Saturday, October 23, 2021

भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्षा मोठे विधान:अजितदादांना मुख्यमंत्रिपदाची संधी दिली पाहिजे

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:धुळे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा प्रचारासाठी चित्रा वाघ आल्या होत्या. यावेळी त्यांनी  शेतकर्‍यांच्या मदतीच्या प्रश्‍नावरुन महाविकास आघाडी सरकारवर सडकून टीका केली.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना त्यांच्याच पक्षाने पुण्याच्या पिंपरी-चिंचवडमध्येच अडकवून ठेवल्यासारखी स्थिती आहे. परंतु, अजितदादांना अडीच वर्ष मुख्यमंत्रिपदाची संधी मिळाली पाहिजे, अशी अपेक्षाच कधी काळी राष्ट्रवादीत असलेल्या भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी व्यक्त केली आहे.

अजितदादा हे प्रचंड क्षमता असलेले नेते आहेत. मी त्यांच्यासोबत काम केलेली कार्यकर्ती आहे. अडीच वर्ष शिवसेनेला आणि अडीच वर्ष राष्ट्रवादीला मुख्यमंत्रिपद देण्याचं मी मध्यंतरी ऐकलं होतं. परंतु, ही त्यांची पक्षांतर्गत गोष्ट आहे. तरीही राष्ट्रवादीने अजितदादांना मुख्यमंत्रिपदाची संधी द्यायला

काहीच हरकत नाही, असं माझ्या सारख्या कार्यकर्तीला वाटत आहे’ अशी मागणीच चित्रा वाघ यांनी केली आहे.तसंच, ‘एवढी क्षमता असलेल्या नेत्याला केवळ पुण्यातील पिंपरी-चिंचवडपर्यंतच अडकवून टाकल्यासारखी स्थिती सध्या दिसत आहे. यामुळेच त्यांच्या पक्षातील खासदाराने पिंपरी चिंचवडमधील

भोसरी विधानसभेच्या आढावा बैठकीत ही खदखद व्यक्त केली असावी. असं मला वाटत असंही चित्रा वाघ यांनी स्पष्ट केले.आज विद्यार्थी सुद्धा त्रस्त आहे. आरोग्य विभागाच्या परीक्षांमुळे अनेक मुलांना मनस्ताप सहन करावा लागला. एमपीएससीच्या परीक्षेचा विषयामुळे लोणकर नावाच्या मुलाला जीव गमवावा लागला.

एवढंच नाही तर साक्रीमधील एसटी विभागाच्या कर्मचार्‍याला आत्महत्या करावी लागली. ती राज्यातली तिसरी आत्महत्या होती. महिला व मुलींवर रोज अत्याचार चालले आहेत. राज्याच्या दृष्टीने यांचा कलगीतुरा महत्वाचा नाही तर हे ऐरणीचे प्रश्‍न सोडविण्यासाठी महाविकास आघाडीने रस दाखविणे

महत्वाचे आहे. पण, राज्यात सरकार नावाची यंत्रणा अस्तित्वात आहे की नाही, असा प्रश्‍न सर्वांनाच पडला आहे’, अशी टीका चित्रा वाघ यांनी केली.

ताज्या बातम्या

वा जबरदस्त: अवघ्या 1 रुपयात खरेदी करा सोनं

माय महाराष्ट्र न्यूज:तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही 1 रुपयालाही सोने खरेदी करू शकता. डिजिटल गोल्ड हा तुमच्यासाठी चांगला पर्याय असू...

नगरचे पालकमंत्री बदलणार? या दोन नावांची चर्चा

माय महाराष्ट्र न्यूज:मंत्री हसन मुश्रीफ नगरचे पालकमंत्रीपद सोडणार या चर्चेने पुन्हा वेग घेतला आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणावर पकड मजबूत करण्यासाठी ते पद सोडण्याच्या विचारात...

नगर जिल्ह्यातील या भाजप आमदारांचा गंभीर आरोप ठाकरे सरकार म्हणजे ….

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यासह अहमदनगर जिल्ह्यात काही ठिकाणी अतिवृष्टी झाली. यात शेतमालाचे मोठे नुकसान झाले. जिल्हा प्रशासनाने नुकसानीचे पंचनामेही केले मात्र नुकसान भरपाई मिळालेली नाही....

राधाकृष्ण विखे पाटीलांनी दिला इशारा म्हणाले तर पळता भूई थोडी होईल 

माय महाराष्ट्र न्यूज: देशात 100 कोटी लसींचे डोस पूर्ण करण्यासाठी योगदान दिल्याबद्दल राहाता तालुक्यातील लोणी येथे आमदार राधाकृष्ण विखे-पाटलांच्या हस्ते आरोग्य सेवकांचा सत्कार करण्यात...

महाराष्ट्रातील संतापजनक घटना:वेश्या व्यावसायासाठी आईने पोटच्या मुली सोबत केले असे काही…

माय महाराष्ट्र न्यूज:आईने स्वत:च्या अल्पवयीन मुलीला वेश्या व्यवसायाच्या दलदलीत ढकलले आहे. एका नातेवाईकाच्या मदतीने तिला मुंबईच्या एका दलालाला 20 लाख रुपयांना विकण्यात आले. सलग...

नगर जिल्ह्यात आजही लसीचे १ लाख १७ हजार डोस शिल्लक

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रूग्णसंख्या कमी होत आहे. दररोज १५ हजार लोकांच्या कोवीड चाचण्या  होत आहेत. असे जरी असले तरी अजून कोरोनाचा धोका...
error: Content is protected !!