Sunday, October 24, 2021

नगर जिल्ह्यातील मोठी कारवाई;एक कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:संगमनेर शहरातील 5 कत्तलखान्यांवर अहमदनगर पोलिसांनी छापे टाकले. या कारवाईत तब्बल एक कोटी 4 लाख रुपयांचे गोवंश जातीच्या जनावरांचे मांस जप्त केले असून 70 जनावरांची सुटका करण्यात आली आहे. शहरातील कत्तलखान्यावर केलेली ही कारवाई आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई ठरली आहे.

ही कारवाई शनिवारी रात्री 9.30 वाजेच्या सुमारास करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी 7 जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहे. ही कारवाई सुरू असताना परिसरातील काही व्यक्तींनी वीज पुरवठा खंडित करून बजरंग दलाचे पदाधिकारी व प्राणी कल्याण अधिकारी यतीन कांतीलाल जैन यांच्या वाहनावर दगडफेक केल्याने वातावरण काहीवेळ तणावपूर्ण बनले होते.

वहिद कुरेशी, मुद्दसर हाजी, नवाज कुरेशी, जहिर अवर कुरेशी, परवेज कुरेशी, कलीम सलीम खान, अबीदुरहक अब्दुलजबर (सर्व रा. संगमनेर) अशी आरोपींची नावे आहेत. यापैकी अबीदुरहक अब्दुलजबर (वय 25) व कलीम सलीम खान (वय 21) यांना अटक करण्यात आली आहे तर इतर फरार झाले आहे.

दोन दिवसांपूर्वी त्यांनी नाशिक येथील विशेष पोलीस महानिरीक्षक यांची भेट घेऊन संगमनेर येथील कत्तलखान्यांसंदर्भात तक्रार केली. या तक्रारीची विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी गंभीर दखल घेऊन अहमदनगर येथील पोलीस प्रमुखांना याबाबत माहिती दिली.

ताज्या बातम्या

भारत विरुद्ध पाकिस्तानचा विजय; वर्ल्डकपमध्ये भारताला पहिल्यांदाच पराभव

माय महाराष्ट्र न्यूज:टि 20 कपमध्ये अखेर पाकिस्तानने टीम इंडियावर विजय मिळवला आहे. भारताने ठेवलेलं 153 रनचं आव्हान पाकिस्तानने एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. बाबर...

नगर ब्रेकींग:मोठा अपघात: अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा येथील नगर – औरंगाबाद महामार्गावर हॉटेल बहार नजीक असलेला दुभाजक ओलांडताना नेवासा फाटा लगत असलेल्या...

नगर ब्रेकींग:अल्पवयीन मुलीला रूममध्ये घेवुन जात तिच्यावर अत्याचार अखेर आरोपीला…

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील सन 2020 मध्ये एका अल्पवयीन मुलीला रूममध्ये घेवुन जात तिच्यावर अत्याचार केला होता. अत्याचाराबाबत कोणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी...

राष्ट्रवादीच्या या नेत्यांचा आरोप खा सुजय विखे हे पदाची पातळी सोडून बोलत आहे

माय महाराष्ट्र न्यूज: ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केला. शहरातील राष्ट्रवादी भवनमध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मेळ्याव्याच्या अध्यक्षस्थानावरून पालकमंत्री मुश्रीफ बोलत होते. नगरविकास राज्यमंत्री...

नगर जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार :प्रेमासाठी त्यांनी उच्चल विचित्र प्रकार

माय महाराष्ट्र न्यूज :प्रेम आंधळं असतं, म्हटलं जातं. मात्र प्रेमात किती आंधळं व्हायचं, हेच काहींना समजत नाही. लोणीचा असाच एक आंधळा प्रेमी अहमदनगरमध्ये एका...

मोठी घडामोडी:राज्यपाल दोन दिवस नगर दौऱ्यावर; विखें पाटलांकडे मुक्काम

माय महाराष्ट्र न्यूज:राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी २७ व २८ ऑक्टोबर असे दोन दिवस नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत राहुरीच्या महात्मा फुले कृषी...
error: Content is protected !!