माय महाराष्ट्र न्यूज:बाजार नियामक सेबीनं (SEBI) बेपत्ता थकबाकीदारांकडून दंड वसूल करण्यासाठी नवीन प्रणाली सुरू केली आहे. या अंतर्गत तुम्ही घरबसल्या कमाई करू शकता.
त्या बदल्यात तुम्हाला सेबीला काही माहिती द्यावी लागेल.बेपत्ता असलेल्या थकबाकीदारांच्या मालमत्तेची माहिती तुम्ही सेबीला दिल्यास तुम्हाला २० लाख रुपयांपर्यंतचे बक्षीस मिळू शकते.
सेबीने यासाठी नियम बनवले असून बक्षीसाची रक्कम कुणाला कशी दिली जाईल हे सांगितलं आहे.सेबीच्या म्हणण्यानुसार, माहिती देणाऱ्यांना अंतरिम बक्षीसाची रक्कम मालमत्तेच्या राखीव किंमतीच्या अडीच
टक्क्यांपेक्षा जास्त नसेल. मात्र, या टप्प्यात पाच लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेचे बक्षीस दिले जाणार नाही. त्याच वेळी, शेवटच्या टप्प्यात २० लाख रुपयांपर्यंत किंवा मालमत्तेच्या मूल्याच्या १० टक्के इतकी रक्कम बक्षीस म्हणून दिली जाईल.
डिफॉल्टर किंवा त्यांच्या मालमत्तेची माहिती देणाऱ्यांची ओळख गोपनीय ठेवली जाईल, असं आश्वासन सेबीनं दिलं आहे. यासोबतच नियामकानं असंही म्हटलं आहे की, दिलेली माहिती योग्य असल्याचं
आढळल्यावरच बक्षीसाची रक्कम दिली जाईल.ज्यांच्याकडून वसूली करणं कठीण मानलं गेलंय अशा थकबाकीदारांची माहिती जे देतील त्यांनाच ही बक्षीसाची रक्कम दिली जाणार आहे. नुकतीच सरकारनं थकबाकीदारांची
माहिती संसदेत दिली होती. कर्जाचे हप्ते चुकवणाऱ्या पहिल्या ५० लोकांकडे बँकांचे ९२,५७० कोटी रुपये आहेत.अशा थकबाकीदारांकडून बँका वसुली करू शकत नाहीत. त्यांचे सर्व प्रयत्न अयशस्वी ठरले आहेत. याशिवाय
नुकतीच सेबीने ९ मोस्ट वॉन्टेड डिफॉल्टर्सची यादी जाहीर केली होती. अशा थकबाकीदारांकडून दंड वसूल करण्यासाठी SEBI प्रयत्नशील आहे.ज्या लोकांकडून कर्ज वसूल करणं कठीण जाते, त्यांना थकबाकीदारांच्या
यादीत टाकलं जातं. सेबीच्या यादीत अशा थकबाकीदारांची संख्या ५१५ आहे. म्हणजेच, या ५१५ डिफॉल्टर्सची माहिती शेअर करणाऱ्यांना सेबी २० लाख रुपयांपर्यंतचे बक्षीस देईल. अशा प्रकारे प्रत्येकाला घरी बसून पैसे
कमवण्याची सुवर्ण संधी आहे. केवळ डिफॉल्टर्सची योग्य माहिती सेबीला कळवावी लागेल.