Friday, October 22, 2021

मोठी बातमी:प्रियंका गांधींना अटक

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खीरीच्या तिकुनिया भागात मोठा हिंसाचार उफळला असून, यामध्ये आठ शेतकऱ्यांच्या मृत्यू झाला आहे. या दुर्देवी घटनेमुळे उत्तर प्रदेशचं राजकारण ढवळून निघालं असून राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी लखीपूरला पोहचल्या आहेत. तर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही आपले नियोजित दौरे रद्द केले आहेत. सोमवारी पहाटे प्रियंका गांधी लखीमपूर खीरीच्या तिकुनिया भागाकडे निघाल्या होत्या. यावेळी प्रियंका गांधी यांना पोलिसांनी अडवले असून ताब्यात घेतलं आहे.

लखीमपुर खीरी येथे जाणाऱ्या प्रियंका गांधी यांना हरगांव येथून पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यानंतर त्यांना सेकंड बटालियन गेस्ट हाऊस येथे नेण्यात आलं. दुसरीकडे युथ काँग्रेस अध्यक्ष बी. श्रीनिवास यांनी प्रियंका गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी अटक केल्याचा दावा केला आहे.

श्रीनिवास यांनी ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. उत्तर प्रदेश पोलिसांकडून अद्याप याबाबत कोणताही प्रतिक्रिया आलेली नाही. उत्तर प्रदेश काँग्रेसनेही प्रियंका गांधी यांना अटक केल्याचं ट्विट केलं आहे. प्रियंका गांधी यांना हरगांव येथून अटक करण्यात आली

असून त्यांना सीतापुर पोलिस लाइन येथे नेण्यात आलं आहे. कृपया सर्वजण तिथे पोहचा, असं ट्विट उत्तर प्रदेश काँग्रेसने केलं आहे. श्रीनिवास यांनीही आपल्या ट्विटमध्ये प्रियंका गांधी यांना अटक केल्याचा दावा केला आहे. ते आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की, “शेवटी तेच झालं. जे भाजपला अपेक्षित होतं.

महात्मा गांधींच्या लोकशाही देशामध्ये गोडसे समर्थकांनी भर पावसामध्ये आणि पोलीस दलाच्या तुकड्यांना तोंड देत अन्नदाता शेतकऱ्याला भेटण्यासाठी पोहचलेल्या आमच्या नेत्या प्रियंका गांधी यांना हरगावमध्ये अटक केली. ही केवळ लढाईची सुरुवात आहे. शेतकरी एकजुटीचा विजय असो.

ताज्या बातम्या

पेट्रोल व डिझेल पुन्हा महाग; जाणून घ्या तुमच्या शहरात आजचे नविन दर

माय महाराष्ट्र न्यूज:आंतरराष्ट्रीय तेलाच्या किमतीत झालेल्या उडीमुळे 28 सप्टेंबरला पेट्रोलच्या किंमती आणि 24 सप्टेंबर रोजी डिझेलच्या किंमतीवरील ब्रेक संपले. भारतात स्थानिक कर (व्हॅट) आणि...

माजी आमदार मुरकुटेंनी राष्ट्रवादी काँग्रेसला बळ देण्यासाठी थेट अजित पवारांकडून आग्रह

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राजकारण नेहमी राज्याच्या राजकारणात नेहमी वरचढ ठरले आहे. जिल्ह्यातील अनेक नेते हे राज्याचे राजकारण चालवतात.यामध्ये महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, जलसंधारण...

शिवाजी कर्डिले म्हणाले खा विखेंच्या म्हणण्यानुसार मी जर आमदार झालो, तर ?…

माय महाराष्ट्र न्यूज:नगर तालुक्यातील एका कार्यक्रमात माजी मंत्री शिवाजी कर्डिले बोलत होते. यावेळी खा. डॉ.सूजय विखे , आ. बबनराव पाचपुते यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित...

करोना महामारी सहा महिन्यांत संपणार:,नगर जिल्ह्यातील भगत यांची भविष्यवाणी

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मिरी येथील ग्रामदैवत राजा विरभद्र देवस्थानचा तीन दिवसीय यात्रा उत्सवाची सांगता गुरुवारी भगत यांच्या होईकाने शांततेत पार...

नगर जिल्ह्यात कांद्याच्या भावात मोठी घसरण

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या भावात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली होती त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होतं पण पुन्हा कांद्याच्या भावात घसरण...

आजपासून नाट्यगृहे, चित्रपटगृहे सुरु ; हे आहे नियम

माय महाराष्ट्र न्यूज:आजपासून नाट्यगृहे, चित्रपटगृहे सुरु होणारेत. तसंच आजपासून अम्युझमेंट पार्कही खुली केली जाणार आहेत.सुरुवातील राज्य सरकारनं शाळा, मंदिरं सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर...
error: Content is protected !!