: एकतर्फी प्रेमातून तरुणीवर हल्ला अखेर…

माय महाराष्ट्र न्यूज:एकतर्फी प्रेमातून तरुणीवर सत्तूरने हल्ला केल्याबद्दल असिफ कबीर पठाण (रा. हरेगाव, ता. श्रीरामपूर) याला सात वर्ष सक्‍तमजुरी आणि 35 हजार रुपये दंडाची...

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत मिळणार; महसूल व वन विभागाचा शासन निर्णय जारी

माय महाराष्ट्र न्यूज :  ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यात राज्यातील विविध जिल्ह्यात अतिवृष्टी तसेच पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत देण्यात येणार...
error: Content is protected !!