Friday, October 22, 2021

या तारखेपासून राज्यात पाऊस थांबणार – पंजाबराव डख यांची नगर जिल्ह्यात माहिती

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील दिघी येथे ग्रामपंचायतीच्यावतीने पंजाबराव डख तसेच उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल सलाबतपूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी डॉ. अमोल चिंधे यांना नुकताच सामाजिक कृतज्ञता पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.

अध्यक्षस्थानी मुळा कारखान्याचे उपाध्यक्ष कडूबाळ कर्डिले होते. यावेळी व्यासपीठांवर जिल्हा परिषद सदस्य दादासाहेब शेळके, पंचायत समिती सभापती रावसाहेब कांगुणे, गणेश ढोकणे, कृषी अधिकारी मनोज सूर्यवंशी, निवृत्ती भागवत, लक्ष्मण सुडके, नानासाहेब बांदल, बबनराव नागोडे, रुस्तुम नवले, अर्जुन नवले,

पांडुरंग काळे, सरपंच दीपक मोरे, उपसरपंच सचिन नागोडे उपस्थित होते.9 ऑक्टोबरपासून राज्यातील पाऊस थांबणार असून शेतकर्‍यांच्या हाती खरीप पिके येतील, असा दावा प्रसिद्ध हवामान अभ्यास पंजाबराव डख यांनी केला.

यावेळी पंजाबराव डख म्हणाले, शेती हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. देशात ऐंशी टक्के लोक शेती करतात. मात्र नैसर्गिक अपत्तीचा फटका फक्त शेतकर्‍यांना बसतो. करोना महामारीच्या काळात देश संकटात असताना शेतकर्‍यांनी कसलीही भीती न बाळगता मदतीची महत्त्वाची भूमिका बजावली म्हणून

शेतकरी हाच खरा राजा आहे. त्यामुळे यापुढे फक्त शेतकर्‍यांच्या हितासाठीच काम करणार असल्याचे ते म्हणाले. अलीकडच्या काळात प्रचंड वृक्षतोड झाल्याने पृथ्वीचे तापमान वाढले असून यामुळे पावसाचे प्रमाण वाढत असून त्यामुळे अतिवृष्टी गारपीट, मुसळधार पावसाने शेतकर्‍यांना नुकसान

सहन करावे लागणार आहे. त्यासाठी जास्तीतजास्त वृक्षलागवड करून पर्यावरण समतोल राखल्यास भविष्यात शेतकर्‍यांना चांगले दिवस येतील असे मत त्यांनी व्यक्त केले. तर तरुणांनी वाढदिवस साजरे करताना एक झाड लावण्याचा संकल्प करण्याचा सल्ला दिला.अवकाळी व मान्सूनचा पाऊस कधी पडतो .

याचे संकेत काय असतात याबाबत उपस्थितांना सोप्या भाषेत समजावून सांगितले.पंजाबराव डख पुढे बोलताना म्हणाले, शेती हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. देशात ऐंशी टक्के लोक शेती करतात. मात्र नैसर्गिक आपत्तीचा फटका फक्त शेतकर्‍यांना् बसतो. करोना महामारीच्या काळात देश संकटात असताना

शेतकर्‍यांनी कसलीही भीती न बाळगता मदतीची महत्वाची भूमिका बजावली म्हणून शेतकरी हाच खरा राजा आहे. त्यामुळे यापुढे फक्त शेतकर्‍यांच्या हितासाठीच काम करणार आहे.

ताज्या बातम्या

नगर ब्रेकिंग:दोन मुले असलेल्या बापाने लग्नाचे आमिष दाखवून 21 वर्षीय अविवाहित तरूणीला पळवून नेले

    माय महाराष्ट्र न्यूज:दोन मुले असलेल्या बापाने लग्नाचे आमिष दाखवून 21 वर्षीय अविवाहित तरूणीला फूस लावून पळवून नेल्याची घटना दि. 19 ऑक्टोबर रोजी घडली.अहमदनगर जिल्ह्यातील...

जनता लॉकडाऊनच्या झळा सोसत असताना नगरचे पालकमंत्री जनतेला लुटत होते

माय महाराष्ट्र न्यूज: भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा ग्रामविकास मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांच्यावर जोरदार टीका...

विखे-पाटील यांना नैराश्याने ग्रासले

माय महाराष्ट्र न्यूज : भाजपचे तत्त्वज्ञान आणि कार्यपद्धती देशाच्या, जनतेच्या हिताची नाही. त्यामुळे राज्यात किमान समान कार्यक्रमावर स्थापन झालेले महाविकास आघाडीचे सरकार येत्या महापालिका...

बापरे:कोरोनाचा नव्या रुपातील विषाणू आढळून आला

माय महाराष्ट्र न्यूज:केंद्र सरकारचे कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचे शंभर कोटीचे उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. त्यानिमित्त डॉ. मांडे यांच्याशी सीएसआयआर मुख्यालयात सकाळने संवाद साधला. कोरोनाचा नव्या रुपातील...

नगरमध्ये दोन भावांकडून महिलेची छेडछाड लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करीत…

माय महाराष्ट्र न्यूज:दोन भावांनी एका विधवा महिलेची छेडछाड करीत लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करीत मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून विकास शामसुंदर गायकवाड...

फडणवीसांची जिरवायची हे गडकरींसोबत आधीच ठरलं होत: काँग्रेस नेत्यांचा खळबळजनक दावा

माय महाराष्ट्र न्यूज:नांदेड इथल्या बिलोली येथे आयोजित प्रचारसभेत मंत्री विजय वडेट्टीवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपाला बहुमत जरी...
error: Content is protected !!