Monday, October 25, 2021

परिश्रम घेतल्यास कोणतेही यश दूर नाही-नरेंद्र घुले पाटील

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा

आयएएस अधिकारी म्हणण्याची पद्धत असली तरी सर्वप्रथम तो लोकशाहीचा नोकर असतो. त्यामुळे अधिकाऱ्यापेक्षा लोकशाहीचा नोकर होऊन लोकांची कामे करेल अशी ग्वाही केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षेत देशात 37 वे तर राज्यात 2 रे आलेले विनायक नरवडे यांनी केले.
तर आपण निवडलेल्या क्षेत्रात प्रामाणिकपणा ठेऊन परिश्रम केले तर कोणते ही यश आपल्या पासून दूर राहू शकत नाही असा विश्वास माजी आमदार नरेंद्र घुले पाटील यांनी व्यक्त केला.नेवासा तालुक्यातील भेंडा येथील श्री.मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्था व जिजामाता विद्यालय माजी विद्यार्थी संघाचे संयुक्त विद्यमाने शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार नरेंद्र घुले पाटील यांचे हस्ते श्री.नरवडे यांचा सत्कार करण्यात आला.त्यावेळी ते बोलत होते.

व्यासपीठावर अप्पर जिल्हाधिकारी गुलाबराव खरात,ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे उपाध्यक्ष माजी आमदार पांडुरंग अभंग,संचालक अड.देसाई देशमुख, काशीनाथ नवले,अशोकराव मिसाळ,बाजार समितीचे सभापती डॉ.शिवाजी शिंदे,कार्यकारी संचालक अनिल शेवाळे,सचिव रवींद्र मोटे,कामगार संचालक सुखदेव फुलारी,एकनाथ कोलते,आप्पासाहेब खरड,डॉ.कारभारी नरवडे,सौ.पुष्पा नरवडे,डॉ.जगन्नाथ नरवडे,रामकृष्ण नवले,अशोक वायकर,गणेश गव्हाणे,शंकर भारस्कर, संजय मनवेलीकर,डॉ.संतोष फुलारी, उपसरपंच दादा गजरे उपस्थित होते.

श्री.नरवडे पुढे म्हणाले,सरकार पूर्ण मदत व आयएएस पदावर सध्या कार्यरत असलेले अधिकारी सर्वोतोपरी सहकार्य करण्यासाठी तयार आहेत.फक्त आपण अभ्यास करून आपल्याला सिद्ध केले पाहिजे. स्वतःमध्ये आत्मविश्वास असला पाहिजे.रोजचे पंधरा-सोळा तास अभ्यासाची तयारी ठेवा,मी हे करू शकतो असे स्वतःला प्रोत्साहित केले पाहिजे.जीवनात कधीही हताश होऊ नका. प्रामाणिक प्रयत्न केल्यावर परमेश्वराचा कृपाआर्शीवाद मिळतोच, यश प्राप्त होतेच. जीवनात खरे बोला, दररोज नवीन शिकत जा . मोठी स्वप्न पहा व कष्ट करून स्वप्न पूर्ण करा. अमेरीकेतून नोकरी सोडून जनसेवा व देशसेवेकरिता परत मायदेशी आलो. पुढील जीवन प्रशासकीय सेवेच्या माध्यमातून जनसेवेसाठी असेल .

श्री.नरेंद्र घुले म्हणाले,
जीवनात दररोज घडणाऱ्या लहान गोष्टी देखील आपल्याला काहीतरी नवीन शिकवत असतात ,म्हणून ‘पहा व शिका ‘ हा जीवनाचा मुलमंत्र असला पाहीजे .विदयार्थी जीवनात प्रामाणिक प्रयत्न केले व परीश्नम घेतले तर निश्चित केल्यास यश प्राप्त होते . गुणवत्तेला कार्यक्षमतेची जोड दया तसेच आपल्या ज्ञानाचा उपयोग समाजहितासाठी करावा.

अप्पर जिल्हाधिकारी गुलाबराव खरात
म्हणाले, घुले पाटील शिक्षण संस्थेचे अनेक विदयार्थी अनेक क्षेत्रात यशस्वी काम करत आहेत हे कौतुकास्पद आहे.
या संस्थेचे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेतून अधिकारी व्हावे यासाठी त्यांना प्रोत्साहन पर बक्षीस देण्याकरीत  दरवर्षी एक लाख रुपये देण्याचे जाहीर केले.

प्राचार्य सुरेश साबळे, उपप्राचार्य भाऊसाहेब विधाटे, पर्यवेक्षक  बाबासाहेब धनवटे, श्रीमती बी.एस. महाजन,पत्रकार नामदेव शिंदे, रमेश पाडळे , प्रा संतोष सोनवणे, संजय मनवेलीकर ,प्रा सुधाकर नवथर  प्रा गोरक्षनाथ पाठक ,सतीश वाणी, रावसाहेब मरकड आदी उपस्थित होते.

नेवासा बाजार समितीचे सभापती डॉ.शिवाजी शिंदे यांनीही कार्यक्रमाचे प्रास्तविक केले.

प्रा.नानासाहेब खराडे यांनी सूत्रसंचालन केले.

शिक्षण संस्थेचे प्रशासकीय अधिकारी भारत वाबळे यांनी आभार मानले.

ताज्या बातम्या

भारत विरुद्ध पाकिस्तानचा विजय; वर्ल्डकपमध्ये भारताला पहिल्यांदाच पराभव

माय महाराष्ट्र न्यूज:टि 20 कपमध्ये अखेर पाकिस्तानने टीम इंडियावर विजय मिळवला आहे. भारताने ठेवलेलं 153 रनचं आव्हान पाकिस्तानने एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. बाबर...

नगर ब्रेकींग:मोठा अपघात: अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा येथील नगर – औरंगाबाद महामार्गावर हॉटेल बहार नजीक असलेला दुभाजक ओलांडताना नेवासा फाटा लगत असलेल्या...

नगर ब्रेकींग:अल्पवयीन मुलीला रूममध्ये घेवुन जात तिच्यावर अत्याचार अखेर आरोपीला…

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील सन 2020 मध्ये एका अल्पवयीन मुलीला रूममध्ये घेवुन जात तिच्यावर अत्याचार केला होता. अत्याचाराबाबत कोणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी...

राष्ट्रवादीच्या या नेत्यांचा आरोप खा सुजय विखे हे पदाची पातळी सोडून बोलत आहे

माय महाराष्ट्र न्यूज: ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केला. शहरातील राष्ट्रवादी भवनमध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मेळ्याव्याच्या अध्यक्षस्थानावरून पालकमंत्री मुश्रीफ बोलत होते. नगरविकास राज्यमंत्री...

नगर जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार :प्रेमासाठी त्यांनी उच्चल विचित्र प्रकार

माय महाराष्ट्र न्यूज :प्रेम आंधळं असतं, म्हटलं जातं. मात्र प्रेमात किती आंधळं व्हायचं, हेच काहींना समजत नाही. लोणीचा असाच एक आंधळा प्रेमी अहमदनगरमध्ये एका...

मोठी घडामोडी:राज्यपाल दोन दिवस नगर दौऱ्यावर; विखें पाटलांकडे मुक्काम

माय महाराष्ट्र न्यूज:राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी २७ व २८ ऑक्टोबर असे दोन दिवस नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत राहुरीच्या महात्मा फुले कृषी...
error: Content is protected !!