Wednesday, October 27, 2021

डॉ.विजय कदम यांना प्रोफेसर पदी पदोन्नती

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

अहमदनगर

अहमदनगर महाविद्यालयातील इतिहास विभाग प्रमुख डॉ. विजय कदम यांना यू.जी.सीच्या नियमा प्रमाणे प्रोफेसर पदावर पदोन्नती मिळाली आहे. त्याबाबतचे अधिकृत पत्र सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने नुकतेच महाविद्यालयाला सुपूर्त केले आहे.
यापूर्वी डॉ.विजय कदम हे असोसिएट प्रोफेसर या पदावर कार्यरत होते. प्रोफेसर पदाकरिता आवश्यक असलेल्या संशोधन विषयक बाबी व तज्ञांच्या समोरील मुलाखत यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर त्यांना ही पदोन्नती देण्यात आली आहे. प्रा. विजय कदम यांचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील संशोधन पत्रिकांमध्ये आपले अनेक शोधनिबंध प्रकाशित आहेत. शोधयात्रा अंध कल्याणाची हे त्यांचे पुस्तक बहुचर्चित आहे. प्राध्यापक विजय कदम हे उच्च अध्ययन, संस्था राष्ट्रपति निवास, शिमला, येथे असोसिएट आहेत. अंध असल्याकारणाने त्यांना इयत्ता सातवी मधून शाळा सोडून द्यावी लागली होती. पुढे काही शिक्षकांच्या मदतीने त्यांनी 17 नंबर बोर्डाचा फॉर्म भरून इयत्ता दहावी मध्ये तीन वर्षाच्या गॅपनंतर थेट प्रवेश मिळविला आणि ते दहावी उत्तीर्ण झाले. वाचक आणि लेखनिक यांच्या मदतीने त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. विजय कदम हे सेट परीक्षा उत्तीर्ण झाले, तसेच त्यांनी एम. फिल व पीएचडी या पदव्या देखील मिळवलेल्या आहेत. “महाराष्ट्रातील अपंग चळवळ व मानवी हक्क: ऐतिहासिक मीमांसा” हा त्यांचा शोध प्रबंध विशेष गाजला आहे. विजय कदम हे अंध असूनही अपंगांसाठी राखीव असलेल्या जागांचा आधार न घेता गेल्या 16 वर्षांपासून ते अहमदनगर महाविद्यालयात खुल्या प्रवर्गातील पदावर कार्यरत आहेत. परिसरातील सुप्रसिद्ध तक्षशिला ज्युनिअर कॉलेज व इंग्लिश मीडियम स्कूल, देडगाव तसेच मन्वंतर सामाजिक प्रतिष्ठान या संस्थांचे ते अध्यक्ष व संस्थापक आहेत. विविध प्रकारचे सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील पुरस्कार त्यांच्या नावे आहेत. आपल्या नोकरीच्या जेमतेम सोळाव्या वर्षी त्यांनी प्रोफेसर पदी पदोन्नती मिळवली आहे. त्यांच्या या यशाबद्दल अहमदनगर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर जे बार्नबस यांनी कदम यांचे अभिनंदन केले. या कामी त्यांना उपप्राचार्य डॉ अरविंद नागवडे, डॉ. बाळासाहेब गायकर, डॉ. रज्जाक सय्यद, आय क्यू एसी समन्वयक प्रोफेसर डॉ प्रीतम बेदरकर, प्रोफेसर डॉ. साताप्पा चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले.

ताज्या बातम्या

यंदाची थंडी जोरदार; हवामान खात्याचा इशारा

माय महाराष्ट्र न्यूज:देशात वातावरणात गारठा वाढला असून हिवाळ्याची चाहूल लागली आहे. हिवाळा अद्याप सुरू झाला नसला तरी यंदाची थंडी हाडं गोठवणारी असणार आहे अशी...

नगर ब्रेकींग :मोठा अपघात तरुण व्यावसायिक ठार; कारचा चक्काचूर

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर खुर्द शिवारात झालेल्या भीषण अपघातात कृष्णा सुभाष करपे हा तरुण व्यावसायिक ठार झाला या घटनांनी संपूर्ण शहरातून हळहळ...

नगर जिल्ह्यातील घटना:16 वर्षांच्या मुलांची वडिलांना होणाऱ्या त्रासामुळे आत्महत्या ?

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर वाडेकर गल्ली येथील श्रेयस गणेश वाडेकर या तरुणाने मानसिक संतापातून मंगळवारी सकाळी घरातच पंख्याला  गळफास घेऊन आत्महत्या केल्याची...

बापरे:नगरमध्ये उच्चभ्रू वस्तीत सुरू होता हा धक्कादायक प्रकार;तीन महिलांची सुटका

माय महाराष्ट्र न्यूज:नगर शहरात उच्चभ्रू वस्तीत पश्निम बंगालमधील महिलांना आणून वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे पोलिसांच्या छाप्यात उघड झाले. डीवायएसपी संदीप मिटके यांच्या पथकाने नगर...

नगर जिल्ह्यातील प्रकार: एकतर्फी प्रेमातून तरुणीवर हल्ला अखेर…

माय महाराष्ट्र न्यूज:एकतर्फी प्रेमातून तरुणीवर सत्तूरने हल्ला केल्याबद्दल असिफ कबीर पठाण (रा. हरेगाव, ता. श्रीरामपूर) याला सात वर्ष सक्‍तमजुरी आणि 35 हजार रुपये दंडाची...

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत मिळणार; महसूल व वन विभागाचा शासन निर्णय जारी

माय महाराष्ट्र न्यूज :  ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यात राज्यातील विविध जिल्ह्यात अतिवृष्टी तसेच पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत देण्यात येणार...
error: Content is protected !!