माय महाराष्ट्र न्यूज: भारत हा कृषिप्रधान देश म्हणून ओळखला जातो हे आदेशात अनेक पिके हे घेतले जातात मुख्य करून कापूस हा पीकही घेतले जाते यंदा मोठ्या प्रमाणात
कापसाची लागवड करण्यात आली आणि त्यानंतर उत्पादनही मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना मिळाले परंतु भावाने घात केला यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहे भाव मागील वर्षीच्या तुलनेत यंदा मात्र कमी झाले आहे.
देशातील कापूस उत्पादनातील घट जास्त असल्याचं आता स्पष्ट होत आहे. शेतकरी सुरुवातीपासूनच उत्पादन घटल्याचं सांगत होते. पण उद्योगांनी उत्पादन जास्त असल्याची री कायम ठेवली होती.
आता अमेरिकेच्या कृषी विभागानं अर्थात युएसडीनं भारताचं कापूस उत्पादन ३१३ लाख गाठींपर्यंत कमी झाल्याचे स्पष्ट केले. देशातील कापूस उत्पादनाचा अंदाज कमी केल्यास दर सुधारण्यास अनुकूल स्थिती असल्याचं अभ्यासकांनी सांगितले.
युएसडीए पुढील काळातही कापूस उत्पादनाचा अंदाज बदलू शकते. त्यामुळं देशातील उत्पादनातील घट जास्त आहे, हे स्पष्ट होतंय. त्यामुळं पुढील हंगामासाठी शिल्लक कापूस कमी राहील. त्यातच एल निनोच्या बातम्या सध्या सुरु आहेत.
एल निनोचा प्रभाव आपल्या माॅन्सूनवर किती होईल? हे आताच सांगता येणार नाही. पण याबाबत एप्रिल किंवा मे महिन्यात चित्र स्पष्ट होऊ शकतं. युएसडीएनं कापूस उत्पादनाचा अंदाज व्यक्त केल्यामुळं
कापूस दराला आधार मिळेल, असं शेतीमाल बाजार अभ्यासक सुरेश मंत्री यांनी सांगितलं.देशातील बाजारात आज केवळ १ लाख गाठी कापसाची आवक झाली होती. तर युएसडीएनंही उत्पादन घटीचा अंदाज जाहीर
केला. पण कापूस दरावरील दबाव कायम आहे. आज कापसाला सरारी ७ हजार ८०० ते ८ हजार २०० रपयांच्या दरम्यान भाव मिळाला.कापसाचे भाव कमी असल्यानं अनेक शेतकरीही पॅनिक सेलिंग करत आहेत. याचा दबाव दरावर आला.
मार्च महिन्यात शेतकरी कापूस विकतील, याची जाणीव असल्यानं बाजार दबावात ठेवला जातोय. त्यामुळं शेतकऱ्यांनी शक्य असल्यास थांबावे.