Saturday, October 23, 2021

नगर जिल्ह्यात शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणाऱ्या सरकार व लोकप्रतिनिधींचा धिक्कार

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील नद्यांना आलेल्या पुरामुळे नुकसान झालेल्या पुरग्रस्त शेतकऱ्यांना एक महिना उलटला तरी शासकीय मदत न मिळाल्याने वंचित बहुजन आघाडीच्या वतीने भगुर येथील नंदिनी नदी

पात्रात शनिवारी ठिय्या आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांना एक महिन्यानंतरही वाऱ्यावर सोडणाऱ्या सरकार व लोकप्रतिनिधींचा धिक्कार करत शेकडो कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत नदीच्या पाण्यामध्ये उभे राहून आंदोलन केले.

पुरानंतर प्रशासनाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करुन सरकारला अहवाल सादर केला आहे. मात्र, एक महिना उलटला तरी पुरग्रस्तांच्या पदरी अद्याप कसलीही मदत पडली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी वंचित बहुजन

आघाडीच्या वतीने राज्याचे उपाध्यक्ष चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली शेवगाव शहरातून मोटारसायकल रॅली काढून भगुर येथील शेवगाव नगर रस्त्यानजीक नंदिनी नदीच्या पात्रात पाण्यात उतरुन आंदोलन करण्यात आले.या आंदोलनाचे नेतृत्व वंचित बहुजन आघाडीचे राज्याचे उपाध्यक्ष किसन चव्हाण यांनी केले.

तहसीलदार छगन वाघ यांनी मागणीचे निवेदन स्विकारल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. तालुक्यातील नंदिनी, चांदणी, ढोरा, भागिरथी, काशी या प्रमुख नद्यांसह ओढ्या नाल्यांना आलेल्या पुरामुळे नदीकाठच्या आखेगाव, खरडगाव, वरुर, भगुर, वडुले, शेवगाव लांडे व कराड वस्ती, टाकुर पिंपळगाव,

कांबी, हातगाव, बोधेगाव, चापडगाव, वडुले वाघोली आदी गावातील शेतकऱ्यांच्या पिकांचे, घराचे व शेतीचे मोठया प्रमाणात नुकसान झाले.

ताज्या बातम्या

वा जबरदस्त: अवघ्या 1 रुपयात खरेदी करा सोनं

माय महाराष्ट्र न्यूज:तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही 1 रुपयालाही सोने खरेदी करू शकता. डिजिटल गोल्ड हा तुमच्यासाठी चांगला पर्याय असू...

नगरचे पालकमंत्री बदलणार? या दोन नावांची चर्चा

माय महाराष्ट्र न्यूज:मंत्री हसन मुश्रीफ नगरचे पालकमंत्रीपद सोडणार या चर्चेने पुन्हा वेग घेतला आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणावर पकड मजबूत करण्यासाठी ते पद सोडण्याच्या विचारात...

नगर जिल्ह्यातील या भाजप आमदारांचा गंभीर आरोप ठाकरे सरकार म्हणजे ….

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यासह अहमदनगर जिल्ह्यात काही ठिकाणी अतिवृष्टी झाली. यात शेतमालाचे मोठे नुकसान झाले. जिल्हा प्रशासनाने नुकसानीचे पंचनामेही केले मात्र नुकसान भरपाई मिळालेली नाही....

राधाकृष्ण विखे पाटीलांनी दिला इशारा म्हणाले तर पळता भूई थोडी होईल 

माय महाराष्ट्र न्यूज: देशात 100 कोटी लसींचे डोस पूर्ण करण्यासाठी योगदान दिल्याबद्दल राहाता तालुक्यातील लोणी येथे आमदार राधाकृष्ण विखे-पाटलांच्या हस्ते आरोग्य सेवकांचा सत्कार करण्यात...

महाराष्ट्रातील संतापजनक घटना:वेश्या व्यावसायासाठी आईने पोटच्या मुली सोबत केले असे काही…

माय महाराष्ट्र न्यूज:आईने स्वत:च्या अल्पवयीन मुलीला वेश्या व्यवसायाच्या दलदलीत ढकलले आहे. एका नातेवाईकाच्या मदतीने तिला मुंबईच्या एका दलालाला 20 लाख रुपयांना विकण्यात आले. सलग...

नगर जिल्ह्यात आजही लसीचे १ लाख १७ हजार डोस शिल्लक

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रूग्णसंख्या कमी होत आहे. दररोज १५ हजार लोकांच्या कोवीड चाचण्या  होत आहेत. असे जरी असले तरी अजून कोरोनाचा धोका...
error: Content is protected !!