Wednesday, October 27, 2021

नगर जिल्ह्यातील तीनही मंत्री याबाबत पुढाकार का घेत नाहीत? विखे पाटलांचा सवाल

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:गोदावरी लाभक्षेत्रातील शेतकर्‍यांच्या पाणी प्रश्नाच्या संदर्भात आयोजित केलेल्या बैठकीत भाजपाचे जेष्ठ नेते आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी जलसंपदा मंत्र्यांकडून पाण्याबाबत करण्यात आलेल्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला.

राज्याचे जलसंपदा मंत्रीच पाण्याच्या बाबतीत विविध वक्तव्य करून लाभक्षेत्रातील शेतकर्‍यांमध्ये संदिग्धता निर्माण करीत आहेत. मात्र सरकारमध्ये बसलेले जिल्ह्यातील तीन मंत्री समन्यायी पाणी वाटप कायद्यात बदल करून घेण्याबाबत पुढाकार का घेत नाहीत? असा सवाल भाजपा नेते आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला.

समन्यायी पाणी वाटप कायद्यामुळे जिल्ह्यावर होत असलेल्या अन्यायाविरोधात कायद्याची लढाई पुन्हा सुरु करणार असून पाण्याच्या बाबतीत कोणतीही तडजोड करणार नसल्याचा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला.

या कायद्याच्या विरोधात शेवटपर्यंत न्यायालयील लढाई आपण लढलो. सर्वोच्च न्यायालयाने याबाबत काही सुचना खालच्या न्यायालयाला दिल्या होत्या. याबाबत आता पाठपुरावा करुन पुन्हा ही लढाई सुरु करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सत्ता असो अथवा नसो हक्काच्या पाण्याची लढाई करण्याची

शिकवण आदरणीय खासदार साहेबांनी आम्हाला दिली. पाणी प्रश्नावर त्यांनी कधी तडजोड केली नाही. भाजप सरकारच्या काळातही पाणी प्रश्नाबाबत चुकीच्या निर्णयांना आपण विरोधच केला.

कोकणात वाहून जाणारे पाणी गोदावरी तुटीच्या खोर्‍यात वळविण्याबाबतचा पाणी परिषदेचा प्रस्ताव भाजप सरकारने स्विकारुन त्याची अंमलबजावणीही सुरु केली होती. याबाबत तयार केलेल्या योजनेची अंमलबजावणी तातडीने होणे हाच यावर उपाय आहे. मात्र महाविकास आघाडी सरकारची याबाबतीत उदासिनताच दिसत असल्याचे आ. विखे पाटील म्हणाले.

ताज्या बातम्या

यंदाची थंडी जोरदार; हवामान खात्याचा इशारा

माय महाराष्ट्र न्यूज:देशात वातावरणात गारठा वाढला असून हिवाळ्याची चाहूल लागली आहे. हिवाळा अद्याप सुरू झाला नसला तरी यंदाची थंडी हाडं गोठवणारी असणार आहे अशी...

नगर ब्रेकींग :मोठा अपघात तरुण व्यावसायिक ठार; कारचा चक्काचूर

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर खुर्द शिवारात झालेल्या भीषण अपघातात कृष्णा सुभाष करपे हा तरुण व्यावसायिक ठार झाला या घटनांनी संपूर्ण शहरातून हळहळ...

नगर जिल्ह्यातील घटना:16 वर्षांच्या मुलांची वडिलांना होणाऱ्या त्रासामुळे आत्महत्या ?

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर वाडेकर गल्ली येथील श्रेयस गणेश वाडेकर या तरुणाने मानसिक संतापातून मंगळवारी सकाळी घरातच पंख्याला  गळफास घेऊन आत्महत्या केल्याची...

बापरे:नगरमध्ये उच्चभ्रू वस्तीत सुरू होता हा धक्कादायक प्रकार;तीन महिलांची सुटका

माय महाराष्ट्र न्यूज:नगर शहरात उच्चभ्रू वस्तीत पश्निम बंगालमधील महिलांना आणून वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे पोलिसांच्या छाप्यात उघड झाले. डीवायएसपी संदीप मिटके यांच्या पथकाने नगर...

नगर जिल्ह्यातील प्रकार: एकतर्फी प्रेमातून तरुणीवर हल्ला अखेर…

माय महाराष्ट्र न्यूज:एकतर्फी प्रेमातून तरुणीवर सत्तूरने हल्ला केल्याबद्दल असिफ कबीर पठाण (रा. हरेगाव, ता. श्रीरामपूर) याला सात वर्ष सक्‍तमजुरी आणि 35 हजार रुपये दंडाची...

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत मिळणार; महसूल व वन विभागाचा शासन निर्णय जारी

माय महाराष्ट्र न्यूज :  ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यात राज्यातील विविध जिल्ह्यात अतिवृष्टी तसेच पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत देण्यात येणार...
error: Content is protected !!