Monday, October 18, 2021

मोठी बातमी:काँग्रेसला महराष्ट्रात मोठा धक्का बसणार; हा दिग्गज नेता भाजपात जाणार?

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज :मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे माजी राज्यमंत्री कृपाशंकर सिंह यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. आता मुंबई काँग्रेसचे आणखी एक माजी अध्यक्ष आणि माजी खासदार संजय निरुपम भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे.

काँग्रेस नेतृत्वावर नाराज असलेले निरुपम भाजपमध्ये प्रवेश करुन काँग्रेस आणि शिवसेना या दोन पक्षांविरोधात आक्रमक होण्याची तयारी करत असल्याचे वृत्त आहे. एक्सप्रेस समुहाच्या जनसत्ता या हिंदी वृत्तपत्रातून पत्रकारिता करणाऱ्या संजय निरुपम यांनी पुढे ‘दोपहर का सामना’ या शिवसेनेच्या

हिंदी भाषिक मुखपत्राचे संपादक पद सांभाळले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ‘आशीर्वादाने’ त्यांनी राज्यसभेत शिवसेना खासदार म्हणून प्रवेश केला. पण काही वर्षांतच शिवसेना नेतृत्वावर नाराज झालेल्या निरुपम यांनी काँग्रेसची वाट धरली.

काँग्रेसच्या तिकिटावर निरुपम उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाचे खासदार झाले. ते २००९ ते २०१४ या काळात उत्तर मुंबईचे खासदार होते. मोदी लाटेचा फटका बसला आणि २०१४ तसेच २०१९ च्या खासदारकीच्या निवडणुकीत संजय निरुपम यांचा पराभव झाला.

लोकसभेच्या निवडणुकीत २०१४ आणि २०१९ मध्ये मुंबईत काँग्रेसला एकही जागा जिंकता आला नाही. निरुपम २०१९ मध्ये मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष होते त्यामुळे अपयशाची जबाबदारी घेऊन त्यांनी राजीनामा दिला. यानंतर हळू हळू निरुपम मागे पडले.

पण भाजप मुंबई महापालिका तसेच भविष्यातल्या महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळवण्यासाठी इच्छुक आहे. याकरिता अधिकाधिक उत्तर भारतीय मते आकर्षित करण्यासाठी कृपाशंकर सिंह यांच्या पाठोपाठ भाजप संजय निरुपम यांना पक्षात प्रवेश देण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त आहे.

निरुपम हे मूळचे बिहारचे आहेत. मुंबई-ठाण्यातील उत्तर भारतीय, प्रामुख्याने बिहारी जनतेमध्ये त्यांच्या शब्दाला मान देणारे आहेत. मुंबईच्या प्रश्नांची निरुपम यांना जाण आहे. यामुळेच भाजप निरुपम यांना पक्षात प्रवेश देण्याचा विचार करत आहे

ताज्या बातम्या

खळबळजनक:नगर जिल्ह्यातील एक मोठा मंत्री भ्रष्टाचारात अडकला ?

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त 60 वर्षांवरील सर्व नागरिकांसाठी राष्ट्रीय वयोश्री योजने अंतर्गत वृद्ध रुग्णांची आरोग्य तपासणी...

नगर ब्रेकींग:बॅंकेसमोर भरदिवसा डोक्‍यात दगड घालून तरुणाचा खून

माय महाराष्ट्र न्यूज:लहान मुलांमध्ये सायकल लावण्यावरून झालेल्या भांडणाचे पर्यावसन दोन्ही कुटुंबात झाले. या वादातून भांड्याचे व्यापारी जावेद गणीभाई तांबोळी (वय 38) यांचा भरदिवसा डोक्‍यात...

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राजीनामा द्यावा

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात आरोग्य विभागाच्या परीक्षेवरुन एकच गोंधळ उडाला आहे. परीक्षेत झालेल्या गोंधळाची ही दुसरी वेळ असल्याने विरोधक आक्रमक झाले आहेत. भाजप आमदार अतुल...

सरकारकडून बेरोजगारांना मिळणार दरमहा 3500 रुपयांची आर्थिक मदत?वाचा सत्य

माय महाराष्ट्र न्यूज:एकीकडे सोशल मीडिया कोणतीही बातमी किंवा माहिती पटकन पसरवण्यास मदत करत आहे, तर दुसरीकडे फेक बातम्या पसरवण्यातही तो अव्वल आहे. आजकाल सोशल...

टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंगला अटक

माय महाराष्ट्र न्यूज:टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंगला आज अटक करण्यात आली. हरियाणाच्या हांसीमधील हिसार पोलिसांनी ही कारवाई केली. लाईव्ह चॅटमध्ये केलेल्या एका चुकीमुळे...

रोहित पवारांची चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपावर खोचक टीका

माय महाराष्ट्र न्यूज:भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी सांगली येथील एका कार्यक्रमात बोलताना, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा एकेरी उल्लेख केल्याचं समोर...
error: Content is protected !!