Wednesday, October 27, 2021

एमबीए करणाऱ्या युवतीशी फेसबुक फ्रेंडकडून युवती दोनदा गर्भवती अन् पुढे..

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: एमबीए करणाऱ्या युवतीशी फेसबुकवरून ओळख झाल्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला नेले. तिच्यावर बळजबरी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. ती गर्भवती राहिल्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून दोनदा गर्भपात केला.

याप्रकरणी युवतीच्या तक्रारीवरून कळमना पोलिसांनी युवकावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला. रोशन अनिल ठाकरे (२९, रा. ओमनगर, कळमना) असे आरोपीचे नाव आहे.२१ वर्षीय तरुणी रिया (बदललेले नाव) एमबीए फायनान्स अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाला आहे.

२०१९ मध्ये फेसबुकच्या माध्यमातून तिची रोशनसोबत ओळख झाली. एक वर्ष ते फेसबुकच्या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात होते. त्यानंतर सप्टेंबर २०२० मध्ये त्यांनी एकमेकांचे मोबाईल क्रमांक दिले. मोबाईल क्रमांक दिल्यानंतर ते व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून संवाद साधत असत.

त्याने तिला लग्नाचे आमिष दाखवले होते. सप्टेंबर २०२० मध्ये तरुणीचा वाढदिवस होता. घरच्यांना लोकांना खोटे सांगून ती रोशनसोबत पचमढीला गेली. त्यावेळी रोशनचा एक मित्र व त्याची मैत्रीण सोबत होती. पचमढी येथे त्याने शारीरिक संबंधाची मागणी केली

असता तरुणीने नकार दिला. आपण लग्न करणार आहोत असे बोलून तिला विश्वासात घेतले आणि अत्याचार केला.त्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तो तिचे शोषण करीत होते. दरम्यान, तिला दिवस गेले. दोन महिन्यांनंतर हा प्रकार तिच्या लक्षात आला.

ही माहिती तिने रोशनला दिली असता त्याने गर्भपाताच्या गोळ्या आणून दिल्या. तरुणी गर्भपात करण्यास तयार नव्हती. तरीही तो तिला धमक्या देत जबरीने गर्भपात करून घेतला.प्रेयसीच्या विरोधात तक्रारतरुणीने त्याच्यामागे लग्नासाठी तगादा लावला होता. परंतु, काही ना कारण सांगून तिला टाळत होता.

काही दिवसानंतर तिला हॉटेलमध्ये नेऊन पुन्हा तिचे शोषण केले. त्याही वेळी तिने गर्भपात करून घेतला. तरुणीचा पिच्छा सोडण्यासाठी त्याने तिच्या विरोधात हुडकेश्वर पोलिसात तक्रार केली. आपल्या तक्रारीत त्याने तरुणी ही मला पैशासाठी

ब्लॅकमेल करीत असल्याचे सांगितले होते. रोशनने तरुणीच्या विरोधात पोलिसात तक्रार केल्याचे तरुणीला समजताच ती संतापली. लगेच तिने कळमना पोलिस ठाणे गाठून त्याच्या विरोधात तक्रार केली

ताज्या बातम्या

यंदाची थंडी जोरदार; हवामान खात्याचा इशारा

माय महाराष्ट्र न्यूज:देशात वातावरणात गारठा वाढला असून हिवाळ्याची चाहूल लागली आहे. हिवाळा अद्याप सुरू झाला नसला तरी यंदाची थंडी हाडं गोठवणारी असणार आहे अशी...

नगर ब्रेकींग :मोठा अपघात तरुण व्यावसायिक ठार; कारचा चक्काचूर

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर खुर्द शिवारात झालेल्या भीषण अपघातात कृष्णा सुभाष करपे हा तरुण व्यावसायिक ठार झाला या घटनांनी संपूर्ण शहरातून हळहळ...

नगर जिल्ह्यातील घटना:16 वर्षांच्या मुलांची वडिलांना होणाऱ्या त्रासामुळे आत्महत्या ?

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर वाडेकर गल्ली येथील श्रेयस गणेश वाडेकर या तरुणाने मानसिक संतापातून मंगळवारी सकाळी घरातच पंख्याला  गळफास घेऊन आत्महत्या केल्याची...

बापरे:नगरमध्ये उच्चभ्रू वस्तीत सुरू होता हा धक्कादायक प्रकार;तीन महिलांची सुटका

माय महाराष्ट्र न्यूज:नगर शहरात उच्चभ्रू वस्तीत पश्निम बंगालमधील महिलांना आणून वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे पोलिसांच्या छाप्यात उघड झाले. डीवायएसपी संदीप मिटके यांच्या पथकाने नगर...

नगर जिल्ह्यातील प्रकार: एकतर्फी प्रेमातून तरुणीवर हल्ला अखेर…

माय महाराष्ट्र न्यूज:एकतर्फी प्रेमातून तरुणीवर सत्तूरने हल्ला केल्याबद्दल असिफ कबीर पठाण (रा. हरेगाव, ता. श्रीरामपूर) याला सात वर्ष सक्‍तमजुरी आणि 35 हजार रुपये दंडाची...

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत मिळणार; महसूल व वन विभागाचा शासन निर्णय जारी

माय महाराष्ट्र न्यूज :  ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यात राज्यातील विविध जिल्ह्यात अतिवृष्टी तसेच पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत देण्यात येणार...
error: Content is protected !!