Monday, October 18, 2021

नगर ब्रेकींग खळबळजनक: उपसभापतींच्या पतीने भूखंड देण्याचे अमिष दाखवून महिलेवर बलात्कार

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापतींच्या पतीवर बाजार समितीचा भूखंड देण्याचे अमिष दाखवून महिलेवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे.

राजेंद्र विलास गर्जे (रा. पांगोरी पिंपळगाव, ता. पाथर्डी) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव असून तो प्राथमिक शिक्षक आहे. तसेच तो पाथर्डी बाजार समितीच्या उपसभापती मंगल गर्जे यांचा पती आहे. या प्रकरणी कोल्हार येथील पिडीत महिलेने तक्रार दाखल केली आहे.

 पाथर्डी बाजार समितीची भुखंड वाटपाबाबत एका वृत्तपत्रातील जाहीरात वाचुन पिडीत महीलेने भुखंड मिळण्यासाठी बाजार समितीकडे अर्ज दाखल केला होता. अर्जावर दिलेल्या फोन नंबर वर पाथर्डी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापतीचा पती राजेंद्र विलास गर्जे यांने फोन केला.

माझी पत्नी बाजार समितीची उपसभापती आहे. तुला भुखंड पाहीजे असेल तर मला भेट असे सांगितले.महीला पाथर्डीत आली तेव्हा राजेंद्र गर्जे याने तिला 18 आँगस्ट 2021 रोजी पावणेतीन वाजण्याच्या सुमारास शेवगाव रोडवरील अर्जुना लाँन्सजवळीत एका गाळ्यात

उपसभापती बसलेल्या आहेत तेथे जाऊ व समक्ष बोलु असे सांगुन पिडीत महिलेला तेथे जाण्यास सांगीतले. प्रत्यक्ष त्या ठिकाणी उपसभापती अगर इतर कोणीही नव्हते.त्यांनंतर राजेंद्र गर्जे याने गाळ्याचे शटर बंद करुन तेथे पिडीत महिलेला जीवे मारण्याची धमकी

देत विविस्त्र करुन तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर झालेल्या प्रकाराबाबत कोठे काही बोललीस तर तुला जिवे ठार मारीन अशी धमकी दिली.त्यानंतर सदर महीला तिच्या घरी गेली.त्यानंतर पुन्हा राजेंद्र गर्जे 22 आँगस्ट 2021 रोजी सकाळी अकरा वाजता महीलेच्या घरी जाऊन तिच्या घरात तिच्यावर पुन्हा बलात्कार केला.

महीलेने घडलेला प्रकार तिच्या पतीला सांगितला.पतीने व नातेवाईकांनी धीर दिल्यानंतर महीलेने आज पोलिसात तक्रार दिली आहे. या प्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात राजेंद्र गर्जे याच्या विरुद्ध भारतीय दंड संहिता 1860 नुसार 376, 504, 506 या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक सुहास चव्हाण हे करीत आहेत.

ताज्या बातम्या

खळबळजनक:नगर जिल्ह्यातील एक मोठा मंत्री भ्रष्टाचारात अडकला ?

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त 60 वर्षांवरील सर्व नागरिकांसाठी राष्ट्रीय वयोश्री योजने अंतर्गत वृद्ध रुग्णांची आरोग्य तपासणी...

नगर ब्रेकींग:बॅंकेसमोर भरदिवसा डोक्‍यात दगड घालून तरुणाचा खून

माय महाराष्ट्र न्यूज:लहान मुलांमध्ये सायकल लावण्यावरून झालेल्या भांडणाचे पर्यावसन दोन्ही कुटुंबात झाले. या वादातून भांड्याचे व्यापारी जावेद गणीभाई तांबोळी (वय 38) यांचा भरदिवसा डोक्‍यात...

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राजीनामा द्यावा

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात आरोग्य विभागाच्या परीक्षेवरुन एकच गोंधळ उडाला आहे. परीक्षेत झालेल्या गोंधळाची ही दुसरी वेळ असल्याने विरोधक आक्रमक झाले आहेत. भाजप आमदार अतुल...

सरकारकडून बेरोजगारांना मिळणार दरमहा 3500 रुपयांची आर्थिक मदत?वाचा सत्य

माय महाराष्ट्र न्यूज:एकीकडे सोशल मीडिया कोणतीही बातमी किंवा माहिती पटकन पसरवण्यास मदत करत आहे, तर दुसरीकडे फेक बातम्या पसरवण्यातही तो अव्वल आहे. आजकाल सोशल...

टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंगला अटक

माय महाराष्ट्र न्यूज:टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंगला आज अटक करण्यात आली. हरियाणाच्या हांसीमधील हिसार पोलिसांनी ही कारवाई केली. लाईव्ह चॅटमध्ये केलेल्या एका चुकीमुळे...

रोहित पवारांची चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपावर खोचक टीका

माय महाराष्ट्र न्यूज:भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी सांगली येथील एका कार्यक्रमात बोलताना, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा एकेरी उल्लेख केल्याचं समोर...
error: Content is protected !!